मराठवाड्यात करडईची साडेअठरा हजार हेक्टरवर पेरणी

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

लातूर : कधी काळी मोठ्या प्रमाणात पेरणी होत असलेल्या करडईचे क्षेत्र सातत्याने घटत चालले आहे. यंदा मराठवाड्यातील रब्बी हंगामातील एकूण क्षेत्रापैकी केवळ १८ हजार ५७२  हेक्‍टरवर करडईची पेरणी झाली असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली. 

औरंगाबाद, जालना व बीड जिल्ह्यांत यंदा सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत अधिक क्षेत्रावर रब्‍‌बी पिकांची पेरणी झाली आहे. यात ज्वारीचे सर्वाधिक ३ लाख ५८ हजार हेक्‍टर क्षेत्र आहे. त्यापाठोपाठ हरभऱ्याची ३ लाख १ हजार हेक्‍टरवर पेरणी झाली आहे. गव्हाची १लाख ९५ हजार, मकाची ५१ हजार ५६६, तिळाची एक, मोहरीची २०४, जवसाची १५९, सूर्यफुलाची १३  तर करडईची ९६४ हेक्‍टरवर पेरणी झाली आहे. बीड जिल्ह्यात सर्वाधिक ५२० हेक्‍टरवर, जालना जिल्ह्यात ३२१ हेक्‍टरवर तर औरंगाबाद जिल्ह्यात १२३ हेक्‍टरवर करडईची पेरणी झाली आहे. 

लातूर कृषी विभागांतर्गत लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी व हिंगोली या पाच जिल्ह्यांत करडईचे सर्वसाधारण क्षेत्र ७६ हजार २९१ हेक्‍टर आहे. मात्र, प्रत्यक्षात १७ हजार ६०८ हेक्‍टरवर करडईची पेरणी झाली. यात लातूरमधील ४ हजार ८५६, उस्मानाबादमधील ५ हजार ८५६, नांदेडमधील १ हजार ४९८, परभणीमधील ५ हजार २९८ तर हिंगोलीतील १० हेक्‍टरचा समावेश असल्याची माहिती कृषी विभागाच्यावतीने देण्यात आली. 

अशी आहे करडई पेरणी  औरंगाबाद कृषी विभागातील तीन जिल्ह्यांत ९६४ हेक्‍टर आणि लातूर कृषी विभागांतर्गत पाच जिल्ह्यांत १७ हजार ६०८ हेक्‍टरवर करडईची पेरणी झाली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com