नगर जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांदा लिलाव सुरु करण्याच्या हालचाली

नगर ः ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर नगरसह जिल्हाभरात गेल्या महिनाभरापासून बंद असलेले कांदा लिलाव येत्या दोन ते चार दिवसांत सुरु होण्याची शक्यता आहे. या अनुषंगाने सर्वच बाजार समित्यांमध्ये हालचाली सुरु झाल्या आहेत. नगर बाजार समितीत सर्वाधिक कांदा आवक होत असल्याने येथे मात्र गर्दी जमा होण्याची बाजार समिती प्रशासनाला चिंता आहे.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नगर ः ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर नगरसह जिल्हाभरात गेल्या महिनाभरापासून बंद असलेले कांदा लिलाव येत्या दोन ते चार दिवसांत सुरु होण्याची शक्यता आहे. या अनुषंगाने सर्वच बाजार समित्यांमध्ये हालचाली सुरु झाल्या आहेत. नगर बाजार समितीत सर्वाधिक कांदा आवक होत असल्याने येथे मात्र गर्दी जमा होण्याची बाजार समिती प्रशासनाला चिंता आहे.

जिल्ह्यातील नगर बाजार समितीसह राहाता, राहुरी, पारनेर, घोडेगाव (नेवासे), संगमनेर, शेवगाव या बाजार समित्यांमध्ये कांदा लिलाव होत असतात. ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर गेल्या महिनाभरापासून नगरसह जिल्हाभरातील अन्य बाजार समित्यांत गर्दी होत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने कांदा लिलाव बंद होते. भुसार मालाचे लिलाव चालू असले तरी वाहतूक बंद असल्याने भुसारची आवक झाली नाही. आता गेल्या महिनाभरापासून बंद असलेले कांदा लिलाव दोन ते चार दिवसांत सुरु करण्याचा बाजार समित्यांचा प्रयत्न आहे. दोन ते तीन दिवसांत कांदा लिलाव सुरु करणार आहोत, असे घोडेगाव (नेवासे) बाजार समितीचे सचिव देवदत्त पालवे यांनी सांगितले.

अकोले, शेवगाव येथे लिलाव सुरु झाले आहेत. नगर बाजार समितीत सर्वाधिक आवक होत असल्याने शहरापासून साधारण सहा-सात किलोमीटर अंतरावर असलेल्या नेप्ती उपबाजार समितीत हे लिलाव होतात तर भाजीपाला, फळांचे लिलाव शहरातील भाजीपाला बाजारात होतात. मात्र गर्दी होत असल्याने ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी व बाजार समिती प्रशासनाने नेप्ती बाजारात भाजीपाला, फळांचा बाजार सुरु केलेला आहे.

सध्या भाजीपाल्याचे लिलाव होत नसून शेतकरी थेट व्यापारी, किरकोळ विक्रेत्यांना विक्री करत आहेत. अजून बारा दिवस लॉकडाउन सुरु राहणार आहे. त्यामुळे तोपर्यंत भाजीपाला बाजार येथेच सुरु राहण्याची शक्यता आहे. नगर बाजार समितीत शनिवारपासून (ता.२५) कांदा लिलाव सुरु करण्याचा बाजार समितीचा प्रयत्न आहे. मात्र मोठ्या प्रमाणात आवक होऊन गर्दी होण्याची भिती आहे. त्यामुळे कांदा लिलाव सुरु झाल्यावर गर्दी होणार नाही यासाठी उपाययोजना करण्याचा प्रयत्न असल्याचे बाजार समितीतून सांगण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com