मते मांडण्यास संधी नसल्याने नगर 'जिप'ची सभा बेकायदेशीर ः परजणे

नगर ः जिल्हा परिषदेची बुधवारी (ता.२७) सभा बोलाविण्यात आली आहे. ही सभा लेखी प्रतिपादन सभा असताना तसा उल्लेख नोटिशीवर केलेला नाही. तसेच मागील सभेचे इतिवृत्तही दिलेले नसून सदस्यांना मते मांडण्यास संधी दिली नाही. त्यामुळे ही सभा बेकायदेशीर आहे, असे मत जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे यांनी व्यक्त केले.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नगर  ः जिल्हा परिषदेची बुधवारी (ता.२७) सभा बोलाविण्यात आली आहे. ही सभा लेखी प्रतिपादन सभा असताना तसा उल्लेख नोटिशीवर केलेला नाही. तसेच मागील सभेचे इतिवृत्तही दिलेले नसून सदस्यांना मते मांडण्यास संधी दिली नाही. त्यामुळे ही सभा बेकायदेशीर आहे, असे मत जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे यांनी व्यक्त केले.

राजेश परजणे यांनी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की जिल्हा परिषदेच्या सभेची नोटीस देताना मागील सभेचे इतिवृत्त देणे गरजेचे असताना ते दिलेले नाही. सभेत एक तासाची प्रश्नांवर चर्चा व इतर बाबी असतात, त्या कशा हे स्पष्ट नाही. या सभेच्या विषयपत्रिकेवर सभेची तारीख २७ मार्च २०२० असून, त्यात खाडाखोड आहे. हाताने ती २७ मे अशी केली आहे. शेवगाव, पाथर्डी व ५४ गावांसाठी देखभाल-दुरुस्तीकरिता प्रशासकीय मान्यता देत असताना त्याचा तपशील मात्र या विषयांबरोबर उपलब्ध करून दिलेला नाही. अंदाजपत्रक तत्काळ उपलब्ध करून देणे गरजेचे असताना ते दिड महिना विलंबाने अवलोकनासाठी दिले आहे.

सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यावर दंडात्मक कारवाईचा प्रस्ताव जिल्हा परिषदेने केला आहे. राज्य शासनाने ‘कोरोना’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कायदा लागू केला होता. जिल्हा परिषदेकडून त्याची अंमलबजावणी होण्यास विलंब का केला गेला, असा सवालही परजणे यांनी उपस्थित केला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com