Farmers Agricultural News Marathi grapes sweet lime producers become in trouble Aurangabad Maharashtra | Agrowon

 मराठवाड्यात द्राक्षे, मोसंबी उत्पादकांना खर्च वसूल होण्याची चिंता

टीम अॅग्रोवन
शनिवार, 18 एप्रिल 2020

औरंगाबाद  : मराठवाड्यातील मोसंबीचा मृग बहार आणि द्राक्ष उत्पादन यंदा शेतकऱ्यांसाठी तोट्याचे ठरले आहे.मागणीच नसल्याने मिळेल त्या दरात मोसंबी व द्राक्षे विकण्याचा मार्ग स्वीकारणाऱ्या शेतकऱ्यांना यंदा उत्पादन खर्च वसूल होईल की नाही याची चिंता आहे.

औरंगाबाद  : मराठवाड्यातील मोसंबीचा मृग बहार आणि द्राक्ष उत्पादन यंदा शेतकऱ्यांसाठी तोट्याचे ठरले आहे.मागणीच नसल्याने मिळेल त्या दरात मोसंबी व द्राक्षे विकण्याचा मार्ग स्वीकारणाऱ्या शेतकऱ्यांना यंदा उत्पादन खर्च वसूल होईल की नाही याची चिंता आहे.

राज्यात मोसंबीचे उत्पादनक्षम क्षेत्र जवळपास ३३ हजार हेक्टर आहे. या क्षेत्रापैकी जवळपास २५ हजार हेक्टर क्षेत्र औरंगाबाद, जालन्यासह मराठवाड्यातील अन्य जिल्ह्यांमध्ये आहे. मराठवाड्यातून अन्य राज्यांसह मुंबई, सांगली, कोल्हापूर, पुणे, नागपूर आदी बाजारपेठांमध्ये सद्यःस्थितीत सुमारे एक हजार टन मोसंबी प्रतिदिन जाणे अपेक्षित होते. तिथे सध्या केवळ शंभर ते दिडशे टन मोसंबी जात आहे. केवळ जयपूर व कोलकता या दोनच बाजारपेठांतून मोसंबीला मर्यादित मागणी आहे. भाडेवाढीमुळे लॉकडाउनपूर्वी ८ ते १२ हजार रुपये प्रतिटन असणारे मोसंबीचे दर आता सात ते नऊ हजारांवर आले आहेत.

सद्यःस्थितीत औरंगाबाद व जालना जिल्ह्यात सुमारे ४० ते ५० हजार टन मोसंबी विक्रीच्या प्रतीक्षेत आहे. फळांचा दर्जा, देशातील विविध बाजारांमधून नसलेली मागणी आणि ३ मेपर्यंत असलेले लॉकडाउन पाहता या मोसंबीपैकी केवळ दहा ते बारा टक्केच मोसंबी विक्री होण्याची शक्यता जाणकार व्यक्त करीत आहे. तसेच आंध्र प्रदेशातील मोसंबी विक्रीसाठी तयार असून तिचा दर्जा तुलनेने चांगला असल्याने महाराष्ट्रातील मोसंबीला आंध्रप्रदेशातील मोसंबीशी टक्कर द्यावी लागणार आहे.

जालना जिल्ह्यातील कडवंची, धारकल्याण, नंदापूर, वरुड, नाव्हा आदी परिसर मराठवाड्यातील द्राक्ष आगार म्हणून ओळखला जातो. परंतु यंदा या परिसरातील द्राक्षे कवडीमोल दराने विकण्याची वेळ उत्पादकांवर आली आहे. लॉकडाउन सुरु झाल्यापासून द्राक्षे उचलण्यास व्यापारी येतच नसल्याने मिळेल त्या दरात द्राक्ष विकण्याचा मार्ग उत्पादकांनी अवलंबला आहे. अर्थात त्याचा फायदा व्यापाऱ्यांनाच जास्त होण्याची शक्यता आहे. साधारणतः ८ ते २२ रुपये प्रतिकिलो दरम्यान द्राक्षाची मोठ्या प्रमाणात विक्री झाल्याची माहिती उत्पादकांनी दिली.

एरवी मार्चमध्ये द्राक्षाला ५० ते ६० रुपये प्रति किलो दर मिळत असतो. परिसरातील जवळपास १० ते १५ टक्के द्राक्ष बागा अजूनही विक्रीच्या प्रतीक्षेत आहेत. काही शेतकऱ्यांनी विदर्भ, मराठवाड्यात थेट ग्राहकांना द्राक्ष विक्री करण्याचा मार्ग अवलंबला. परंतु त्याचे प्रमाण अल्प आहे. मिळणारे दर, होणारी परवड पाहता यंदा खर्च वसूल होईल की नाही याची चिंता असल्याचे द्राक्ष उत्पादक सांगतात.


इतर अॅग्रो विशेष
कृषी विधेयकांना वाढता विरोधनवी दिल्लीः देशभरात ठिकठिकाणी विशेषतः पंजाब आणि...
तंबी देताच फळपिकांची विमा भरपाई झाली...पुणे: फळपिक विमा योजनेतील अडवून ठेवलेली नुकसान...
कांदा उत्पादकांची सावध चाल नाशिक: केंद्राच्या वाणिज्य मंत्रालयाने कांदा...
मराठवाड्यात पावसाचे धुमशान पुणे ः मराठवाड्यात पावसाचे धुमशान सुरूच आहे....
ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी निवडणूक...मुंबई: कोरोनामुळे स्थगित करण्यात आलेल्या आणि...
हलक्या पावसाची शक्यता पुणे ः बंगाल उपसागराच्या ईशान्य परिसरात उद्या (ता...
शेतकऱ्यांना उभारी देणारी संत ज्ञानेश्‍...किनखेडा (ता.रिसोड,जि.वाशीम) येथील प्रगतशील शेतकरी...
बाजार स्वातंत्र्यांची मागणी पूर्ण पुणेः केंद्र सरकारने सादर केलेल्या शेती आणि पणन...
गुणवत्तापूर्ण हळद, डाळींची थेट...सनपुरी (जि. परभणी) येथील प्रयोगशील शेतकरी नरेश...
मराठवाड्यात जोरदार पावसाचा पिकांना फटकाऔरंगाबाद, परभणी : औरंगाबाद, जालना, बीड, लातूर,...
हजारो टन कांदा निर्यातीच्या प्रतीक्षेतमुंबई/नाशिक : देशभरात कांदा निर्यातबंदी...
बीटी वांग्याच्या दुसऱ्या टप्प्यातील...पुणे : देशभरात चर्चेत असलेल्या बीटी वांग्याच्या...
साखर निर्यातीचे करार ५७ लाख टनांवरकोल्हापूर : देशातल्या साखर निर्यातीचे करार आता ५७...
तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यतापुणे ः बंगालचा उपसागर व उत्तर तामिळनाडूच्या...
दूध सल्लागार समिती कागदावरचपुणे : राज्यस्तरीय दूध सल्लागार समितीची एकही बैठक...
राज्यात मोसंबी १००० ते ४००० रुपये...औरंगाबादमध्ये १००० ते २५०० रुपये प्रतिक्विंटल...
कांदा, लसूण शेतीत बहिरवाडीने मिळवली...बहिरवाडी (ता. जि. नगर) हे छोटे गाव कांदा व लसूण...
स्पर्धेत टिकण्यासाठी ‘ई-नाम’केंद्र सरकारने कृषी, पणन व्यवस्थेत सुधारणा घडवून...
बाजार सुधारणांत नको राजकीय धुळवडकोरोनाच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या संसद...
सुपारी फळगळीचे संकटसिंधुदुर्ग: मुसळधार झालेला पाऊस आणि सतत ढगाळ...