Farmers Agricultural News Marathi Nana Patole take a review of several issues Bhandara Maharashtra | Agrowon

धान तातडीने खरेदी करा ः नाना पटोले 

टीम अॅग्रोवन
सोमवार, 11 मे 2020

भंडारा   ः अवकाळी पावसामुळे खरेदीच्या प्रतीक्षेत असलेले शेतकऱ्यांचे धान भिजून खराब झाले. याचा आर्थिक भुर्दंड शेतकऱ्यांना सहन करावा लागत असल्याने शेतकऱ्यांकडील धानाची तातडीने खरेदी करुन तांदळाची उचल करावी, असे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले. 

भंडारा  ः अवकाळी पावसामुळे खरेदीच्या प्रतीक्षेत असलेले शेतकऱ्यांचे धान भिजून खराब झाले. याचा आर्थिक भुर्दंड शेतकऱ्यांना सहन करावा लागत असल्याने शेतकऱ्यांकडील धानाची तातडीने खरेदी करुन तांदळाची उचल करावी, असे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले. 

जिल्हा परिषद सभागृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी खासदार सुनील मेंढे, आमदार राजू कारेमोरे, जिल्हाधिकारी एम.जे. प्रदीपचंद्रन, मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्‍वरी एस., पोलिस अधिक्षक अरविंद साळवे उपस्थित होते.

श्री. पटोले म्हणाले, की खरेदी केंद्रांवरील धानाची उचल झाल्यास पुढील धान खरेदीचे नियोजन करता येणार आहे. त्यामुळे धानाचे मिलिंग करुन त्याची उचल करण्यात यावी. जिल्ह्यात ६७ धान खरेदी केंद्रे होती. त्यात २३ केंद्रांची वाढ करुन एकूण ९० धान खरेदी केंद्रे कार्यान्वित करण्यात आली आहेत. उन्हाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात पाणीटंचाई भासणार नाही, याची दक्षता घ्यावी. याचे मॉनिटरिंग मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी करुन कामांना गती दयावी, अशा सूचनाही त्यांनी केली. 

‘पाणीटंचाईबाबत अहवाल सादर करा’ 
जिल्ह्यातील अनेक गावांत फ्लोराईडयुक्‍त पाणी येते. शुध्द पाणी येत नाही, जलवाहिन्या नादुरुस्त आहेत, अशा तक्रारी प्राप्त होत आहेत. यामुळे हत्तीरोगासारखा आजार होण्याचा धोका संभवतो. त्यामुळे पाणीटंचाईबाबत गंभीर रहावे, जीवन प्राधिकरणाने सर्व तपासणी करुन अहवाल सादर करावा तसेच गावनिहाय अद्ययावत माहिती सादर करण्याचे निर्देशही नाना पटोले यांनी दिले. 
 


इतर ताज्या घडामोडी
काही भागात पावसाच्या उघडिपीची शक्यता महाराष्ट्रावर बुधवार (ता.२३) पर्यंत  १००४...
राज्य द्राक्ष बागायतदार संघाची ...नाशिक: महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार...
पांगरी परिसरात पिकांवर आस्मानी संकटपांगरी, जि. सोलापूर ः पांगरी (ता. बार्शी) परिसरात...
शेतमाल स्थानिक भागात विकला जाणार : भुजबळनाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यात आदिवासी समाज...
परभणी, हिंगोली जिल्ह्यात पावसाचे थैमाननांदेड : मराठवाड्यातील परभणी, हिंगोली जिल्ह्यात...
नाशिक विभागात कांदा लागवडीत ८ हजार...नाशिक : चालू वर्षी खरीप कांद्याच्या लागवडीपूर्वी...
रावेर तालुक्यात सीएमव्ही नुकसानीचे...जळगाव ः कुकुंबर मोसॅक विषाणूमुळे (सीएमव्ही)...
हिंगोली जिल्ह्यात सोयाबीनच्या पिकाला...हिंगोली : जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांपासून...
मराठवाड्यात अतिपाऊस खरीप पिकांच्या...औरंगाबाद : मराठवाड्यात गत काही दिवसांपासून...
धुळ्यात लाळ्या खुरकूत रोग प्रतिबंधक...धुळे : धुळे जिल्ह्यात ३० सप्टेंबरपर्यंत...
पावसाचा डाळींब पिकाला तडाखाआटपाडी, जि. सांगली ः अवर्षण प्रवण असलेल्या आटपाडी...
मायक्रो फायनान्सचे चक्रव्यूह...मुंबई : ग्रामीण भागातील सूक्ष्म वित्त पुरवठा...
नगर जिल्ह्यात अतिवृष्टीचा चार हजार...नगर ः यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीपासून चांगला...
कोकण कृषी विद्यापीठात बांबू कार्यशाळेचे...दापोली, जि. रत्नागिरी : जगभरात दरवर्षी १८...
अकोला जिल्ह्यातील सहा खत विक्रेत्यांचे...अकोला ः या हंगामात खत विक्रीत मोठ्या प्रमाणात...
सदोष बियाणेमुळे भेंडी बीजोत्पादक अडचणीतबुलडाणा ः लोणार तालुक्यातील शेतकऱ्यांनी या...
भातपीक कापणीत पावसाचा अडसररत्नागिरी : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने...
ठाण्यातील १४ हजार हेक्टर पिकांचा काढला...मुंबई : ठाणे जिल्हा कृषी विभागाने यंदा पंतप्रधान...
औरंगाबादमध्ये कांदा ३०० ते २३०० रूपयेऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
आरोग्यदायी विड्याचे पानकोणत्याही धार्मिक कार्यात, पूजेच्या ठिकाणी...