Farmers Agricultural News Marathi incubation program farmers producers companies Nashik Maharashtra | Agrowon

पीकपद्धतीनुसार शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करा ः कृषिमंत्री दादा भुसे

टीम अॅग्रोवन
रविवार, 16 फेब्रुवारी 2020

‘सह्याद्री’सारखे मॉडेल्स राज्याच्या सर्व भागांत सुरु होण्याबाबत विचार पुढे आला. त्या पार्श्वभूमीवर राज्यभरात स्थापन झालेल्या २ हजार कंपन्यांना सक्षम करण्यासाठी सह्याद्री डिजिटल इम्पॅक्ट स्क्वेअर या कंपनीच्या सहकार्याने एफपीसी इन्क्युबेशन सेंटर सुरू करण्यात येईल. पुढील दोन महिन्यांत हे काम सुरु होणार आहे.
— विलास शिंदे, अध्यक्ष, सह्याद्री फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी.

नाशिक  : आपल्या विभाग, जिल्ह्यातील पीकपद्धतीचा प्राधान्याने विचार करून शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना करावी. शेती फायद्याची करायची असेल तर शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी एकत्र आले पाहिजे. त्यांनी केवळ अनुदान व लाभाच्या अपेक्षेने यात न येता समर्पित होऊन काम करावे, असे आवाहन कृषिमंत्री दादा भुसे यांनी केले. 

मोहाडी येथील सह्याद्री फार्म येथे शुक्रवारी (ता. १४) शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी इन्क्युबेशन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या वेळी मंत्री भुसे बोलत होते. या वेळी कृषी सचिव एकनाथ डवले, कृषी आयुक्त सुहास दिवसे, ‘स्मार्ट’ योजनेचे अतिरिक्त संचालक तांबारे, फलोत्पादन संचालक जमधाडे, वर्ल्ड बँकेचे सल्लागार विजय शेखर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय पडवळ, सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष विलास शिंदे उपस्थित होते. या वेळी श्री.डवले म्हणाले, की इन्क्युबेशन सेंटरच्या माध्यमातून शेतकरी उत्पादक कंपन्यांना सक्षम करण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्यक ती पावले उचलून काम करण्यात येईल. 

श्री. दिवसे यांनी ‘स्मार्ट’योजनेच्या उपक्रमांची माहिती दिली. ते म्हणाले,की येत्या काळात इन्क्युबेशन सेंटरच्या माध्यमातून कंपन्यांचे बळकटीकरण करण्यात येईल.
विलास शिंदे व टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे संदीप शिंदे यांनी इन्क्युबेशन सेंटर या संकल्पनेचे सादरीकरण केले.‘टाटा स्ट्राइव्ह’चे अमेय वंजारी यांनी कौशल्यविकास प्रशिक्षण कार्यक्रमांची माहिती दिली. विभागीय अधीक्षक कृषी अधिकारी सुनील वानखेडे यांनी सूत्रसंचालन केले. 

‘‘सह्याद्री’सारख्या शंभर कंपन्या उभ्या राहव्यात’
फार्मर्स प्रोड्युसर कंपनी ही संकल्पना उपयुक्त आहे. ‘सह्याद्री’सारख्या राज्यभरात शेतकऱ्यांच्या किमान शंभर कंपन्या उभ्या राहव्यात ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची संकल्पना आहे. येत्या काळात त्यास गती देण्यात येईल. तसेच अडचणीतील कंपन्यांनाही सहकार्य केले जाणार आहे, असे कृषिमंत्री दादा भुसे यांनी सांगितले.

शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या प्रतिनिधींच्या मागण्या 

  • जीआयप्राप्त उत्पादनांसाठी विक्री व्यवस्था उभी करण्याकरिता सहकार्य करा.
  • कंपन्यांच्या खरेदी-विक्री प्रक्रियेतील जीएसटी माफ करा.
  • वीजपुरवठ्याबाबत असलेल्या अडचणी सोडविण्यासाठी पुढाकार घ्या.

इतर ताज्या घडामोडी
विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांची ओवाळली आरतीअकोला ः ग्रामीण भागात ‘कोरोना’ची धास्ती वाढलेली...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात केळी...नांदेड : लॅाकडाऊनमुळे वाहतुकीवर परिणाम झाला आहे....
मुंबई बाजार समितीत फळांची आवक वाढली मुंबई : जीवनावश्यक वस्तूंचा योग्य पुरवठा व्हावा,...
आंब्याची वाहतूक, वितरण व्यवस्थेतील...मुंबई : एप्रिलपासून आंब्याचा हंगाम सुरू झाला आहे...
कोल्हापुरात वाहतुक बंदीचा रेशीम कोषाला...कोल्हापूर : वाहतूक बंद असल्यामुळे शेतकऱ्यांचे...
मुख्यमंत्री साहायता निधीसाठी ‘कृषी’च्या...नाशिक: कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे...
खानदेशात कडब्याच्या दरांवर दबाव जळगाव : खानदेशातून परराज्यासह इतर जिल्ह्यांत कडबा...
मदत व पुनर्वसन मंत्री देणार ४० हजार...चंद्रपूर ः खऱ्या अर्थाने पालकत्वाची जबाबदारी पार...
खानदेशात धान्याची शिवार खरेदी, मार्केट...जळगाव : खानदेशात धान्याची शिवार खरेदी बंद आहे....
भंडारा बॅंक देणार १५ एप्रिलपासून...भंडारा ः ‘कोरोना’ विषाणूचा प्रादुर्भाव...
नंदुरबार जिल्ह्यात पपईची कवडीमोल दराने...नंदुरबार : लॉकडाऊनचा फटका सर्वसामान्य...
जळगाव जिल्ह्यातील बॅंका पीक कर्ज...जळगाव : जिल्ह्यात अपवाद वगळता बॅंकांनी नव्याने...
हिंगोलीत एका व्यक्तीचा कोरोना चाचणी...हिंगोली : हिंगोली येथील जिल्हा रुग्णालयात भरती...
शब-ए-बारात, डॉ. आंबेडकर जयंतीला घरुनच...मुंबईः सध्या ‘कोरोना’ने सर्वत्र धुमाकूळ घातला...
खासगी डेअरीची संकलन यंत्रणा तोकडी;...नांदेड ः ‘कोरोना’ विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी...
नाशिक बाजार समितीमध्ये केवळ लिलावाला...नाशिक : ‘कोरोना’ विषाणूच्या वाढत्या...
पुणे, मुंबईत भाजीपाल्याची घरपोच सुविधा पुणे ः शहरातील नागरिकांसाठी भाजीपाला पुरवठा...
पुसदमध्ये शेतकरी कंपन्यांतर्फे...यवतमाळ : ‘लॉकडाऊन’च्या पार्श्‍वभूमीवर पुसद येथे...
लातूर जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक...चापोली, जि. लातूर : ‘कोरोना’चा फैलाव...
कोरोना’च्या संकटामुळे माळेगावचे गाळप...माळेगाव, जि. पुणे ः माळेगाव सहकारी साखर...