Farmers Agricultural News Marathi heat wave in several parts of country Pune Maharashtra | Page 2 ||| Agrowon

राजस्थानातील चुरूत ५० अंशांवर तापमान; महाराष्ट्रातही उष्णतेची लाट

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 28 मे 2020

पुणे  : महाराष्ट्रासह, वायव्य आणि मध्य भारतातील राज्यांमध्ये उष्णतेची लाट आहे. बुधवारी (ता.२७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राजस्थानातील चुरू येथे देशातील उच्चांकी ५० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

पुणे  : सूर्य अक्षरश: आग ओकत असल्याने महाराष्ट्रासह, वायव्य आणि मध्य भारतातील राज्यांमध्ये उष्णतेची लाट आहे. बुधवारी (ता.२७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राजस्थानातील चुरू येथे देशातील उच्चांकी ५० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

विदर्भातील अकोला येथे राज्यातील उच्चांकी ४६.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात आज (ता.२८) उष्णतेची लाट कायम राहणार आहे. पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान होत असल्याने शुक्रवारपासून (ता.२९) कमाल तापमानात काहीशी घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. 

राजस्थानच्या फालोदी येथे १९ मे २०१६ रोजी देशातील आत्तापर्यंतच्या उच्चांकी ५१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. याच दिवशी चुरू येथे आत्तापर्यंतच्या उच्चांकी ५०.२ तापमान नोंदले गेले होते. त्यानंतर बुधवारी (ता.२७) पुन्हा तापमानाचा पारा ५० अंश सेल्सिअसवर पोचला आहे. या पाठोपाठ दिल्ली येथे ४७.६ अंश, राजस्थानच्या बिकानेर येथे ४७.४, गांधीनगर येथे ४७ अंश, उत्तर प्रदेशातील झांशी येथे ४७ अंश, राजस्थानमधील पिलानी येथे ४६.९ अंश, तर महाराष्ट्रातील अकोला येथे ४६.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. 

उत्तर आणि वायव्य दिशेने मध्य व दक्षिण भारताकडे येणारे कोरडे वारे, उन्हाचा वाढलेला ताप यामुळे राजस्थान, पंजाब, हरियाणा, मध्य प्रदेश, गुजरात महाराष्ट्रात उन्हाचा चटका वाढला आहे. महाराष्ट्रातील परभणी, नांदेड, अकोला, अमरावती, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, वर्धा येथे उष्ण लाट आली आहे.

उत्तर भारतात पश्‍चिमी चक्रावाताची निर्मिती झाल्याने आजपासून (ता.२८) या भागात पावसाची शक्यता आहे. परिणामी दोन दिवसांत उत्तर आणि वायव्य भारतातील राज्यांमध्ये कमाल तापमानात घट होण्याची शक्यता आहे. त्यापाठोपाठ शुक्रवारपासून (ता.२९) विदर्भासह महाराष्ट्राच्या तापमानातही घट होण्याची शक्यता आहे. 
 
बुधवारी (ता. २७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३७.६, धुळे ४३.६, जळगाव ४४.७, कोल्हापूर ३६.१, महाबळेश्‍वर ३१.२, मालेगाव ४४.६, नाशिक ३७.५, निफाड ३९.०, सातारा ३८.८, सांगली ३८.४, सोलापूर ४४.६, डहाणू ३४.७, सांताक्रूझ ३४.१, रत्नागिरी ३४.८, औरंगाबाद ४२.५, परभणी ४५.५, नांदेड ४५.५, अकोला ४६.५, अमरावती ४६.६, बुलडाणा ४३.०, ब्रह्मपुरी ४३.९, चंद्रपूर ४५.२, गोंदिया ४५.०, नागपूर ४६.८, वर्धा ४६.०. 
 
शनिवारपासून पूर्वमोसमी पाऊस 
बंगालच्या उपसागरात आलेल्या ‘अम्फान’ चक्रीवादळाने बाष्प ओढून नेल्याने राज्यात गेल्या आठ दिवसांपासून पूर्वमोसमी पाऊस थांबला आहे. राज्यात पुन्हा पावसाला पोषक हवामान होत आहे. कोकणात आजपासून (ता.२८) तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तर शनिवारपासून (ता.३०) राज्याच्या सर्वच विभागात वादळी वाऱ्यासह पूर्वमोसमी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. अरबी समुद्रात तयार होत असलेल्या कमी दाब क्षेत्रामुळे जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज्यभर पूर्वमोसमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. 


इतर अॅग्रो विशेष
पुण्यात शेतमाल पुरवठा देखील बंद पुणे: कोरोनाची उफाळून आलेली साथ रोखण्यासाठी...
देशाच्या सूत निर्यातीत मोठी घट जळगाव ः कोरोना व इतर संकटांमध्ये देशातील सूत...
मराठवाड्यात २६ टक्के पीककर्ज वितरणऔरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत...
कृषी निविष्ठा विक्रेत्यांचा राज्यात बंद...औरंगाबाद: कृषी निविष्ठा विक्रेत्यांच्या...
राज्यात पावसाला पोषक हवामानपुणे : राज्यात पावसाला पोषक हवामान होत असल्याने...
जलसंधारण,शिक्षण अन् कृषी विकासाचा रचला...सुदृढ, आत्मनिर्भर समाज घडविणे या उद्देशातून जळका...
दुग्ध व्यवसाय ठरतोय शेतीला आधारपनवेल येथील बांधकाम व्यावसायिक अनिल लक्ष्मण...
कृषी आयुक्त दिवसेंची बदली, गायकवाड...मुंबई : राज्य सरकारने शनिवारी महत्त्वपूर्ण...
कृषी निविष्ठा विक्रेत्यांना आरोपी नव्हे...पुणे : राज्यात खते, बियाणे, कीटकनाशकांची विक्री...
आनंदाची पातळी बदलतेय उत्पन्नांनुसारआजच्या जगामध्ये सामाजिक आर्थिक निकषांमध्ये वेगाने...
शेती क्षेत्रातील बदल टप्याटप्याने...नागपूर ः शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत कृषी...
राज्यात कृषी सेवा केंद्रांचा बंद सुरूपुणेः सोयाबीन बियाणे न उगवल्या प्रकरणी...
औरंगाबाद जिल्ह्यातील थेट शेतमाल विक्री...औरंगाबाद : कोरोना संकटामुळे शेतकरी ते ग्राहक...
रुतलेले अर्थचक्राने विकासालाही ‘ब्रेक’''मूडी'' या पतमानांकन संस्थेने अलीकडेच आपला अहवाल...
बेलखेडा होणार संत्रा उत्पादक गावरिसोड, जि. वाशीम ः तालुक्यातील दोन हजार लोकसंख्या...
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात...सोलापूर ः  आषाढी यात्रेच्या कालावधीसाठी श्री...
बियाणे प्रमाणीकरण यंत्रणेचा कारभार...नागपूर ः ‘शुध्द बिजापोटी फळे रसाळ गोमटी’ असे...
राज्यात पावसाचा कमी अधिक जोर पुणे : राज्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात आज वादळी...पुणे : कोकणात अनेक ठिकाणी पावसाचा मुसळधार पाऊस...
‘रायरेश्‍वर ’ गटाचा; सेंद्रिय हळदीचा...नाटंबी (ता. भोर, जि. पुणे ) येथील श्री. रायरेश्वर...