Farmers Agricultural News Marathi grapes export to Netherlands England Solapur Maharashtra | Agrowon

सोलापुरातून द्राक्षांचे दोन कंटेनर नेदरलॅण्ड, इंग्लंडला रवाना

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 2 एप्रिल 2020

यंदा सततच्या आपत्तीमुळे द्राक्षनिर्यातीसाठी अडचणी आल्या. पण त्यातूनही वेळेत आम्ही सर्वोतपरी प्रयत्न करत सर्टिफिकेशन केले, याचे समाधान आहे. निर्यातीसाठी आणखी काही द्राक्षक्षेत्र शिल्लक आहे. त्याचे फायटो सर्टिफिकेशन लवकरच पूर्ण होऊन त्याचीही निर्यात होईल.
- रविंद्र माने, कृषी उपसंचालक, कृषी विभाग, सोलापूर.

सोलापूर  ः कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर परदेशात शेतीमाल निर्यातीवर निर्बंध लावण्यात आले होते. पण शेतीमाल अत्यावश्यक सेवेत येत असल्याने आणि शेतकऱ्यांचे होणारे नुकसान लक्षात घेऊन केंद्र सरकारने हे निर्बंध उठवले होते. त्यानुसार यंदाच्या हंगामातील सोलापूर जिल्ह्यातील पहिले दोन कंटेनर द्राक्षे नेदरलॅण्डसह इंग्लंडला मंगळवारी (ता.३१) रवाना झाली आहेत.

गेल्या दोन वर्षांपासून द्राक्षशेती विविध नैसर्गिक आपत्तीमुळे अडचणीत आली आहे. यंदाही या शेतीची स्थिती फारशी वेगळी नाही. त्यात नव्याने आलेल्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पुन्हा नवे संकट उभे ठाकले होते. पण सरकारने वेळीच लक्ष घालून शेतकऱ्यांसाठी मार्ग काढल्याने यंदा उशीरा का होईना पण निर्यातीचा प्रश्न सुटला आहे. सोलापूर जिल्ह्यात बार्शी, पंढरपूर आणि दक्षिण सोलापुरात तीन ठिकाणी खासगी निर्यातदारांचे पॅकहाऊस आहेत.

यंदा जानेवारी-फेब्रुवारीमध्ये आखाती देशात काही प्रमाणात द्राक्ष निर्यात झाली. पण युरोपीय बाजारपेठेत रेसिड्यु फ्री आणि अन्य तांत्रिक समस्यांमुळे निर्यातीच्या प्रक्रियेत वेळ जातो. त्यातही निर्यातीसाठी आवश्यक असणारे फायटो सॅनिटरी सर्टिफिकेशनमध्ये निर्यातदारांचा वेळ जातो. पूर्वी निर्यातदारांना पुणे किंवा मुंबईतून हे सर्टिफिकेट घ्यावे लागत होते. पण गेल्या दोन वर्षांपासून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज बिराजदार यांनी त्यासाठी पुढाकार घेत हे सर्टिफिकेशन जिल्हास्तरावरच देण्याचे नियोजन केले आहे. त्यासाठी कृषी उपसंचालक रविंद्र माने यांच्याकडे त्याची जबाबदारी आहे. निर्यातदारांकडील द्राक्ष आणि संबंधित सर्व तपासणी पूर्ण करुन वेळेत फायटो सॅनिटरी सर्टिफिकेशन निर्यातीसाठी आवश्यक आहे.

त्यानुसार यंदा देखील ही तपासणी वेळेत पूर्ण झाल्याने पहिल्या टप्प्यात मंगळवारी (ता.३१) नेदरलॅण्डला १६ टन ४८ क्विंटल आणि युकेला १६ टन ४५ क्विंटल अशी साधारण ३२ टनांहून अधिक द्राक्ष निर्यात झाली.
 


इतर अॅग्रो विशेष
ऊस गाळप यंदा वाढणार कोल्हापूर: गेल्या वर्षी महापूर व अवर्षणामुळे...
चिकन, अंड्यांची मागणी वाढली, दरात...नगर ः कोरोना व्हायरस संसर्गाच्या पार्श्वभूमीवर...
ऊस तोडणी कामगारांच्या मागण्यांबाबत साखर...पुणे: राज्यातील ऊस तोडणी व वाहतूक कामगारांच्या...
शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जाणार लालपरी सोलापूर : एक लाखांहून अधिक कर्मचारी, साडेसतरा...
राज्यात सर्वदूर हलक्या पावासाची शक्यतापुणे ः राज्यातील अनेक भागांत कमी अधिक स्वरूपात...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पाऊस पुणे ः उत्तर भारतात परतीच्या पावसासाठी पोषक...
सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी : कृषिमंत्री...कन्नड, जि. औरंगाबाद: अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक...
तीनशे टन हळद बांगलादेशाला निर्यात नांदेड : शेतीमालास अधिकचा दर मिळावा, यासाठी...
मुहूर्ताचा कापूसच कवडीयुक्त अकोला: यंदा दसऱ्याआधीच कापूस वेचणीचा मुहूर्त अनेक...
कृषी उपसंचालकानेच घातली कृषी उपक्रमांना...यवतमाळ: आत्महत्याग्रस्त अशी जागतिक स्तरावर ओळख...
महिला गट बनवितो ३० प्रकारचे मसालेइटकरे (ता.वाळवा,जि.सांगली) येथील उपक्रमशील महिला...
मराठवाड्यात काही ठिकाणी मुसळधारपुणे : राज्यातील बहुतांशी भागातील पावसाचे...
राज्यात हलक्या पावसाची शक्यतापुणे : काही दिवस राज्यात मुसळधार पाऊस...
एक हजार प्राध्यापकांनी वयाची साठी...पुणे: राज्यातील कृषी विद्यापीठांमधील...
सूक्ष्म अन्न उद्योगांना मिळणार आता दहा...पुणे: राज्यात लवकरच पंतप्रधान सूक्ष्म अन्न उद्योग...
कृषी, कामगार विधेयकांची राज्यात...पुणे : केंद्र सरकारने घाईघाईत मंजूर करुन घेतलेली...
शेतकरी आंदोलनाचे सात राज्यांत पडसादचंडीगड ः केंद्र सरकारच्या कृषी विधेयकांना विरोध...
सोयाबीन बियाणे प्लॉटना फटकाऔरंगाबाद: सध्याचे पावसाचे प्रमाण व त्यामुळे...
केळी विमा निकषांबाबत उत्सुकताजळगाव ः राज्य सरकारच्या चुकांमुळे हवामानावर...
अडीच हजार हेक्टर भातशेती सततच्या...सिंधुदुर्ग ः हळवी आणि भिजवणीची लागवड केलेली...