Farmers Agricultural News Marathi offence filed against Executive Director of sugar factory Kolhapur Maharashtra | Agrowon

कोल्हापुरात मजूराला प्रवासास परवानगी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 2 एप्रिल 2020

कोल्हापूर  ः कोरोनो विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात संचारबंदी लागू केली आहे. लाॅकडाऊन असतानाही हातकणंगले तालुक्यातील नरंदे येथील शरद सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक संतोष डिग्रजे यांनी ऊस तोडणी हंगाम पूर्ण झाल्याने मजूरास लेटर पॅडवर गावी जाण्यास परवानगी देवून संचारबंदीचे उल्लंघन केले आहे. याबाबत प्रादेशिक सहसंचालक साखर कार्यालयाचे उपसंचालक (साखर) एस.एन. जाधव यांनी हातकणंगले पोलिसांत फिर्याद दिली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 

कोल्हापूर  ः कोरोनो विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात संचारबंदी लागू केली आहे. लाॅकडाऊन असतानाही हातकणंगले तालुक्यातील नरंदे येथील शरद सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक संतोष डिग्रजे यांनी ऊस तोडणी हंगाम पूर्ण झाल्याने मजूरास लेटर पॅडवर गावी जाण्यास परवानगी देवून संचारबंदीचे उल्लंघन केले आहे. याबाबत प्रादेशिक सहसंचालक साखर कार्यालयाचे उपसंचालक (साखर) एस.एन. जाधव यांनी हातकणंगले पोलिसांत फिर्याद दिली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 

फिर्यादित म्हटले आहे, की कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. अत्यावश्यक व जीवनावश्यक वस्तुंची वाहतूक वगळून अन्य वाहतुकीसाठी बंदी घालण्यात आली आहे. असे असताना शरद सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक संतोष डिग्रजे यांनी कारखान्याच्या लेटर पॅडवर मजूर रामकिसन भगवान वायनसे (रा. नामेवारी, ता. केज, जि. बीड) हे कारखान्याकडील गळीत हंगाम २०१९-२०२० ऊस तोडणी वाहतूक पूर्ण झाल्याने गावी जात आहेत. त्यांना गावी जाण्यासाठी परवानगी दिलेली आहे. त्यांना जाण्यासाठी अडथळा करु नये, सोडण्यात यावे. अशा आशयाचे पत्र देवून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केले आहे.


इतर ताज्या घडामोडी
खानदेशात पाऊस थांबला, वाफशाची प्रतीक्षाजळगाव : खानदेशात गुरुवारी (ता.२५) पाऊस थांबला....
सांगलीत नियोजनाअभावी थेट शेतमाल विक्री...सांगली : लॉकडाउनच्या काळात संपूर्ण बाजारपेठा बंद...
सोलापुरातील उपबाजार समित्यांचा प्रस्ताव...सोलापूर ः सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या...
कोल्हापुरात शेतकरी संघटनांकडून कृषी...कोल्हापूर : राज्यसभेत मंजूर झालेल्या कृषी...
नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे...सोलापूर ः अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या...
शेतकऱ्यांचे प्रश्‍न शासनाकडे पोचवणार :...नाशिक : ‘‘मी देखील शेतकऱ्याचाच मुलगा आहे. कांदा...
मराठवाड्यात कृषी विधेयकांची होळीऔरंगाबाद / परभणी /  नांदेड :...
वऱ्हाडात विधेयकांविरोधात ‘स्वाभिमानी’...अकोला : केंद्र शासनाने संसदेत नुकतीच...
`अमरावती जिल्ह्यात पीक नुकसानीचे...अमरावती :  जिल्ह्यात संततधार पावसामुळे...
जालना, औरंगाबादमधील दोन मंडळात अतिवृष्टीऔरंगाबाद : काही दिवसांपासून मराठवाड्याच्या...
नगरला निदर्शने, अकोलेत विधेयकांची होळीनगर : केंद्र सरकारने मंजूर केलेल्या तीन शेतकरी...
ऊसतोड मजुरांचा विमा सरकारने उतरवावा नगर ः राज्यात सध्या कोरोना व्हायरस संसर्ग वाढत...
परभणीत हिरव्या मिरचीला २५०० ते ४०००...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
दूध, अंडी ः मानवी आहारासाठी उपयुक्तआपल्या शरीराला लागणारी ऊर्जा आहारातून मिळते...
दहा हजाराची लाच स्वीकारणारा हुलजंतीचा...सोलापूर ः खरेदी केलेल्या जमीन दस्तावर दाखल...
`जतमध्ये मूग, उडीद खरेदी केंद्र सुरू...सांगली :जिल्ह्यात मूग व उडीद हमीभावाने खरेदी...
सांगलीत २८ टक्क्यांवरच ऊस लागवडसांगली :  जिल्ह्यात गेल्या आठवड्यापूर्वी...
खानदेशातील बाजारात उडदाच्या आवकेत घटजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...
नाशिकमध्ये खासदारांच्या घरासमोर  'राख...नाशिक : केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने...
नगर जिल्ह्यात कांदा बियाणे गरज,...नगर ः जिल्ह्यात दरवर्षी सुमारे एक लाख...