Farmers Agricultural News Marathi government do not gives order for crops panchanama Pune Maharashtra | Agrowon

पुणे जिल्ह्यात नुकसानग्रस्त पिकांच्या पंचनाम्याचे आदेशच नाहीत

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 7 एप्रिल 2020

गेल्या आठ दिवसांपूर्वी आमच्या भागात अवकाळी पाऊस झाला होता. या पावसामुळे तोडणीला आलेल्या खरबुजाचे मोठे नुकसान झाले होते. त्याची माहिती कृषी विभागाने घेतली असली तरी पंचनामे अजूनही झालेले नाहीत. त्यामुळे शासनाने तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी आमची मागणी आहे.
- केशव होले, प्रगतिशील शेतकरी, बिरोबावाडी, जि. पुणे. 

पुणे  ः गत आठवड्यात पुणे जिल्ह्यातील काही भागांत अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. मात्र, ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर शासनाने या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिलेले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार आहे. 

गेल्या आठवड्यात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब पलघडमल यांनी जिल्ह्यातील पिकांच्या नुकसानीची नजर अंदाजाद्वारे माहिती घेतली. या अहवालानुसार एकूण ७०५ हेक्टरवरील ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या पिके, फळपिके तसेच शेतजमिनीला फटका बसला आहे. यामुळे जिल्ह्यातील १६७१ शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे. नैसर्गिक आपत्तीमध्ये जिरायती क्षेत्रावरील पिकांचे नुकसान नसले तरी बागायती क्षेत्रावरील पिके आणि फळपिके मिळून पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे सुरू झालेले नाहीत.

जिल्ह्यात रब्बी पिके व भाजीपाल्याचे मोठे क्षेत्र आहे. त्यापैकी मावळ, मुळशी, भोर, वेल्हा, जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर, दौड, इंदापूर, बारामती, हवेली, पुरंदर या तालुक्यांतील अनेक भागांत कमी-अधिक नुकसान झाले आहे. मात्र, कृषी विभागाकडील नजर अंदाज अहवालात बारामती, हवेली, आंबेगाव, मावळ या चार तालुक्यांतील ७१ गावांमध्ये पिकांचे नुकसान झाले असल्याचे समोर आले आहे. अगोदरच ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर अडचणीत आलेला शेतकरी अवकाळी पावसामुळे अधिकच हतबल झाला आहे. 

जिल्ह्यात सर्वाधिक ४१८.६० हेक्टरवरील गहू पिकाचे नुकसान झाले आहे. तसेच १९० हेक्टरवरील हरभरा पिकाचे, ५७ हेक्टरवरील टोमॅटोचे, ०.३० हेक्टरवरील बाजरीचे, २.९० हेक्टरवरील ज्वारीचे, १३.७५ हेक्टरवरील ज्वारीचे, १८.८० हेक्टरवरील आंब्याचे, ०.२० हेक्टरवरील कलिंगडाचे, २.१० हेक्टरवरील फुल पिकांचे नुकसान झाले आहे.
 


इतर ताज्या घडामोडी
सोलापूर जिल्ह्यात पावसामुळे महावितरणचे...सोलापूर ः महावितरणच्या अकलूज, पंढरपूर व...
वळण योजना प्रकल्प पूर्ण करा : भुजबळनाशिक : ‘‘जिल्ह्यातील पाणी पश्चिमेकडे वाहून...
कृषीकन्येकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शनबदलापूर (जि.ठाणे) ः कृषी कार्यानुभव...
मालेगावात कांदा निर्यातबंदीच्या...मालेगाव, जि. नाशिक : गेल्या महिन्यात कांद्याला...
सोलापुरातील शेतकऱ्यांनो कृषी...सोलापूर : यंदाच्या वर्षासाठीची कृषी यांत्रिकीकरण...
जीवामृत निर्मितीचे प्रात्यक्षिकनशिराबाद, जि. बुलडाणाः येथील कृषीकन्या भाग्यश्री...
हिंगोलीतील सहा मंडळात अतिवृष्टीहिंगोली :जिल्ह्यात मंगळवारी (ता.२२) सकाळी...
द्राक्ष उत्पादकांची व्यापारी,...नाशिक : सुमारे ९५ टक्के द्राक्ष व्यापारी हे...
जळगाव जिल्ह्यात केळी उत्पादकांना विमा...जळगाव : शेतकरी प्रश्‍नी शरद जोशी प्रणित शेतकरी...
दुधना नदीला पूर, पिकांत पाणीच पाणीपरभणी : सेलू तालुक्यातील ब्रम्हवाकडी येथील निम्न...
उदगीरमधील ‘देवर्जन’ सात वर्षांनंतर भरलाउदगीर : देवर्जन (ता. उदगीर) येथील मध्यम...
बीड, लातूरमधील मंडळांत दमदार पाऊसऔरंगाबाद : औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद,...
गिरणा पट्ट्यात पूर ओसरताच वाळूचा उपसा...जळगाव : गिरणा परीसरातील शेतकऱ्यांना पूर,...
सेस रद्द करा, अन्यथा बंद पुकारूपुणे ः केंद्र सरकारच्या कृषी आणि पणन विषयक तीन...
जळगावात बाजार समित्या बरखास्तीचे राजकारणजळगाव ः जिल्ह्यात दोन्ही काँग्रेस, शिवसेनेची...
शेतकऱ्यांसाठी सुखावणारा कायदा ः...कोल्हापूर ः शेती उत्पन्न व्यापार आणि वाणिज्य...
बुलडाण्यात दहा हजार हेक्टरवर क्षेत्र...बुलडाणा ः जिल्ह्यात शनिवार (ता. १९) व रविवारी (ता...
सिंधुदुर्ग जिल्ह्याला मुसळधार पावसाने...सिंधुदुर्ग ः जिल्ह्याच्या काही भागाला सोमवारी (ता...
अखेर ६६५ शेतकऱ्यांना विम्याचा लाभअकोला ः  सन २०१९ च्या खरीप हंगामात पंतप्रधान...
संत्रा वाहतुकीसाठी रेल्वेकडून वरूड...अमरावती : किसान रेल्वेच्या माध्यमातून येत्या...