Farmers Agricultural News Marathi Jillha parishad Corona Remedy Pathfinder Pune Maharashtra | Agrowon

पुणे जिल्हा परिषदेच्या ‘कोरोना’बाबत उपाययोजना पथदर्शी : केंद्रीय समिती

टीम अॅग्रोवन
शनिवार, 25 एप्रिल 2020

पुणे  : कोरोना प्रतिबंधासाठी पुणे जिल्हा परिषदेने केलेल्या उपाययोजना सर्वांसाठी पथदर्शी आहेत. नागरिकांच्या समस्यांना तातडीने प्रतिसाद देण्यासाठी सुरू करण्यात आलेले नियंत्रण कक्ष हा उपक्रम स्तुत्य असून, जिल्ह्यातील कोरोनासह विविध समस्या तातडीने सोडवण्यात येत आहेत. हा उपक्रम भविष्यातही सुरू ठेवावा, अशा सूचना पुण्यात आलेल्या केंद्रीय समितीने केल्या आहेत.

पुणे  : कोरोना प्रतिबंधासाठी पुणे जिल्हा परिषदेने केलेल्या उपाययोजना सर्वांसाठी पथदर्शी आहेत. नागरिकांच्या समस्यांना तातडीने प्रतिसाद देण्यासाठी सुरू करण्यात आलेले नियंत्रण कक्ष हा उपक्रम स्तुत्य असून, जिल्ह्यातील कोरोनासह विविध समस्या तातडीने सोडवण्यात येत आहेत. हा उपक्रम भविष्यातही सुरू ठेवावा, अशा सूचना पुण्यात आलेल्या केंद्रीय समितीने केल्या आहेत.

जिल्ह्यातील कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना, शासकीय यंत्रणेच्या कार्यपद्धतींची पाहणी करण्यासाठी केंद्रीय समिती जिल्ह्यात आली होती. या समितीत उर्जा मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव संजय मल्होत्रा, केंद्रीय आरोग्य सेवेचे अतिरिक्त महासंचालक डॉ. पी. के. सेन, राष्ट्रीय आपत्ती निवारण विभागाचे संयुक्त सल्लागार डॉ. पवन कुमार सिंग, डॉ. अरविंद अलोने, अन्न आणि पुरवठा विभागाचे संचालक करमविर सिंग यांचा समावेश आहे. या समितीने पुणे जिल्हा परिषदेला भेट देत कामकाजाची माहिती घेतली. यावेळी विभागीय आयुक्त दिपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद उपस्थित होते. .

जिल्हा परिषदेतर्फे राबविण्यात येणा-या एकात्मिक रोग सर्वेक्षण कार्यक्रमाची समितीने माहिती घेतली. या सर्वेक्षणाअतंर्गत माहिती घेताना राज्य शासन आणि केंद्राकडून वेगवेगळी माहिती मागविली जाते. तसेच रूग्णांची माहिती घेतानाही वेळ लागतो. यामुळे दोन्ही यंत्रणांनी एकत्र माहिती घेतल्यास वेळेची बचत होईल, अशी मागणी आयुष प्रसाद यांनी समितीकडे केली. जिल्हाधिकाऱ्यांच्या सुचनेनुसार जिल्हा परिषदेत नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या कक्षात टोल फ्री क्रमांकावर नागरिकांच्या आरोग्य विषयक तसेच इतरही तक्रारी येत असून, त्याचे तत्काळ निरसन केले जात आहे. जिल्ह्यात आशा सेविकांमार्फत करण्यात येत असलेल्या सर्वेक्षणाचेही कौतूक समितीने केली. या कक्षात निवारण करण्यात आलेल्या एका तक्रारदाराला समितीने फोन करत माहिती घेतली.

ग्रामीण भागात ‘कोरोना’वर चांगल्या पद्धतीने नियंत्रण
जिल्हा परिषदेने ग्रामीण भागात कोरोना प्रतिबंधासाठी अनेक उपाय योजना केल्या. आरोग्य यंत्रणेमार्फत मिळणारा तत्काळ प्रतिसाद, जिल्ह्यात होणारे सर्वेक्षण यामुळे कोरोना रूग्णांची संख्या कमी आहे. हे यंत्रणेचे यश आहे, असे मत समितीतील अधिकाऱ्यांनी व्यक्त केले. महापालिका, कॅन्टोमेंन्ट परिसरात रूग्णांची संख्या जास्त दिसत असल्याने प्रभावी उपाययोजना करून ही संख्याही नियंत्रित करावी अशा सुचना समितीने केल्या.
 


इतर ताज्या घडामोडी
दहा हजाराची लाच स्वीकारणारा हुलजंतीचा...सोलापूर ः खरेदी केलेल्या जमीन दस्तावर दाखल...
`जतमध्ये मूग, उडीद खरेदी केंद्र सुरू...सांगली :जिल्ह्यात मूग व उडीद हमीभावाने खरेदी...
सांगलीत २८ टक्क्यांवरच ऊस लागवडसांगली :  जिल्ह्यात गेल्या आठवड्यापूर्वी...
खानदेशातील बाजारात उडदाच्या आवकेत घटजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...
नाशिकमध्ये खासदारांच्या घरासमोर  'राख...नाशिक : केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने...
नगर जिल्ह्यात कांदा बियाणे गरज,...नगर ः जिल्ह्यात दरवर्षी सुमारे एक लाख...
अकोटमध्ये अतिवृष्टीने कपाशी पाण्याखालीअकोला ः आजवर झालेल्या सततच्या पावसाने अकोट...
बुलडाण्यातील नुकसानीचे पंचनामे करून...बुलडाणा : पावसामुळे नुकसान झालेल्या क्षेत्राचे...
सातगाव पठारावर नुकसानग्रस्त बटाट्याचे...पुणे :‘‘लांबलेला मॉन्सून, सततचा कोसळणारा वादळी...
गाव पातळीवरील बैठका, सभा तात्पुरती...अकोला ः कोवीड १९ च्या वाढत्या प्रभावामुळे गाव...
नोकर भरतीची वयोमर्यादा वाढवाः...चंद्रपूर : कोरोना संकटामुळे या वर्षात नोकरीकरता...
लातूर, उस्मानाबादेत एक लाख ४१ हजार...उस्मानाबाद / लातूर : लातूर व उस्मानाबाद...
औरंगाबाद, जालन्यात पावसाचा जोर कायमऔरंगाबाद : बीड, लातूर, उस्मानाबाद, परभणी, नांदेड...
मजुरांना कष्टाचे तरी पैसे मिळावेत नगर ः राज्यातील साखर कारखान्यांची तब्बल ८० हजार...
पोषक चाऱ्यासाठी ओट लागवडजनावरांच्या हिरव्या चाऱ्यासाठी अधिक पोषणमूल्य...
राज्यात सोयाबीन २५०० ते ३९७४ रुपये नगरमध्ये ३००० ते ३७०० रुपये  नगर येथील...
कोरडवाहू क्षेत्रातील रब्बी पीक नियोजनकोरडवाहू  भागातील जमिनीतील ओलावा हा...
हरभऱ्याच्या अधिक उत्पादनासाठी फुले...महात्मा फुले कृषि विदयापिठाने कंबाईन हार्वेस्टरने...
मानवी आहारासाठी पोषणयुक्त जैवसंपृक्त वाणजैवसंपृक्त पिकांची लागवड केल्यास पौष्टिक व...
सामूहिकपणे शंखी गोगलगायींचे नियंत्रण...शंखी गोगलगायी जून ते सप्टेंबर या कालावधीत जास्त...