Farmers Agricultural News Marathi loan waiver scheme status Nagar Maharashtra | Agrowon

नगरमधील अडीच लाख शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात १४६४ कोटी वर्ग 

टीम अॅग्रोवन
रविवार, 12 एप्रिल 2020

नगर  : ‘कोरोना’चे संकट उभे असताना प्रशासनाने शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे जिव्हाळ्याने लक्ष दिले आहे. महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत आत्तापर्यंत नगर जिल्ह्यातील २ लाख ३९ हजार ४०६ शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात कर्जमाफीची १४६४ कोटी रुपये रक्कम जमा करण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

नगर  : ‘कोरोना’चे संकट उभे असताना प्रशासनाने शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे जिव्हाळ्याने लक्ष दिले आहे. महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत आत्तापर्यंत नगर जिल्ह्यातील २ लाख ३९ हजार ४०६ शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात कर्जमाफीची १४६४ कोटी रुपये रक्कम जमा करण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

जिल्ह्यात कर्जमुक्ती योजनेंतर्गत सहकार विभागातर्फे ३ लाख ४६ हजार शेतकऱ्यांची नावे अपलोड करण्यात आली होती. त्यातील २ लाख ५३ हजार ४५५ शेतकरी यासाठी पात्र ठरले. त्यातील २ लाख ४७ हजार २०२ शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यांचे आधार प्रमाणिकरणही करण्यात आले. त्यानंतर ‘कोरोना’चे संकट आल्याने उर्वरित ६ हजार २३० शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण बाकी राहिले आहे. मात्र, आधार प्रमाणीकरण झालेल्या २ लाख ३९ हजार ४०६ शेतकऱ्यां‍च्या कर्जखात्यावर १४६४ कोटींची रक्कम संबंधित बॅंकेकडे जमा करण्यात आली आहे. या योजनेचा नुकताच पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत  आढावा घेण्यात आला. 
 
‘जनधन’, ‘शेतकरी सन्मान’मधूनही मिळणार रक्कम
पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत जनधन खात्यामध्ये दरमहा पाचशे याप्रमाणे तीन महिन्यांत दीड हजार रुपये जमा करण्यात येणार आहेत. जिल्ह्यात या योजनेअंतर्गत ४ लाख ३८ हजार १३१ महिला खातेधारक आहेत. त्यांना याचा लाभ मिळणार आहे. पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांनाही २ हजार रुपयांप्रमाणे रक्कम मिळणार असून या योजनेत जिल्ह्यात ६ लाख ९ हजार ७४१ खातेधारक आहेत असे सांगण्यात आले.


इतर ताज्या घडामोडी
काही भागात पावसाच्या उघडिपीची शक्यता महाराष्ट्रावर बुधवार (ता.२३) पर्यंत  १००४...
राज्य द्राक्ष बागायतदार संघाची ...नाशिक: महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार...
पांगरी परिसरात पिकांवर आस्मानी संकटपांगरी, जि. सोलापूर ः पांगरी (ता. बार्शी) परिसरात...
शेतमाल स्थानिक भागात विकला जाणार : भुजबळनाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यात आदिवासी समाज...
परभणी, हिंगोली जिल्ह्यात पावसाचे थैमाननांदेड : मराठवाड्यातील परभणी, हिंगोली जिल्ह्यात...
नाशिक विभागात कांदा लागवडीत ८ हजार...नाशिक : चालू वर्षी खरीप कांद्याच्या लागवडीपूर्वी...
रावेर तालुक्यात सीएमव्ही नुकसानीचे...जळगाव ः कुकुंबर मोसॅक विषाणूमुळे (सीएमव्ही)...
हिंगोली जिल्ह्यात सोयाबीनच्या पिकाला...हिंगोली : जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांपासून...
मराठवाड्यात अतिपाऊस खरीप पिकांच्या...औरंगाबाद : मराठवाड्यात गत काही दिवसांपासून...
धुळ्यात लाळ्या खुरकूत रोग प्रतिबंधक...धुळे : धुळे जिल्ह्यात ३० सप्टेंबरपर्यंत...
पावसाचा डाळींब पिकाला तडाखाआटपाडी, जि. सांगली ः अवर्षण प्रवण असलेल्या आटपाडी...
मायक्रो फायनान्सचे चक्रव्यूह...मुंबई : ग्रामीण भागातील सूक्ष्म वित्त पुरवठा...
नगर जिल्ह्यात अतिवृष्टीचा चार हजार...नगर ः यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीपासून चांगला...
कोकण कृषी विद्यापीठात बांबू कार्यशाळेचे...दापोली, जि. रत्नागिरी : जगभरात दरवर्षी १८...
अकोला जिल्ह्यातील सहा खत विक्रेत्यांचे...अकोला ः या हंगामात खत विक्रीत मोठ्या प्रमाणात...
सदोष बियाणेमुळे भेंडी बीजोत्पादक अडचणीतबुलडाणा ः लोणार तालुक्यातील शेतकऱ्यांनी या...
भातपीक कापणीत पावसाचा अडसररत्नागिरी : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने...
ठाण्यातील १४ हजार हेक्टर पिकांचा काढला...मुंबई : ठाणे जिल्हा कृषी विभागाने यंदा पंतप्रधान...
औरंगाबादमध्ये कांदा ३०० ते २३०० रूपयेऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
आरोग्यदायी विड्याचे पानकोणत्याही धार्मिक कार्यात, पूजेच्या ठिकाणी...