farmers agricultural news marathi madhu kranti exhibition starts from tomorrow nashik maharashtra | Agrowon

मधुक्रांती प्रदर्शनास उद्यापासून प्रारंभ

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 5 डिसेंबर 2019

नाशिक  : मधमाशीपालन या विषयावरील ‘मधुक्रांती २०१९’ या राज्यस्तरीय प्रदर्शनाचे उद्या (ता. ६) पासून आयोजन पिंपळगाव बसवंत येथील बसवंत मधमाशी उद्यान व प्रशिक्षण केंद्र, मुखेड रोड येथे करण्यात आले आहे. 

नाशिक  : मधमाशीपालन या विषयावरील ‘मधुक्रांती २०१९’ या राज्यस्तरीय प्रदर्शनाचे उद्या (ता. ६) पासून आयोजन पिंपळगाव बसवंत येथील बसवंत मधमाशी उद्यान व प्रशिक्षण केंद्र, मुखेड रोड येथे करण्यात आले आहे. 

या प्रदर्शनाचे मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या सरचिटणीस नीलिमाताई पवार यांच्या हस्ते होणार असून, या वेळी अध्यक्षस्थानी ‘ॲग्रोवन’चे संपादक आदिनाथ चव्हाण असतील. रविवारपर्यंत (ता. ८) हे प्रदर्शन सुरू राहणार आहे. या प्रदर्शन आणि परिसंवादाचे ग्रीनझोन ॲग्रो केम प्रा.लि. व पूर्वा केमटेक प्रा.लि. यांनी आयोजन केले असून, ‘सकाळ-ॲग्रोवन’ या परिसंवादाचे माध्यम प्रायोजक आहेत.

पीक उत्पादनवाढीत तसेच मधासह अन्य उपयुक्त पदार्थांचे संकलन करण्यात मधमाश्यांचा विशेष वाटा आहे. या संदर्भातील सविस्तर माहिती उपलब्ध व्हावी, या हेतूने मधुक्रांती २०१९ या राज्यस्तरीय प्रदर्शन आणि परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी आयोजित परिसंवादांमध्ये मधमाशीची ओळख, देश व राज्य पातळीवरील मधमाश्यांचे संवर्धन व संगोपन, मधमाशीचे जीवनचक्र व कार्यप्रणाली, शास्त्रीय पद्धतीने मधमाशी संगोपन, पीक उत्पादन वाढीसाठी मधमाशीचे महत्त्व व त्यातून उद्योजकता विकास या विषयांवर चर्चा होणार आहे. 

उद्‍घाटन सत्रात सह्याद्री फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीचे अध्यक्ष विलास शिंदे हे मार्गदर्शन करणार असून, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे संचालक डॉ. सूर्या गुंजाळ, ‘पूर्वा कृषिदूत’चे संपादक डॉ. बी. बी. पवार, ‘सुप्रकृती मधुशाला’, नाशिकचे संचालक डॉ. तुकाराम निकम, महाबळेश्वर येथील खादी ग्रामोद्योग मंडळाचे संचालक डॉ. डी. आर. पाटील, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे माजी सहयोगी संशोधन संचालक डॉ. जे. के. पुरकर, कृषी विद्या विभागाचे माजी प्राध्यापक डॉ. व्ही. एस. पवार, कीटकशास्त्र विभागाचे माजी प्राध्यापक डॉ. बी. एस. शेवाळे, सीबीआरटीआय पुणेचे उपसंचालक एस. एम. पोकरे, बागपत (मध्य प्रदेश) येथील संजीवकुमार तोमर हे उपस्थित राहणार आहेत. या वेळी मधपाशीपालनाच्या माध्यमातून कृषिविकास व पर्यावरण संवर्धनासाठी योगदान देणाऱ्या १२ मान्यवरांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे. 

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा प्रतिसाद
मधमाशीपालन या विषयावर चित्रकला व निबंध स्पर्धेचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून आपले निबंध व कलाकृती पाठविल्या आहेत. 
 
पुरस्कारार्थी असे 
डॉ. आर. पी. फडके (पुणे), डॉ. के. के. क्षीरसागर (पुणे), डॉ. तुकाराम निकम (नाशिक), डॉ. मिलिंद वाकोडे (पुणे), डॉ. धनंजय वाखले (पुणे), डॉ. गोपाल पालीवाल (वर्धा), दिनकर पाटील (लातूर), विवेक खालोकर (वर्धा), विद्यानंद अहिरे (जळगाव), गौतम डेमसे (नाशिक), नानासाहेब इंगळे (नगर), कल्लू वांगड (ठाणे).


इतर ताज्या घडामोडी
योग्य पद्धतीने करा बटाटा काढणीयंदा बटाटा पिकाची काढणी फेब्रुवारी- मार्च...
मध्य प्रदेशात द्राक्ष लागवडीसाठी ‘...पुणे : मध्य प्रदेशातील बागायतदार शेतकरी आता...
खरबूज लागवड तंत्रज्ञानखरबूज पिकाची लागवड जानेवारी ते मार्च यादरम्यान...
नांदर्खे, खोंडमळीत आधार प्रमाणीकरण,...नंदुरबार  ः महात्मा फुले कर्जमुक्ती...
जळगाव  : आधार प्रमाणीकरण करण्यासाठी...जळगाव  : महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी...
कांदा दरांवरील दबाव वाढलाजळगाव  ः खानदेशातील प्रमुख बाजार...
गडहिंग्लजमध्ये यंदा अधिक पाणीसाठागडहिंग्लज, जि. कोल्हापूर : गतवर्षीच्या ऑगस्ट...
यवतमाळ जिल्हा बॅंकेकरिता तब्बल ३००...यवतमाळ  ः जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या...
मोसंबीला खतमात्रा देणे अत्यंत आवश्‍यक...औरंगाबाद : ‘‘मोसंबी पीक हे शेतकऱ्यांची...
उच्च तंत्रज्ञानावर आधारित फुलशेती...नाशिक : मालेगाव तालुक्यातील वडेल येथील कृषी...
नांदेड विभागात साखरेचे २५ लाख क्विंटलवर...नांदेड : नांदेड विभागातील परभणी, हिंगोली, नांदेड...
नांदेड जिल्ह्यातील भूजल पातळीत १.२६...नांदेड : नांदेड जिल्ह्यातील भूजल पातळीमध्ये...
नाशिक : माथाडींच्या संपामुळे बाजार...नाशिक  : राज्यातील माथाडी कामगारांच्या...
‘भीमा’च्या कामगारांचे पैसे पाच...मोहोळ, जि. सोलापूर : कामगारांच्या खात्यावर ५...
सावरकरांच्या गौरव प्रस्तावावरून भाजप...मुंबई ः स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या गौरव...
करमाळ्यात शुद्ध; पंढरपुरात सर्वांत...सोलापूर : जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याचे ६१५...
शिवस्मारक निविदेत गैरव्यवहार नाही;...मुंबई ः मुंबईजवळच्या अरबी समुद्रात उभारण्यात...
तूर खरेदीसाठी हमी देण्याबाबत मंत्रिमंडळ...मुंबई ः ‘‘राज्यात सध्या ३१७ तूर खरेदी केंद्रे...
पुणे जिल्ह्यात भाजीपाला पिकांकडे...पुणे ः गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून पोषक...
राज्यसभेच्या निवडणुकीसाठी २६ मार्चला...मुंबई ः राज्यसभेच्या ५५ जागांसाठी येत्या २६ मार्च...