अरबी समुद्रातून मॉन्सूनची पुढे चाल

पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) शुक्रवारी (२९) अरबी समुद्रातून पुढे चाल कायम ठेवत कोमोरीन आणि मालदिवच्या आणखी काही भागांत वाटचाल केली आहे. रविवारपर्यंत (ता.३१) मॉन्सूनची अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील शाखा आणखी वाटचाल करण्याची शक्यता आहे. सोमवारपर्यंत (ता.१) मॉन्सून केरळमध्ये दाखल होण्यास पोषक स्थिती असल्याचेही भारतीय हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) शुक्रवारी (२९) अरबी समुद्रातून पुढे चाल कायम ठेवत कोमोरीन आणि मालदिवच्या आणखी काही भागांत वाटचाल केली आहे. रविवारपर्यंत (ता.३१) मॉन्सूनची अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील शाखा आणखी वाटचाल करण्याची शक्यता आहे. सोमवारपर्यंत (ता.१) मॉन्सून केरळमध्ये दाखल होण्यास पोषक स्थिती असल्याचेही भारतीय हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

बंगालच्या उपसागरात आलेल्या ‘अम्फान’ चक्रीवादळामुळे १७ मे रोजी मॉन्सून अंदमान, निकोबार बेटांवर दाखल झाला होता. मात्र हे चक्रीवादळ उत्तरेकडे सरकल्यानंतर दहा दिवस मॉन्सून रेंगाळला होता. मात्र बुधवारी (ता.२७) मॉन्सूनचे प्रवाह बळकट होत उत्तरेकडे वाटचाल सुरू झाली. गुरूवारी (ता.२८) दुसऱ्याच दिवशी मॉन्सूनने संपूर्ण अंदमान बेटे आणि बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात धडक दिली. अरबी समुद्रातील मॉन्सूनची शाखा सक्रिय झाल्यानंतर मालदीव आणि कोमोरीनच्या काही भागासह, श्रीलंकेच्या दक्षिण भागातही वाऱ्यांचे आगमन झाले. शुक्रवारी (ता.२९) मॉन्सूनने अरबी समुद्रातून चाल केली असली, तर बंगालच्या उपसागरातील वाटचालीची स्थिती जैसे थे होती.

पूर्व-मध्य अरबी समुद्रात रविवारपर्यंत (ता.३१) नवीन कमी दाब क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत. हे कमी दाब क्षेत्र उत्तरेकडे सरकत जाताना अधिक तीव्र होणार आहे. या प्रणालीमुळे मॉन्सून वारे खेचून आणण्यास पोषक तयार होत असल्याने १ जूनला मॉन्सून केरळात दाखल होणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

  कमी दाबाचे क्षेत्र झाले ठळक अरबी समुद्राच्या पश्‍चिम-मध्य भागात गुरूवारी (ता.२८) हवेचे कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. शुक्रवारी (ता.२९) हे कमी दाब क्षेत्र ठळक झाले होते. रविवारपर्यंत (ता.३१) ही प्रणाली अधिक तीव्र होत दक्षिण ओमान, आणि पूर्व येमेनच्या किनाऱ्याकडे सरकून जमिनीवर जाणार आहे. मालदीव आणि परिसरावर समुद्रसपाटीपासून ३.१ ते ५.४ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत असून, अरबी समुद्राच्या पूर्व-मध्य भागात नवीन कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com