Farmers Agricultural News Marathi Leopards continue to roar Nagar Maharashtra | Agrowon

नगर जिल्ह्यात बिबट्याचा धुमाकूळ सुरुच

टीम अॅग्रोवन
सोमवार, 11 मे 2020

नगर  ः नगर जिल्ह्याच्या विविध भागांत बिबट्याचा धुमाकूळ सुरुच आहे. पाथर्डी तालुक्‍यातील रांजणी येथे बिबट्याच्या हल्ल्यात गाय तर टाकळीभान (ता. श्रीरामपुर) येथे दोन शेळ्या मृत्यूमुखी पडल्या.
 

नगर  ः नगर जिल्ह्याच्या विविध भागांत बिबट्याचा धुमाकूळ सुरुच आहे. पाथर्डी तालुक्‍यातील रांजणी येथे बिबट्याच्या हल्ल्यात गाय तर टाकळीभान (ता. श्रीरामपुर) येथे दोन शेळ्या मृत्यूमुखी पडल्या.
 

रांजणीतील शेतकरी गणेश साळुंके गावाच्या शिवारात डोंगराच्या पायथ्याशी गुरे चारण्यासाठी गेले होते. अचानक आलेल्या बिबट्याने गाय व वासरावर हल्ला चढवला. यामध्ये गाईचा मृत्यू झाला, तर वासरू जखमी झाले. बिबट्याने वासराच्या मानेला धरले असता साळुंके यांनी आरडाओरड केली. त्यामुळे बिबट्याने तेथून पळ काढला. रांजणी, माणिकदौंडी, केळवंडीसह बीड जिल्ह्यातील मायंबा डोंगर परिसरात बिबट्याचा वावर नियमित असतो. शेळ्या, मेंढ्या, गाय, बैल आदी प्राण्यांवर बिबट्याने हल्ला केल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत.

श्रीरामपूर, तालुक्यातील टाकळीभान घुमनदेव रस्त्यालगत बोडखे यांची वस्तीवर अमृत बोडखे व भाऊसाहेब कांगुणे यांच्या वस्तीवर बिबट्याने दोन शेळ्या फस्त केल्या. बिबट्याने वस्तीत प्रवेश करून घरासमोरच बांधलेल्या एका शेळीचा फडशा पाडला. इतर शेळ्यांचा आवाज ऐकल्यावर बोडखे यांनी खिडकीतून पाहिले असता बिबट्या शेळीला घेऊन जात असल्याचे दिसून आले. बोडखे यांनी आरडाओरड केली. मात्र, तो पळाला. कांगुणे यांच्या वस्तीत बिबट्याने प्रवेश करून शेळीचा फडशा पाडला.


इतर ताज्या घडामोडी
सोलापूर जिल्ह्यात पावसामुळे महावितरणचे...सोलापूर ः महावितरणच्या अकलूज, पंढरपूर व...
वळण योजना प्रकल्प पूर्ण करा : भुजबळनाशिक : ‘‘जिल्ह्यातील पाणी पश्चिमेकडे वाहून...
कृषीकन्येकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शनबदलापूर (जि.ठाणे) ः कृषी कार्यानुभव...
मालेगावात कांदा निर्यातबंदीच्या...मालेगाव, जि. नाशिक : गेल्या महिन्यात कांद्याला...
सोलापुरातील शेतकऱ्यांनो कृषी...सोलापूर : यंदाच्या वर्षासाठीची कृषी यांत्रिकीकरण...
जीवामृत निर्मितीचे प्रात्यक्षिकनशिराबाद, जि. बुलडाणाः येथील कृषीकन्या भाग्यश्री...
हिंगोलीतील सहा मंडळात अतिवृष्टीहिंगोली :जिल्ह्यात मंगळवारी (ता.२२) सकाळी...
द्राक्ष उत्पादकांची व्यापारी,...नाशिक : सुमारे ९५ टक्के द्राक्ष व्यापारी हे...
जळगाव जिल्ह्यात केळी उत्पादकांना विमा...जळगाव : शेतकरी प्रश्‍नी शरद जोशी प्रणित शेतकरी...
दुधना नदीला पूर, पिकांत पाणीच पाणीपरभणी : सेलू तालुक्यातील ब्रम्हवाकडी येथील निम्न...
उदगीरमधील ‘देवर्जन’ सात वर्षांनंतर भरलाउदगीर : देवर्जन (ता. उदगीर) येथील मध्यम...
बीड, लातूरमधील मंडळांत दमदार पाऊसऔरंगाबाद : औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद,...
गिरणा पट्ट्यात पूर ओसरताच वाळूचा उपसा...जळगाव : गिरणा परीसरातील शेतकऱ्यांना पूर,...
सेस रद्द करा, अन्यथा बंद पुकारूपुणे ः केंद्र सरकारच्या कृषी आणि पणन विषयक तीन...
जळगावात बाजार समित्या बरखास्तीचे राजकारणजळगाव ः जिल्ह्यात दोन्ही काँग्रेस, शिवसेनेची...
शेतकऱ्यांसाठी सुखावणारा कायदा ः...कोल्हापूर ः शेती उत्पन्न व्यापार आणि वाणिज्य...
बुलडाण्यात दहा हजार हेक्टरवर क्षेत्र...बुलडाणा ः जिल्ह्यात शनिवार (ता. १९) व रविवारी (ता...
सिंधुदुर्ग जिल्ह्याला मुसळधार पावसाने...सिंधुदुर्ग ः जिल्ह्याच्या काही भागाला सोमवारी (ता...
अखेर ६६५ शेतकऱ्यांना विम्याचा लाभअकोला ः  सन २०१९ च्या खरीप हंगामात पंतप्रधान...
संत्रा वाहतुकीसाठी रेल्वेकडून वरूड...अमरावती : किसान रेल्वेच्या माध्यमातून येत्या...