खडकी ग्रामस्थांनी केल्या गावसीमा बंद

भंडारा ः केंद्र सरकारकडून जारी करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्‍वभूमीवर खडकी ग्रामस्थांनी आपल्या गावाच्या सीमा बंद केल्या आहेत. यासाठी गावच्या सीमेवर लाकडे व झाडाच्या फांद्या टाकण्यात आल्या आहेत.
 संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

भंडारा ः केंद्र सरकारकडून जारी करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्‍वभूमीवर खडकी ग्रामस्थांनी आपल्या गावाच्या सीमा बंद केल्या आहेत. यासाठी गावच्या सीमेवर लाकडे व झाडाच्या फांद्या टाकण्यात आल्या आहेत.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात आहे. केंद्र सरकारने देखील १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहिर केला आहे. खडकी ग्रामस्थांनी आपल्या भागातून होणारी वाहतूक वळवली आहे. पालोरा-बोरगाव-खडकी बसस्टॉप बायपास मार्गे आता वाहतूक होत आहे. त्यामुळे वाहतूकीचा त्रास कमी होण्यासोबतच संसर्गाचा धोकाही कमी राहणार आहे. 

शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी करणे हा यामागील उद्देश असून ग्रामस्थांचे विषाणूपासून संरक्षणाही यातून साधले जात आहे, अशी माहिती तंटामुक्‍त गाव समितीचे अध्यक्ष राजेश धुर्वे यांनी दिली. गावात आलेल्या एका बाहेरील कुटूंबाला तत्काळ आरोग्य तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या. मोहिमेसाठी सरपंच सरिता धांडे, पोलिस निरीक्षक निलेश वाजे यांचे सहकार्य मिळत असल्याचेही सांगण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com