Farmers Agricultural News Marathi onion harvesting starts Satara Maharashtra | Agrowon

खटाव तालुक्यात रखरखत्या उन्हात कांदा काढणीस प्रारंभ

टीम अॅग्रोवन
बुधवार, 8 एप्रिल 2020

बुध, जि.सातारा  : खटाव तालुक्‍याच्या उत्तरेकडील पट्ट्यात कांदा काढणीच्या कामांना वेग आला असून, रखरखत्या उन्हात मजूर व शेतकरी चार महिने अहोरात्र कष्ट करून तयार केलेल्या कांद्याच्या काढणीसाठी उन्हाच्या झळा सोसताना दिसत आहेत. 
यावर्षी प्रतिकूल हवामानामुळे कांद्याच्या उत्पादनात सरासरी ३० टक्के घट झाल्याचे शेतकरी सांगत आहेत. 

बुध, जि.सातारा  : खटाव तालुक्‍याच्या उत्तरेकडील पट्ट्यात कांदा काढणीच्या कामांना वेग आला असून, रखरखत्या उन्हात मजूर व शेतकरी चार महिने अहोरात्र कष्ट करून तयार केलेल्या कांद्याच्या काढणीसाठी उन्हाच्या झळा सोसताना दिसत आहेत. 
यावर्षी प्रतिकूल हवामानामुळे कांद्याच्या उत्पादनात सरासरी ३० टक्के घट झाल्याचे शेतकरी सांगत आहेत. 

ग्रामीण भागात ३५ ते ४० अंश दरम्यान तापमान आहे. उन्हाच्या झळांनी अंगाची लाही-लाही होत असतानाही उत्तर खटाव परिसरातील शेतकरी मजूर व कुटुंबातील सदस्यांच्या मदतीने कांदा काढणीत गुंतले आहेत. असह्य उकाड्यातही डिस्कळ, गारवडी, ललगुण, नागनाथवाडी, फडतरवाडी, बुध, काटेवाडी परिसरातील शेतकरी कांदा काढणीत व्यस्त आहेत. यावर्षी पाऊस चांगला झाल्याने बोअरवेल व विहिरींना बऱ्यापैकी पाणी असल्यामुळे परिसरात चालू वर्षी कांदा लागवड क्षेत्रात वाढ झाली आहे.

मात्र, सततच्या ढगाळ वातावरणामुळे व पहाटे पडणाऱ्या दाट धुक्‍यामुळे कांदा पिकावर रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने दरवर्षीच्या तुलनेत सरासरी उत्पादनात ३० ते ४० टक्के घट जाणवत असल्याचे सांगण्यात येत आहे.

एकीकडे तापमान वाढीमुळे व ‘कोरोना’च्या भीतीपोटी नागरिकांना घराबाहेर पडू नये, असे सांगितले जात असताना शेतकरी व मजूर वर्ग मात्र चार पैसे मिळावेत, यासाठी उन्हाच्या झळा सोसत कांदा काढणी करताना दिसत आहे. सध्या ‘कोरोना’मुळे बाजारपेठांवर मर्यादा आल्यामुळे बाजारभाव कमी असल्याने शेतकरी कांदा चाळींमध्ये साठवण्यावर भर देत आहेत.


इतर ताज्या घडामोडी
निर्यात अडथळे, बियाणे दराचा कांदा...जळगाव ः खानदेशात प्रतिकूल वातावरणामुळे खरिपातील...
परभणीत भेंडी १००० ते १५०० रूपये क्विंटल परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
सोलापूर जिल्ह्यात दमदार पाऊस सोलापूर : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून...
नगर जिह्यात पावसाने पिकांचे अतोनात...नगर  : जिल्ह्याच्या बहुतांश भागात...
सोनी गावामध्ये आहेत २८८ शेततळीसोनी (ता. मिरज,जि.सांगली) या गावात  कृषी...
कर्नाळा बँकेत ३६ ग्रामपंचायतींचे पैसे...मुंबई : ‘शेकाप’चे माजी आमदार विवेक पाटील यांच्या...
मराठवाड्याच्या विकासासाठी शासन कटीबध्द...औरंगाबाद : मराठवाड्याच्या सर्वांगिण विकासासाठी...
केंद्राच्या कांदा निर्यातबंदी विरोधात...नाशिक : केंद्र सरकारने कुणाचीही ओरड नसताना, अन्न...
औरंगाबादमधील नुकसानग्रस्त पिकांचे...औरंगाबाद : ‘‘जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान...
खानदेशातील पपई पिकाला अतिपावसाचा फटकाजळगाव : खानदेशात पपई पिकाला अतिपावसाचा फटका बसला...
नांदेडमध्ये ३८ हजार हेक्टर पिकांचे...नांदेड : अतिवृष्टी व पूरामुळे जिल्ह्यातील ३८१...
‘म्हैसाळ’मधून पावणेदोन टीएमसी पाणी उचललेसांगली  ः कृष्णा नदीला आलेल्या पूराचे पाणी...
कांदा निर्यातबंदीविरूध्द कॉंग्रेसचे...रत्नागिरी : कांदा निर्यातीबाबतचा निर्णय...
मुसळधार पावसामुळे पिके भुईसपाटपुणे ः राज्यातील अनेक भागांत कमीअधिक स्वरूपात...
पानपिंपरी पिकाला विम्याचे कवच द्याअकोला ः जिल्ह्यात पानपिंपरी या वनौषधीवर्गीय...
सीमाभाग आणि बंदरातील कांदा सोडा; अन्यथा...नाशिक : टाळेबंदी शिथिल झाल्यानंतर शेजारील...
कोल्हापुरात ‘गोकूळ’चे दूध रोखण्याचा...कोल्हापूर : मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्याच्या...
शरद पवार यांनी ऊसतोड कामगारांची कोंडी...नगर ः ऊसतोडणी कामगारांच्या तोडणी दरात वाढ करावी...
फळबाग लागवडीसाठी जमिनीची निवड महत्त्वाचीसामान्यपणे फळबागा अयशस्वी होण्यामध्ये किंवा...
बियाणासाठी घरचे सोयाबीन ठेवताना...बियाण्यासाठी निवड करण्यात आलेल्या प्लॉटमध्ये...