Farmers Agricultural News Marathi Locusts in Uttar Pradesh | Agrowon

टोळधाड उत्तर प्रदेशात

पीटीआय
बुधवार, 1 जुलै 2020

जागतिक अन्न आणि कृषी संघटनेने उत्तर भारतात टोळधाडीचा इशारा दिला आहे. महाराष्ट्राच्या उत्तर सीमावर्ती भागात यापूर्वीच टोळधाड येऊन गेली. यापार्श्वभूमीवर आपण सतर्क राहणे आवश्‍यक आहे. 
- संगीता सव्वालाखे, कीटकशास्त्रज्ञ.

कानपूर, उत्तर प्रदेश  ः शेतकऱ्यांसाठी मोठी गंभीर समस्या ठरलेली टोळधाड सध्या गंगा नदीच्या प्रदेशात तसेच कानपूर भागात आढळून आली आहे. त्यानुसार परिसरातील शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सरकारी यंत्रणांनी दिलेल्या सूचनांचे पालन करून शेतकऱ्यांनी टोळधाडीपासून बचाव करण्यासाठी सज्ज राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. कृषी विभागाबरोबरच पोलिस खाते, आरोग्य खाते व अग्निशामक दलही सतर्क झाले आहे.    

केंद्रीय कृषी मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार राजस्थान, हरियाना व उत्तर प्रदेश या राज्यांकडून तसेच लोकस्ट कंट्रोल ऑर्गनायझेशन यांच्याकडून टोळधाडीवर देखरेख करण्यात येत आहे.  मे महिन्याच्या दरम्यान टोळधाडीने मध्य प्रदेशातून महाराष्ट्राकडे आपला मोर्चा वळवत आपले उग्र स्वरूप दाखवले. सद्यःस्थितीत राजस्थानातील पश्‍चिम उदयपूर भागात ही टोळधाड असली तरी मध्य प्रदेश व उत्तर प्रदेशातील काही भागातही तिची नोंद झाली आहे. २७ जूनला  झालेल्या जोरदार वाऱ्यांमुळे पिलावस्थेतील छोट्या स्वरूपातील थवा उत्तरेकडील कुशीनगर व सिद्धार्थनगर भागात पोचला. त्यानंतर त्याची विभागणी होऊन त्यातील काही टोळधाड नेपाळच्या बाजूस सरकली.  
 


इतर ताज्या घडामोडी
कोल्हापूर बाजार समिती नोकर भरतीविरोधात...कोल्हापूर: येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत...
नगर : मक्‍याला हमीभावापेक्षा कमी दर...नगर ः रब्बी हंगामामध्ये शासनाच्या किमान आधारभूत...
सातारा जिल्ह्यात खरिपाच्या ८२.८५ टक्के...सातारा  ः पावसाचा काहीसा जोर वाढल्याने...
पुणे बाजार समितीसह उपबाजार ...पुणे  ः ‘कोरोना’च्या फैलावामुळे शहरातील...
नगर जिल्ह्यात एक लाख १७ हजार हेक्टरवर...नगर  ः जिल्ह्यात यंदा जुलैच्या पहिल्याच...
अमरावतीत बियाणे कंपनीकडून ९०१ बॅग, २२...अमरावती : जिल्ह्यात सोयाबीन बियाणे उगवणीबाबत १...
कोविड-१९ रुग्णांच्या वास, चव संवेदनांवर...कोविड १९ च्या आजारातून बरे झाल्यानंतरही सुमारे ९०...
खानदेशात दुबार पेरणीसाठी ताग, बाजरी,...जळगाव  ः खानदेशात दुबार पेरणी आटोपली आहे....
जळगावमधील सिंचन प्रकल्पांची कामे...जळगाव  ः जिल्ह्यात तापी व गिरणा नदीवर...
निकृष्ट बियाणेप्रकरणी सर्व कंपन्यांवर...नगर: जिल्ह्यात गेल्या एक महिन्याच्या कालावधीत...
बॅंकांनी पीककर्ज प्रकरणे तत्काळ मार्गी...वर्धा  ः जिल्ह्यात पात्र शेतकऱ्यांपैकी एकही...
गोंदिया जिल्ह्यात युरियाची टंचाईगोंदिया  ः पावसामुळे धान रोवणीला वेग आल्याने...
औरंगाबाद जिल्ह्यात खतांचा पुरवठा सुरळीत...औरंगाबाद : जिल्ह्यात ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर...
अकोल्यात तूर सरासरी ५८०० रुपये क्विंटलअकोला  ः  येथील कृषी उत्पन्न बाजार...
सांगली जिल्ह्यातील तीन केंद्रांवर २०२३...सांगली  ः जिल्ह्यात हमीभावाने मका खरेदीसाठी...
रत्नागिरी जिल्ह्यात भात, नाचणी पिकासाठी...रत्नागिरी  : रत्नागिरी जिल्ह्यात भात, नाचणी...
आरोग्यदायी दालचिनीमसाल्यांच्या पदार्थांत, घरात मसाला करताना...
कोकण, कोल्हापूर पट्ट्यात मुसळधार...कोकण व कोल्हापूर भागावर १००२ तर महाराष्ट्रावर...
कोल्हापुरात दिड हजार, खते, बियाणे...कोल्हापूर  : बियाण्यांच्या उगवणीप्रश्नी...
सांगली जिल्ह्यात दोन लाख १९ हजार हेक्‍...सांगली : जिल्ह्यात पावसांचा खंड असला तरी  ...