गंगा खोऱ्यात भूजल पातळीत लक्षणीय घट

सुमारे २८ राज्ये आणि जम्मू-काश्मीरमधील एका केंद्रशासित प्रदेशातील पर्जन्यमानातील बदलाबाबत ‘पावसाची अस्थिरता आणि बदल’ अशा आशयाचा एक अहवाल पृथ्वी विज्ञान मंत्रालयातर्फे तयार करण्यात येत आहे. — एम. राजीवन, सचिव,पृथ्वी विज्ञान मंत्रालय.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नवी दिल्ली  ः यंदा मॉन्सून काळात पावसात प्रमाणापेक्षा अधिक खंड पडल्याने गंगा खोऱ्यातील भूजल पातळीत अपेक्षित प्रमाणात वाढ झाली नाही. परिणामी भूजल पातळीत आणि सिंचनासाठीच्या जलस्रोतांमध्ये लक्षणीय घट झाल्याची गंभीर बाब एका अहवालातून समोर आली आहे. 

गंगा खोऱ्यातील उपलब्ध पाण्याची स्थिती आणि पावसाच्या प्रमाणाबाबतचा अहवाल गत सप्ताहात राज्यसभेत नुकताच सादर करण्यात आला. या अहवालातील माहिती पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी संसदीय समितीला दिली आहे. या अहवालानुसार, यंदा गंगा खोऱ्यातील दिल्ली, बिहार, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये पावसाचे प्रमाण कमी होते. तसेच पावसाच्या खंडाचा कालावधीदेखील अधिक होता; त्यामुळे भूजल पातळीत अपेक्षित वाढ होऊ शकली नाही तसेच कृषी क्षेत्रावरही याचा परिणाम झाला आहे. कमी तीव्रतेचा वारंवार पडणार पाऊस हा भूजल पुनर्भरण आणि मातीतील ओलावा टिकून राहण्यासाठी उपयुक्त ठरतो, परंतु अशा पावसाचे प्रमाण या प्रदेशांमध्ये कमी होते, असे पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव एम. राजीवन यांनी समितीला सांगितले. 

गेल्या तीस वर्षांत बिहार, मेघालय, नागालॅंड, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, अरुणाचल प्रदेश आणि हिमाचल प्रदेशात वार्षिक पर्जन्यमानात लक्षणीय घट झाली आहे, तसेच काही जिल्ह्यांमध्ये होणाऱ्या पावसाच्या प्रमाणात लक्षणीय बदल नोंदले गेले आहेत. पावसाचा खंड, पावसाचे दिवस (ज्यात दररोज २.५ मिमी परंतू ७ सेंटिमीटरपेक्षा कमी पाऊस) आणि अतिपावसाच्या घटना (ज्यात ७ सेंटिमीटर व त्यापेक्षा अधिक पाऊस) याबाबत संसदीय समितीला माहिती दिल्याचे श्री. राजीवन यांनी नमूद केले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com