योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सामाजिक संस्थांनी सर्वेक्षण करावे : डॉ. निलम गोऱ्हे

अफार्मच्या वतीने आयोजित परिसंवादात बोलताना डॉ. निलम गोऱ्हे
अफार्मच्या वतीने आयोजित परिसंवादात बोलताना डॉ. निलम गोऱ्हे

पुणे  ः कृषी, ग्रामविकास, पर्यावरण क्षेत्राच्या विकासासाठी शासनाच्या विविध योजना आणि निधी आहे. या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सामाजिक संस्थांनी सर्वेक्षण करून योजनांचे यशापयश सरकारच्या निर्देशनास आणून द्यावे, असे आवाहन विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनी केले. 

ॲक्शन फॉर ॲग्रिकल्चर रिन्युअल इन महाराष्ट्र (अफार्म) या संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कृषी, जल आणि उपजीविका विकास या विषयावरील परिसंवादाच्या समारोप प्रसंगी डॉ. गोऱ्हे बोलत होत्या.

डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, की रोजगार हमी योजनेचे निकष बदलण्यात आले आहेत. मात्र, योजनेची प्रभावी अंमलबजावणी होताना दिसत नाही. नव्या निकषांनुसार नैसर्गिक आपत्तीमध्ये झालेल्या नुकसानीनंतर शेतीची कामे रोहयोअंतर्गत करता येणार आहेत. तसेच, कोकणातील शेत जमिनींची धूप समुद्राच्या पाण्यामुळे होत आहे. ही कामेदेखील रोहयोअंतर्गत करण्यात येणार आहेत. शेतीच्या शाश्‍वत विकासासाठी तालुकापातळीवर तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली समित्या स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या समित्या स्थापन झाल्या का? याचे देखील सर्वेक्षण सामाजिक संस्थांनी करून, त्या समित्या स्थापन करण्यासाठी पुढाकार घ्यावा. 

यावेळी कृषी विकास आणि स्वयंसेवी क्षेत्र या विषयावर माजी कुलगुरू डॉ. व्यंकट मायंदे, स्वंयसेवी क्षेत्रासमोरील आव्हाने व उपाय यावर वाणी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हर्ष जेटली, जलव्यवस्थापन व स्वयंसेवी क्षेत्र यावर वॉटर संस्थेचे संदीप जाधव, विजयअण्णा बोराडे यांनी मार्गदर्शन केले.     

‘ॲग्रोवन प्रभावी माध्यम’ परिसंवादात उपजीविकानिर्मिती आणि स्वयंसेवी क्षेत्र या विषयांवर बोलताना स्वयंसिद्धा संस्थेच्या कांचन परुळेकर म्हणाल्या, की शेतकऱ्यांना प्रेरणा, प्रशिक्षण आणि सबलीकरण या तीन सूत्रांवर मार्गदर्शन करण्याची गरज आहे. शेतकऱ्यांना प्रेरणा मिळण्यासाठी चांगले दाखविणे, ऐकणे आणि वाचन करायला लावले पाहिजे. या तीनही गोष्टी दैनिक ॲग्रोवनमधून मिळतात. ‘ॲग्रोवन’मधून शेतकऱ्यांना चांगले वाचायला आणि पाहायला मिळते. शेतकऱ्यांना चांगले वाचायला शिकवायचे असेल तर ॲग्रोवन वाचायला शिकवावा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com