Farmers Agricultural News Marathi Monsoon entered in Kerala | Agrowon

केरळचा बहुतांश भाग मॉन्सूनने व्यापला

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 2 जून 2020

पुणे  : महाराष्ट्रासह देशभरातील शेतकऱ्यांना ओढ लागून असलेले नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) सोमवारी (ता.१) देवभूमी केरळमध्ये दाखल झाले आहे.

पुणे  : महाराष्ट्रासह देशभरातील शेतकऱ्यांना ओढ लागून असलेले नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) सोमवारी (ता.१) देवभूमी केरळमध्ये दाखल झाले आहे. मॉन्सूनचे आगमन यंदा लांबण्याची शक्यता असताना, अरबी समुद्रात असलेल्या कमी दाब क्षेत्रामुळे मॉन्सूनने वेगाने चाल करत केरळमध्ये आगमन केले. मॉन्सूनने श्रीलंकेचा दक्षिण भाग, केरळच्या कन्नूर, तामिळनाडूच्या कोईंम्बतूर, कन्याकुमारीपर्यंतचा भाग व्यापला असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

यंदा मॉन्सून सर्वसाधारण वेळेच्या चार दिवस उशीराने म्हणजेच ५ जून रोजी दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली होती. यात चार दिवसांची मागे पुढे तफावतही गृहित धरण्यात आली होती. मात्र पूर्व-मध्य अरबी समुद्रात रविवारी (ता.३१) तयार झालेल्या कमी दाब क्षेत्राने वाऱ्यांना खेचून आणल्याने मॉन्सून नियमित वेळवर १ जूनला केरळमध्ये दाखल झाला आहे. अरबी समुद्रात ढगांची दाटी झाली असून, केरळमध्ये पाऊस पडत आहे. कर्नाटक, महाराष्ट्रामध्ये पूर्वमोसमी पावसाच्या सरींनी हजेरी लावली आहे. कमी दाब क्षेत्र उत्तरेकडे सरकत जाताना त्याचे वादळात रुपांतर होणार असल्याने किनारपट्टीलगत मॉन्सूनची आणखी वाटचाल होण्याची शक्यता आहे.

दरम्यान बंगालच्या उपसागात आलेल्या ‘अम्फान’ चक्रीवादळामुळे यंदा वेळेआधीच १७ मे रोजी मॉन्सून अंदमान, निकोबार बेटांवर दाखल झाला होता. मात्र हे चक्रीवादळ उत्तरेकडे सरकल्यानंतर तब्बल दहा दिवस दक्षिण दक्षिण अंदमानातच मॉन्सून अडखळला. उपसागरातील वाटचाल पुन्हा सुरू करत, गुरूवारी (ता.२८) दुसऱ्याच दिवशी मॉन्सूनने संपर्ण अंदमान बेटे आणि बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात धडक दिली होती. शनिवारी (ता.३०) भारताच्या दक्षिणेकडे असलेल्या श्रीलंकेच्या दक्षिण भागासह, मालदिव आणि कोमोरीन भागातही मॉन्सून वारे दाखल झाले होते. सोमवारी (ता.१) मॉन्सूनने मोठी धाव घेत संपूर्ण दक्षिण अरबी समुद्र, लक्षद्वीप बेटे, मालदिवचा उर्वरीत भाग, केरळचा बहुतांशी भाग, तमिळनाडू, पदुच्चेरीच्या भागासह दक्षिण बंगालच्या उपसारातील काही भागात प्रगती केली असल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले.

गेल्या काही वर्षांतील मॉन्सूनचे केरळातील आगमन
वर्ष आगमन
२०१५ ५ जून
२०१६ ८ जून
२०१७ ३० मे
२०१८ २९ मे
२०१९ ८ जून

 


इतर अॅग्रो विशेष
विश्वजित माने प्रभारी कृषी आयुक्तपुणे : राज्याचे कृषी आयुक्त सुहास दिवसे यांची...
कृषी निविष्ठा विक्रेत्यांचा बंद मागे;...औरंगाबाद :  कृषी निविष्ठा विक्रेत्यांचा...
शण्मुख नाथन झटतोय निंब वृक्ष वाढीसाठीअकोला ः वृक्ष संवर्धन, पर्यावरणाच्या उद्देशाने...
देशात कृषी स्टार्टअपला वाव : संगीता...पुणे: जगात कृषी क्षेत्रातील प्रत्येक नववा...
सोयाबीन बियाणे न उगवल्याच्या राज्यात ५४...पुणे ः खरीप हंगामात सोयाबीन बियाणे...
कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर...पुणे: मॉन्सून सक्रिय होण्यास पोषक हवामान होत...
आमचा विद्यार्थी सहा महिन्यातच पास झाला...मुंबई: आमचा विद्यार्थी सहा महिन्यातच पास झाला,...
बांगलादेशात रेल्वेद्वारे कांदा निर्यातनाशिक: जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर कांदा...
देशात आता जनुक क्रांतीची गरज : माजी...पुणे: देशाला आता हरितक्रांती नव्हे तर आता जनुक...
शेळ्या-मेंढ्यांचे बाजार सुरु करा  नगर ः सध्या आषाढ महिना सुरु असून या महिन्यात...
बियाणे संबंधित तक्रारींचा तत्काळ निवाडा...नाशिक: निकृष्ट बियाण्यासंबंधी तक्रारी आल्यानंतर...
संत्रा उत्पादन वाढीचा अंदाजअमरावती ः पोषक वातावरणाच्या परिणामी या वर्षी...
मागण्या मान्य करा, अन्यथा दूध पुरवठा...औरंगाबाद  : अत्यल्प दर मिळत असल्याने आम्ही...
उथळ निर्णय की सखोल अभ्यासकेंद्र सरकारने ग्लायफोसेटचा वापर देशभर केवळ कीड...
लसीला लागण राजकारणाची ?‘कोरोना’ग्रस्ततेत अमेरिकेचा प्रथम क्रमांक आहे....
संगमनेर तालुका संघाकडून ५० टक्के...नगर: संगमनेर तालुका सहकारी दूध संघाने दूध...
उगाव येथे सामूहिक पातळीवर दशपर्णी अर्क...नाशिक: निफाड तालुक्यातील उगाव येथील श्री. श्री....
किसान क्रेडिट कार्डवर बिनव्याजी कर्ज...नाशिक: शेतकऱ्यांना शेतीकामासाठी आर्थिक मदत करणे...
दुधाला दर नसल्याने, दुभती जनावरे ...सोलापूर ः दुधाला मागणी असूनही केवळ योग्य तो दर...
मराठा समाजाला विश्वासात घेणार : अशोक...मुंबई : मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन लढाईत राज्य...