Farmers Agricultural News Marathi Monsoon status Pune Maharashtra | Page 2 ||| Agrowon

अरबी समुद्रातून मॉन्सूनची पुढे चाल

टीम अॅग्रोवन
शनिवार, 30 मे 2020

पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) शुक्रवारी (२९) अरबी समुद्रातून पुढे चाल कायम ठेवत कोमोरीन आणि मालदिवच्या आणखी काही भागांत वाटचाल केली आहे. रविवारपर्यंत (ता.३१) मॉन्सूनची अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील शाखा आणखी वाटचाल करण्याची शक्यता आहे. सोमवारपर्यंत (ता.१) मॉन्सून केरळमध्ये दाखल होण्यास पोषक स्थिती असल्याचेही भारतीय हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) शुक्रवारी (२९) अरबी समुद्रातून पुढे चाल कायम ठेवत कोमोरीन आणि मालदिवच्या आणखी काही भागांत वाटचाल केली आहे. रविवारपर्यंत (ता.३१) मॉन्सूनची अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील शाखा आणखी वाटचाल करण्याची शक्यता आहे. सोमवारपर्यंत (ता.१) मॉन्सून केरळमध्ये दाखल होण्यास पोषक स्थिती असल्याचेही भारतीय हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

बंगालच्या उपसागरात आलेल्या ‘अम्फान’ चक्रीवादळामुळे १७ मे रोजी मॉन्सून अंदमान, निकोबार बेटांवर दाखल झाला होता. मात्र हे चक्रीवादळ उत्तरेकडे सरकल्यानंतर दहा दिवस मॉन्सून रेंगाळला होता. मात्र बुधवारी (ता.२७) मॉन्सूनचे प्रवाह बळकट होत उत्तरेकडे वाटचाल सुरू झाली. गुरूवारी (ता.२८) दुसऱ्याच दिवशी मॉन्सूनने संपूर्ण अंदमान बेटे आणि बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात धडक दिली. अरबी समुद्रातील मॉन्सूनची शाखा सक्रिय झाल्यानंतर मालदीव आणि कोमोरीनच्या काही भागासह, श्रीलंकेच्या दक्षिण भागातही वाऱ्यांचे आगमन झाले.
शुक्रवारी (ता.२९) मॉन्सूनने अरबी समुद्रातून चाल केली असली, तर बंगालच्या उपसागरातील वाटचालीची स्थिती जैसे थे होती.

पूर्व-मध्य अरबी समुद्रात रविवारपर्यंत (ता.३१) नवीन कमी दाब क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत. हे कमी दाब क्षेत्र उत्तरेकडे सरकत जाताना अधिक तीव्र होणार आहे. या प्रणालीमुळे मॉन्सून वारे खेचून आणण्यास पोषक तयार होत असल्याने १ जूनला मॉन्सून केरळात दाखल होणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

 
कमी दाबाचे क्षेत्र झाले ठळक
अरबी समुद्राच्या पश्‍चिम-मध्य भागात गुरूवारी (ता.२८) हवेचे कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. शुक्रवारी (ता.२९) हे कमी दाब क्षेत्र ठळक झाले होते. रविवारपर्यंत (ता.३१) ही प्रणाली अधिक तीव्र होत दक्षिण ओमान, आणि पूर्व येमेनच्या किनाऱ्याकडे सरकून जमिनीवर जाणार आहे. मालदीव आणि परिसरावर समुद्रसपाटीपासून ३.१ ते ५.४ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत असून, अरबी समुद्राच्या पूर्व-मध्य भागात नवीन कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत.


इतर बातम्या
सीईटीऐवजी गुणांद्वारे कृषी...अमरावती ः बारावीनंतर कृषी अभ्यासक्रमाला...
वीजबिले माफ न केल्यास कंपनीचे कार्यालय...बुलडाणा ः लॉकडाउनच्या काळातील तीन महिन्यांचे...
सत्तास्थापनेसाठी भाजपकडूनच विचारणा केली...मुंबई : सहा महिन्यांपूर्वी राज्यात सत्तास्थापन...
वऱ्हाडात दूधाचे दर स्थिरअकोला ः या भागातील दूध संघ डबघाईस आल्याने दूध...
वाशीम जिल्ह्यावर खरिपात पावसाची कृपावाशीम ः जिल्ह्यात यंदाच्या मोसमात आत्तापर्यंत...
वर्धा जिल्ह्यात दूध उत्पादकांना दराचा...नागपूर ः लॉकडाउनमुळे मागणी घटल्याचे सांगत खासगी...
नाशिकमध्ये कमी दूध दरामुळे उत्पादकांची...नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार...
वीज बिले माफ न केल्यास उद्रेक ः...नाशिक : लॉकडाऊन काळात वीज कंपन्यांनी घरगुती वीज...
एचटीबीटी कपाशीची शेतकऱ्यांकडून पाहणीअकोला ः शेतकऱ्यांना तंत्रज्ञान स्वातंत्र्य मिळावे...
दुर्मीळ निलमणी आमरीचे सातपुड्यात...जळगाव ः जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगा या अनेक...
दूध पावडरला प्रतिकिलो ५० रुपये अनुदान...इस्लामपूर, जि. सांगली ः कोरोना सारख्या साथीत...
भ्रष्टाचाराच्या चौकशीचे आदेश;तरीही चार...पुणे: पंतप्रधान पॅकेजमधून राबविण्यात आलेल्या...
अकोला जिल्ह्यात सोयाबीन उगवणशक्तीबाबत...अकोला ः  सोयाबीन पिकाची पेरणी जुलैच्या...
अन्नधान्य पिकांच्या योजनांसाठी २७ कोटीपुणे: राज्यातील अन्नधान्य पिकांच्या योजनांसाठी...
ग्लायफोसेट वापराच्या मसुद्याविरुद्ध दाद...पुणे: केंद्र सरकारने ग्लायफोसेट तणनाशकाच्या...
सोयाबीन बियाणे कंपन्यांवर राज्यात ४६...औरंगाबाद ः सोयाबीनच्या बोगस बियाण्यामुळे पिकाची...
दूध व्यवसाय झाला आतबट्ट्याचा; शेतकरी...पुणेः मागील काही वर्षांपासून संकटात असलेल्या दूध...
राज्यात पाऊस जोर धरण्याची शक्यता पुणे : मॉन्सून सक्रिय होण्याचा पोषक हवामान होत...
विश्वजित माने प्रभारी कृषी आयुक्तपुणे : राज्याचे कृषी आयुक्त सुहास दिवसे यांची...
कोल्हापुरात आज घरगुती वीज बिलांची होळी ...कोल्हापूर  : दिल्ली सरकारने शंभर...