Farmers Agricultural News Marathi Kharip season planning review meeting Satara Maharashtra | Agrowon

सातारा जिल्ह्यात बियाणे, खतांचा मुबलक साठा : पालकमंत्री बाळासाहेब पाटील

टीम अॅग्रोवन
शनिवार, 23 मे 2020

सातारा  : जिल्ह्यातील खरीप हंगामाची तयारी पूर्ण झाली असून, खरिपासाठी लागणाऱ्या बियाणे व खतांचा मुबलक साठा उपलब्ध आहे. काही ठिकाणी कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना बांधावर खते व बियाणे दिली जात आहेत, अशी माहिती पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आयोजिलेल्या बैठकीत दिली.

सातारा  : जिल्ह्यातील खरीप हंगामाची तयारी पूर्ण झाली असून, खरिपासाठी लागणाऱ्या बियाणे व खतांचा मुबलक साठा उपलब्ध आहे. काही ठिकाणी कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना बांधावर खते व बियाणे दिली जात आहेत, अशी माहिती पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आयोजिलेल्या बैठकीत दिली.

राज्यस्तरीय खरीप हंगाम २०२० आढावा बैठक नुकतीच झाली. यामध्ये जिल्ह्यातील खरीप हंगाम २०२० चे नियोजन आणि संभाव्य अडचणी जाणून त्यावर मार्ग काढण्याच्या सूचनाही प्रशासनाला दिल्या. बैठकीस गृह राज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई, जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले, जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, जिल्हा परिषदेचे कृषी सभापती मंगेश धुमाळ, जिल्हा उपनिबंधक प्रकाश अष्टेकर, प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजयकुमार राऊत, जिल्हा अग्रणी बॅंक व्यवस्थापक महादेव शिरोळकर उपस्थित होते.

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, की सरकारला सहा महिने पूर्ण होत असून, चांगला अर्थसंकल्प मांडण्यात आला; पण आज ‘कोरोना’च्या संकटामुळे देशाची अर्थव्यवस्था धोक्‍यात आली आहे. अन्न धान्याच्या दृष्टीने बाजारपेठेचा अंदाज घेऊन राज्यात पुढील काळात काय करू शकतो, ते पाहण्याची गरज आहे. कोरोनानंतर जग बदलणार आहे, त्यात कृषी क्षेत्राची महत्त्वाची भूमिका राहणार आहे. शेतकऱ्यांनी घेतलेल्या दर्जेदार पिकांची बाहेरच्या देशात निर्यात कशी होईल, यासाठी संबंधित विभागांनी प्रयत्न करावेत.

कृषी अधीक्षक राऊत म्हणाले, जिल्ह्यातील खरीप हंगामाचे नियोजन पूर्ण झाले असून, खरिपासाठी एक लाख दोन हजार ९२३ टन खत पुरवठा मंजूर आहे. त्यापैकी मेअखेर ३० हजार ३०० टन इतका पुरवठा झाला आहे. मागील शिल्लक मिळून एकूण ६५ हजार २५० टन खत उपलब्ध आहे.


इतर ताज्या घडामोडी
शैक्षणिक वर्ष जूनपासूनच : मुख्यमंत्री...मुंबई : ‘‘शिक्षण हे जीवनावश्यक आहे ते...
राज्यात नवे २४८७ रुग्ण; सध्या ३४,४८०...मुंबई : राज्यात आज दिवसभरात २४८७ नवीन रुग्णांचे...
परवानगी नसलेल्या एचटीबीटी बियाण्यांचा...अमरावती ः घरपोच बियाणे वाटपाच्या माध्यमातून...
लोकांना पूर धोक्‍याची जाणीव करुन द्या ः...भंडारा ः वैनगंगा नदी तसेच इतर नदीकाठावरील खोलगट...
गोंधळी शिवारात ६२ हजारांचा एचटीबीटी...यवतमाळ ः कृषी विभागाच्या पथकाने अमरावती, यवतमाळ...
प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील यंत्रमाग...मालेगाव, जि. नाशिक : ‘‘लॉकडाऊनमुळे यंत्रमागाची...
टोळधाड प्रादुर्भावग्रस्त क्षेत्राला...भंडारा ः भंडारा जिल्ह्यातील टोळधाड...
शेतकऱ्यांनी डिजिटल व्यासपीठाचा वापर...पुणे ः कोरोनामुळे शेतीक्षेत्राचे चित्र बदलणार आहे...
नांदेड जिल्ह्यात पाच हजारावर...नांदेड : किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गंत...
विदर्भ राज्य आंदोलन समितीचे ७ जूनला...अकोला ः कोरोनामुळे उद्योगधंदे, व्यापार, शेती,...
‘कुकडी’चे उन्हाळी आवर्तन सहा जूनला...नगर : ‘कुकडी’च्या उन्हाळी आवर्तनासाठी पुणे येथे...
नगर अर्बन बॅंकेला चाळीस लाखांचा दंडनगर : नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅंकेला रिझर्व्ह...
नांदेडमधील कापूस संशोधन केंद्रात...नांदेड : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
‘सोयाबीन लागवड तंत्रज्ञान व प्रक्रिये’...परभणी : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील...
दोन वाहनांतील कापूस घेण्याचे आदेश द्या...परभणी : भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) मानवत...
दुग्ध व्यवसायाने घराला आधारशेतीपूरक व्यवसायामध्ये दुग्ध व्यवसाय पूर्वीपासूनच...
पंतप्रधान मोदी यांच्याकडून संशोधक...नाशिक : जिल्ह्यातील वऱ्हाणे (ता.बागलाण) येथील...
ग्रामविकास विभागामार्फत मोफत आर्सेनिक...कोल्हापूर  : नागरिकांची रोगप्रतिकारक शक्ती...
कापसाच्या वाती करून शासनाची आरती...अमरावती  ः पूर्व विदर्भातील पांढऱ्या...
एचटीबीटीबाबत केंद्र सरकारकडे पाठपुरावा...नागपूर  ः एचटीबीटीचा विषय केंद्र सरकारच्या...