शेतीमालाचे नुकसान होऊ देणार नाही ः नितीन गडकरी

नाशिक : कोरोना आपत्ती संदर्भात भाजपचे प्रमुख नेते, केंद्रीय मंत्री व लोकप्रतिनिधींची ऑडिओ कॉन्फरन्सद्वारे नुकतीच चर्चा झाली. यात परराज्यात शेतीमालाच्या वाहतुकीत येणाऱ्या अडथळ्यांबाबत खासदार डॉ. भारती पवार यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे समस्या मांडल्या. यावर बोलताना श्री. गडकरी यांनी शेतीमालाचे नुकसान होऊ देणार नसल्याचे आश्वासन दिल्याची माहिती खासदार डॉ. पवार यांनी दिली.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

या चर्चेत खासदार डॉ. पवार यांनी शेतकऱ्यांना सध्या भेडसावणाऱ्या समस्या मांडल्या. जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक अडचणीत आहेत. त्यांच्या द्राक्षे व इतर पाठवलेल्या शेतीमालासाठी परराज्यात अडचणी आहेत. शेतमालाची वाहने परराज्यात अडवून ठेवली जात आहेत. त्यासाठी केंद्र सरकारने योग्य पावले उचलून शेतीमाल वाहतुकीस अडचण निर्माण होऊ नये यासाठी दक्षता घ्यावी असा प्रश्न मांडल्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे कुठलेही नुकसान होऊ देणार नाही. शेतीमालाची वाहतूक करणाऱ्या वाहनांना इतर राज्यातही काही अडचण येणार नाही. याबाबत योग्य काळजी घेतली जाईल, असे आश्वासन डॉ.पवार यांना दिले.

कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासंदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर, पियुष गोयल,भाजप अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी भाजपचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील, व्ही.सतीश, विजय पुराणिक, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, आमदार सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन या प्रमुख नेत्यांसह राज्यातील भाजपा खासदार, आमदार व अन्य प्रमुख नेत्यांसमवेत चर्चा केली.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com