farmers agricultural news marathi onion rates increase nagar maharashtra | Page 2 ||| Agrowon

घोडेगावला कांद्यास कमाल १६५०० रुपये दर

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 5 डिसेंबर 2019

नगर  : जिल्ह्यातील घोडेगाव तालुका नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता.४) कांद्याला तब्बल १६ हजार ५०० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. आत्तापर्यंतचा हा सर्वात उच्चांकी दर असल्याचे सांगण्यात आले. दोन दिवसांपूर्वी येथे कांद्याला १३ हजार ५०० रुपये क्विंटल दर मिळाला होता. बुधवारी बाजार समितीत कांदा खरेदी व विक्रीतून साधारण अडीच कोटींची उलाढाल झाली.

नगर  : जिल्ह्यातील घोडेगाव तालुका नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता.४) कांद्याला तब्बल १६ हजार ५०० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. आत्तापर्यंतचा हा सर्वात उच्चांकी दर असल्याचे सांगण्यात आले. दोन दिवसांपूर्वी येथे कांद्याला १३ हजार ५०० रुपये क्विंटल दर मिळाला होता. बुधवारी बाजार समितीत कांदा खरेदी व विक्रीतून साधारण अडीच कोटींची उलाढाल झाली.

घोडेगाव बाजार समितीमध्ये सोमवार, बुधवार, गुरुवारी कांद्याचे लिलाव होत असतात. गेल्या महिनाभरापासून बाजारात कांद्याची मोठी टंचाई निर्माण झाली असल्याने राज्यभर भाव तेजीत आहेत. बहुतांशी बाजार समितीत कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे. बुधवारी सकाळी ११ वाजता बाजार समितीत लिलाव सुरू होताच जुन्या गावरान कांद्याला त्याला तब्बल १६ हजार ५०० रुपये क्विंटल असा दर मिळाला.

बाजार समितीतील आवक झालेल्या दहा हजार गोण्यापैकी साधारण तीनशे पंचवीस गोण्यांना हा दर मिळाला असल्याचे बाजार समितीचे सचिव देवदत्त पालवे यांनी सांगितले. दर कांदा लिलावाला साधारण तीस हजार गोण्यांची आवक होत असते, मात्र गेल्या महिनाभरापासून आवकही कमालीची घटली आहे. गेल्या आठ दिवसांपासून कांद्याचे दर उच्चांकी होत असल्याने ज्यांच्याकडे कांदा शिल्लक आहेत त्या शेतकऱ्यांनी मात्र समाधान व्यक्त केले आहे. बुधवारी सलग दुसऱ्या लिलावाला कांदा दरात साधारण क्विंटलमागे तीन हजार रुपयांनी वाढच झाली आहे.


इतर अॅग्रो विशेष
यांत्रिकीकरणाचे वास्तव!मागच्या वर्षात (२०२०) भारतात नऊ महिने कडक...
बर्ड फ्लू ः खबरदारी आणि जबाबदारीमार्च-एप्रिल २०२० पासून देशात कोरोनाच्या...
पोखरलेला ‘पोकरा’नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पातून (पोकरा) ...
प्रस्थापितांना दणका; तरुणाईची मुसंडी पुणे : राज्यात सोमवारी (ता. १८) ग्रामपंचायतींच्या...
किमान तापमानात वाढ पुणे ः राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र व...
शेतकऱ्यांच्या रॅलीबाबतचा निर्णय ...नवी दिल्ली ः विविध शेतकरी संघटनांकडून प्रजासत्ताक...
गहू, तांदळाच्या दराच्या प्रश्‍नांमुळेच...माळेगाव, जि. पुणे : देशपातळीवर आणि विशेषतः...
निर्यातीची साखर वाहतूक कंटेनर अभावी...कोल्हापूर: केंद्राच्या साखर निर्यात अनुदान...
रंगीत कापसाचा प्रयोग यशस्वीयवतमाळ  ः शेतीचा व्यासंग जपलेल्या मारेगाव...
व्यावसायिक दृष्टिकोनामुळेच यशस्वी...पुणे जिल्ह्यात अति पावसाच्या मावळ तालुक्यातील...
संयुक्त कुटुंबाचे शेती, पूरक उद्योगाचे...यशवंतवाडी (जि. लातूर) येथील पाच भाऊ व एकूण ४०...
बीजमाता राहीबाई पोपेरे करणार लोकसभा...अकोले, जि. नगर : पारंपरिक बियाण्यांची जोपासना...
ऊसतोडणीचा प्रश्‍न गंभीर नाशिक : गेल्या काही वर्षांपासून जिल्ह्यातील निफाड...
सोयाबीन विक्रमी टप्पा गाठेल कमी उत्पादन, चांगली निर्यात आणि वाढलेला वापर हे...
कृषी पंढरीतील यात्रेची उत्सुकता शिगेला माळेगाव, बारामती ः येथील कृषी पंढरीत आजपासून (ता....
‘पोकरा’ अनुदानातून अनेक घटक वगळले पुणे : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पातून (...
कृषी आयुक्‍त थेट बांधावर औरंगाबाद : कृषी विभागाच्या क्षेत्रीय भेट व आढावा...
ठिकठिकाणी ढगाळ वातावरण पुणे ः मागील दोन दिवसांपासून अरबी समुद्राच्या...
समविचारी शेतकऱ्यांचे राष्ट्रीय संघटन...नागपूर ः शेती प्रश्‍नांच्या सोडवणुकीसाठी...
दुष्काळी स्थितीतही द्राक्षाने दिले...सांगली जिल्ह्यातील वायफळे (ता. तासगाव) येथील...