Farmers Agricultural News Marathi Insurance scheme for paddy and nachani crops Ratnagiri Mahrashtra | Agrowon

रत्नागिरी जिल्ह्यात भात, नाचणी पिकासाठी विमा योजना लागू

टीम अॅग्रोवन
रविवार, 12 जुलै 2020

रत्नागिरी  : रत्नागिरी जिल्ह्यात भात, नाचणी या पिकांसाठी खरीप हंगामाकरिता पंतप्रधान पीक विमा योजना लागू करण्यात आलेली आहे. त्यासाठी इफ्को टोकीओ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या कंपनीची नेमणूक केली असून कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ही योजना ऐच्छिक आहे.

रत्नागिरी  : रत्नागिरी जिल्ह्यात भात, नाचणी या पिकांसाठी खरीप हंगामाकरिता पंतप्रधान पीक विमा योजना लागू करण्यात आलेली आहे. त्यासाठी इफ्को टोकीओ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या कंपनीची नेमणूक केली असून कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ही योजना ऐच्छिक आहे.

खातेदारांव्यतिरिक्त कुळाने अगर भाडेपट्टी पद्धतीने शेती करणारे शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. या योजनेमध्ये जोखमीची व्याप्ती वाढविण्यात आली असून पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, वादळ, चक्रीवादळ, पूर, क्षेत्र जलमय होणे, भुस्खलन, दुष्काळ, पावसातील खंड, कीड व रोग इत्यादी बाबींमुळे पिकांच्या उत्पन्नात येणारी घट या बाबींचा समावेश केला आहे.

कर्जदार शेतकऱ्यांना योजनेत सहभागी होण्याचा वा न होण्याचा पर्याय आहे. सहभागी न होण्याबाबतचे घोषणापत्र या शेतकऱ्यांना द्यावे लागणार आहे. जे शेतकरी स्वत:च्या स्वाक्षरीसह योजनेत सहभागी न होण्याबाबत घोषणापत्र देणार नाहीत, त्या सर्वांना योजनेत सहभाग बंधनकारक समजला जाईल. योजनेत सहभागी होणेबाबत अथवा न होणेबाबत घोषणपत्र शेतक-यांनी ज्या बँकेत किसान क्रेडीट कार्ड खाते आहे, ज्या बँकेकडून पीक कर्ज घेतले आहे त्या बँकेच्या शाखेमध्ये जमा करणे अपेक्षित आहे.

कर्जदार व बिगर कर्जदार शेतक-यांना विमा प्रस्ताव सादर करण्याची अंतिम मुदत ३१ जुलैपर्यंत आहे. भात पिकासाठी प्रति गुंठा शेतकरी हिस्सा रक्कम ९ रुपये १०पैसे तर विमा संरक्षित रक्कम ४५५ रुपये आहे. नाचणी पिकासाठी प्रति गुंठा शेतकरी हिस्सा रक्कम ४ रुपये तर विमा संरक्षित रक्कम २०० रुपये इतकी आहे. 

या योजनेत भाग घेण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज, आधार कार्ड, आधार नोंदणीची प्रत, सात बारा उतारा, भाडेपट्टा करार असलेल्या शेतक-यांचा करारनामा, सहमती पत्र, पेरणी घोषणापत्र, बॅंक पासबुकची छायांकित प्रत आदी कागदपत्रे आवश्यक आहेत. जिल्ह्यातील सर्व शेतक-यांनी पीक विमा योजनेत सहभागी होण्याचे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.


इतर ताज्या घडामोडी
खानदेशात भिज पावासाने पिकांना लाभजळगाव  ः खानदेशात मागील दोन दिवस भिज पाऊस...
सोलापूर जिल्ह्यात मूगाची पाने पिवळी पडू...सोलापूर  ः जिल्ह्यात पावसाने वेळेवर हजेरी...
प्राथमिक शिक्षकांच्या प्रशासकीय बदल्या...कुसुंबा, जि. धुळे ः सर्वांत मोठा नोकर वर्ग म्हणून...
बार्शीतील रेशनच्या धान्य...सोलापूर  ः बार्शी तालुक्यातील रेशनचे धान्य...
शेत जमिनीच्या मोजणीसाठी चार हजार...सोलापूर ः पती-पत्नीच्या नावावर असलेल्या...
‘आयआयएचआर’चे बियाणे आता ऑनलाइन नाशिक : भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या बंगळुरू...
मराठवाड्यात पीक कर्जाचे ४०.८३ टक्केच...औरंगाबाद : मराठवाड्यात शेतकऱ्यांना खरीप पीक...
पुणे जिल्ह्यातील सहा धरणांत ८०...पुणे ः धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम...
सातारा जिल्हा बँकेतर्फे १३४ टक्के...सातारा : जिल्हा वार्षिक पत आराखाड्यात २०२०-२१...
जनावरांमध्ये `लंपी स्किन`चा संसर्ग नांदेड  ः अर्धापूर परिसरात गाय, बैल आदी...
नांदेड जिल्ह्यातील एक लाख ९२ हजार...नांदेड  ः यंदा जिल्ह्यातील २ लाख ६८ हजार...
ओसंडून वाहतोय आडोळ प्रकल्पशिरपूरजैन, जि. वाशीम ः दमदार पावसामुळे येथील आडोळ...
काटेपूर्णा प्रकल्प तुडुंब, पाणी साठ्यात...अकोला ः यंदाच्या मोसमात आत्तापर्यंत वेगवेगळ्या...
अकोला जिल्ह्यात युरिया खताचा वापर वाढलाअकोला ः जिल्ह्यामध्ये मागील वर्षाच्या तुलनेत...
राधानगरी धरणाचे दोन दरवाजे खुलेचकोल्हापूर : जिल्ह्याच्या पश्‍चिमेकडील...
नाशिक शहरात बैलपोळा साहित्याच्या...नाशिक : गेल्या वर्षांपासून शेतीमालाचे नुकसान व...
मालेगाव तालुक्यात भाजीपाल्यासह खरीप...नाशिक : मालेगाव तालुक्यातील पश्चिम भागात झालेल्या...
येलदरीच्या दोन दरवाजातून विसर्गपरभणी : बुलडणा जिल्ह्यातील खडकपूर्णा धरणातील...
सांगली जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरलासांगली ः जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला आहे....
नाशिकमध्ये ढोबळी मिरची प्रतिक्विंटल...नाशिक  : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...