Farmers Agricultural News Marathi general meeting of zillha parishad is illegal Nagar Maharashtra | Agrowon

मते मांडण्यास संधी नसल्याने नगर 'जिप'ची सभा बेकायदेशीर ः परजणे

टीम अॅग्रोवन
सोमवार, 25 मे 2020

नगर  ः जिल्हा परिषदेची बुधवारी (ता.२७) सभा बोलाविण्यात आली आहे. ही सभा लेखी प्रतिपादन सभा असताना तसा उल्लेख नोटिशीवर केलेला नाही. तसेच मागील सभेचे इतिवृत्तही दिलेले नसून सदस्यांना मते मांडण्यास संधी दिली नाही. त्यामुळे ही सभा बेकायदेशीर आहे, असे मत जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे यांनी व्यक्त केले.

नगर  ः जिल्हा परिषदेची बुधवारी (ता.२७) सभा बोलाविण्यात आली आहे. ही सभा लेखी प्रतिपादन सभा असताना तसा उल्लेख नोटिशीवर केलेला नाही. तसेच मागील सभेचे इतिवृत्तही दिलेले नसून सदस्यांना मते मांडण्यास संधी दिली नाही. त्यामुळे ही सभा बेकायदेशीर आहे, असे मत जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे यांनी व्यक्त केले.

राजेश परजणे यांनी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की जिल्हा परिषदेच्या सभेची नोटीस देताना मागील सभेचे इतिवृत्त देणे गरजेचे असताना ते दिलेले नाही. सभेत एक तासाची प्रश्नांवर चर्चा व इतर बाबी असतात, त्या कशा हे स्पष्ट नाही. या सभेच्या विषयपत्रिकेवर सभेची तारीख २७ मार्च २०२० असून, त्यात खाडाखोड आहे. हाताने ती २७ मे अशी केली आहे. शेवगाव, पाथर्डी व ५४ गावांसाठी देखभाल-दुरुस्तीकरिता प्रशासकीय मान्यता देत असताना त्याचा तपशील मात्र या विषयांबरोबर उपलब्ध करून दिलेला नाही. अंदाजपत्रक तत्काळ उपलब्ध करून देणे गरजेचे असताना ते दिड महिना विलंबाने अवलोकनासाठी दिले आहे.

सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यावर दंडात्मक कारवाईचा प्रस्ताव जिल्हा परिषदेने केला आहे. राज्य शासनाने ‘कोरोना’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कायदा लागू केला होता. जिल्हा परिषदेकडून त्याची अंमलबजावणी होण्यास विलंब का केला गेला, असा सवालही परजणे यांनी उपस्थित केला आहे.


इतर बातम्या
नगरमध्ये मागणीच्या ५० टक्केच युरिया... नगर   ः जोमात असलेल्या खरीप...
सोलापुरात खते उपलब्धता पुरेशी, दरवाढीचा...सोलापूर   ः सोलापूर जिल्ह्यात जूनअखेर...
सातारा जिल्ह्यात जाणवतेय युरियाची टंचाई सातारा   ः खरीप हंगामाकरिता रासायनिक...
पुणे जिल्ह्यात अनावश्यक खते खरेदी ...पुणे  ः शेतकऱ्यांना खरीप हंगामात खतांची...
औरंगाबाद, जालना जिल्ह्यातील पाच मंडळांत...औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद व जालना...
जळगाव जिल्ह्यात टंचाईमुळे जादा दराने...जळगाव : जिल्ह्यात यंदा पेरणी वेळेत झाली, पण...
नवापूर तालुक्यात भातासह कापूस, ज्वारीची...नवापूर, जि.नंदुरबार  ः नवापूर तालुक्यात...
औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यात...औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड आदी...
बीड विभागात १८ लाख क्विंटल कापसाची खरेदीबीड  ः राज्य कापूस पणन महासंघाच्या बीड...
महाळूंग येथील कोविड केअर सेंटरला `आयएसओ...सोलापूर : माळशिरस तालुक्‍यातील महाळूंग येथील...
नांदेड, परभणी, हिंगोलीत खतांसाठी...नांदेड : यंदा नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांनी...
नाशिक जिल्ह्यात शेतकऱ्यांची धावपळ,...नाशिक : खरीप पिकांना वाढीच्या अवस्थेत खतांची...
पीकविमा प्रस्ताव सादर करण्यासाठी ३१...परभणी : ‘‘पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गंत...
महाराष्ट्राच्या विकासात डॉ. चव्हाण...मुंबई : जनसेवा, राज्याची आणि देशाची सेवा...
गुणपत्रिकेवर कोविड १९ उल्लेख ...मुंबई: कृषी विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या...
सोलापूरसह नजीकच्या गावांमध्ये ...सोलापूर  : सोलापूर शहर आणि शेजारील...
सारंगखेडा प्रकल्पाग्रस्तांना मोबदल्याची...नंदुरबार  ः जिल्ह्यात तापी नदीवरील सारंगखेडा...
नाशिक जिल्ह्यात सोयाबीन बियाण्यांच्या...नाशिक : खरीप हंगामात जिल्ह्यातील सोयाबीनची पेरणी...
नगरमध्ये मागणीच्या ५० टक्केच युरिया...नगर ः जोमात असलेल्या खरीप पिकांसाठी युरियाची...
रेल्वेस्थानकावर नागपुरी संत्रा विक्रीला...वर्धा ः नागपूर हे मध्य भारतातील महत्त्वाचे...