Farmers Agricultural News Marathi The number of onion nurseries increased Jalgaon Maharashtra | Agrowon

खानदेशात कांदा रोपवाटिकांची संख्या वाढली

टीम अॅग्रोवन
रविवार, 5 जुलै 2020

जळगाव  ः खानदेशात यंदा रोपवाटिकांची संख्या वाढली आहे. खरिपात कांदा लागवड वाढणार असल्याचे हे संकेत असून, अनेक शेतकऱ्यांनी रोपांच्या विक्रीतून नफा मिळविण्याचेदेखील नियोजन केले आहे. 

जळगाव  ः खानदेशात यंदा रोपवाटिकांची संख्या वाढली आहे. खरिपात कांदा लागवड वाढणार असल्याचे हे संकेत असून, अनेक शेतकऱ्यांनी रोपांच्या विक्रीतून नफा मिळविण्याचेदेखील नियोजन केले आहे. 

रब्बीमध्ये किंवा सरत्या हंगामात कांद्याचे दर फारसे नव्हते. ३०० ते ७०० रुपये प्रतिक्विंटल दर कांद्याला मिळाले. परंतु, पुढे दर चांगले मिळतील अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. कारण दिवाळीपर्यंत ‘कोरोना’चे संकट काहीअंशी दूर होण्याची शक्यता असून पणन व्यवस्थेत सुधारणा होईल. तसेच कांद्याला मागणीदेखील राहील. कारण कांद्याचा उपयोग पुढे बीजोत्पादनासाठीदेखील अनेक कंपन्या करतील. यामुळे आता खरिपात कांदा लागवड वाढेल, असा अंदाज आहे.

धुळे जिल्ह्यात साक्री, धुळे, शिरपूर, नंदुरबारमधील शहादा, जळगावमधील जामनेर, पाचोरा, धरणगाव, एरंडोल, चोपडा, यावल, जळगाव या भागात कांद्याची लागवड अधिक होणार आहे. खानदेशात मिळून ११ ते १२ हजार हेक्‍टरवर कांदा लागवड होऊ शकते. जेथे लागवड अधिक होईल, त्याच भागात कांदा रोपवाटिका अधिक दिसत आहेत. अनेक शेतकऱ्यांनी आपल्या लागवडीसह रोपांची विक्री करता येईल, या दृष्टीने रोपवाटिका तयार केली आहे. कांदा बियाणे यंदा महाग होते. अजूनही बाजारात कांदा बियाणे उपलब्ध असून, किमान ९५० ते २५०० रुपये प्रतिकिलो दर आहे. अनेक शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांकडून बियाणे खरेदी करून रोपवाटिका तयार केल्या आहेत. 

रोपवाटिकांमध्ये कांदा रोपांची जोमदार वाढ होण्यासह चांगली उगवण व्हावी यासंबंधी मिनी तुषार सिंचन, ठिबक प्रणालीचा सिंचनासाठी वापर केला जात आहे. तसेच दर्जेदार बियाण्याचा उपयोग केला आहे. मागील वर्षी कांदा रोपे महाग होती. कारण अतिपावसाने अनेक शेतकऱ्यांच्या रोपवाटिकांचे नुकसान झाले. त्यामुळे एका तीन फूट रुंद व ४० फूट लांब सरीतील कांदा रोपांची पाच ते सहा हजार रुपयांत विक्री झाली होती. यंदाही रोपे महाग असतील, कारण बियाणे महाग असल्याचे शेतकऱ्यांचे सांगितले. चोपडा तालुक्‍यातील अडावद, धुळ्यातील कापडणे, लामकानी, साक्रीमधील पिंपळनेर आदी भागात रोपवाटिका आहेत.
 


इतर ताज्या घडामोडी
नांदेड, परभणी, हिंगोलीत जून, जुलैमध्ये...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील ६९...
औरंगाबाद, जालन्यातील दोन मंडळांत...औरंगाबाद : औरंगाबाद व जालना जिल्ह्यातील दोन...
नांदेडमधील आठ केंद्रांत अडीच लाख...नांदेड : जिल्ह्यातील सात केंद्रांवरील शेतकऱ्यांची...
सोयाबीनमध्ये एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा...अंबड, जि. जालना  ः ‘‘सर्व शेतकऱ्यांनी...
नगर जिल्ह्यात १३२ टक्के पेरणीनगर ः नगर जिल्ह्यात यंदा चांगला पाऊस झाला....
खानदेशात ‘किसान सन्मान’चे अर्ज प्रलंबित...जळगाव  ः खानदेशात सुमारे सव्वालाख शेतकरी...
शेतकऱ्यांची कृषिमंत्र्यांना दोन हजार...जळगाव : केंद्र सरकारच्या हवामानावर आधारित फळ...
खानदेशात हलक्या जमिनीतील पिके संकटातजळगाव  ः खानदेशात मागील आठ ते १० दिवसांपासून...
जळगाव जिल्ह्यातील मका, ज्वारीची खरेदी...जळगाव : शासकीय मका, ज्वारी खरेदी पुन्हा सुरू...
माळेगाव कारखान्याचे अकरा लाख टन ऊस...माळेगाव, जि. पुणे ः माळेगाव सहकारी साखर...
अकोला कृषी विद्यापीठातील क्वारंटाइन...अकोला ः डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील...
नाशिक जिल्ह्यात चार हजारांवर शेतकरी मका...नाशिक : बाजारात व्यापाऱ्यांकडे खरेदी होणाऱ्या...
वीज बिल माफीसाठी सोमवारी राज्यभर धरणेकोल्हापूर : दरमहा ३०० युनिटसच्या आत वीज वापर...
कोल्हापूर जिल्ह्यात पुरेशा पावसाअभावी...कोल्हापूर : जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांपासून...
पीकविमा भरण्यासाठी मुदतवाढीची मागणीअकोला ः पीकविमा पोर्टल व्यवस्थित न चालल्याने अनेक...
पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये कृत्रिम...रत्नागिरी : उच्च प्रतीची वंशावळ तयार करण्यासाठी...
कपाशीवरील फुलकिडे, पांढऱ्या माशीचे...फुलकिडे : ही कीड फिकट पिवळसर रंगाची असून अत्यंत...
सेंद्रिय शेतीबाबत शरद पवार घेणार बैठकपुणे ः राज्यातील सेंद्रिय व रासायनिक अवशेषमुक्त...
यवतमाळ जिल्ह्यात चार लाख शेतकऱ्यांनी...यवतमाळ : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पीक विमा...
कपाशीवरील किडींचे कामगंध सापळ्याद्वारे...पिकातील किडीच्या नियंत्रणासाठी एकात्मिक कीड...