Farmers Agricultural News Marathi online training at agriculture university Nagar Maharashtra | Agrowon

राहुरी कृषी विद्यापीठात सेंद्रिय शेती, निविष्ठा वापरावर ऑनलाइन प्रशिक्षण

टीम अॅग्रोवन
सोमवार, 11 मे 2020

नगर   ः राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कास्ट-कासम प्रकल्पाअंतर्गत सेंद्रिय शेती, निविष्ठा वापर, उत्पादन, प्रमाणीकरण व विपणन व्यवस्थापन या विषयावर शेतकऱ्यांसाठी सोमवार (ता.११) ते शुक्रवार (ता.१५) या पाच दिवसांच्या कालावधीत ऑनलाइन प्रशिक्षणाचे आयोजन केले आहे.

नगर ः राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कास्ट-कासम प्रकल्पाअंतर्गत सेंद्रिय शेती, निविष्ठा वापर, उत्पादन, प्रमाणीकरण व विपणन व्यवस्थापन या विषयावर शेतकऱ्यांसाठी सोमवार (ता.११) ते शुक्रवार (ता.१५) या पाच दिवसांच्या कालावधीत ऑनलाइन प्रशिक्षणाचे आयोजन केले आहे.

नैसर्गिक स्त्रोतांचे जतन, जमिनीची सुपीकता,पर्यावरण व जैवविविधतेचे रक्षण, बदलत्या हवामानात स्थानिक परिस्थितीशी जुळवून घेऊन रसायन अवशेषमुक्त अन्नधान्य व फळांचे शाश्वत उत्पादन घेण्याकरिता सेंद्रिय शेती पद्धती एक सक्षम पर्याय म्हणून बघितले जाते. याच अनुषंगाने शाश्वत पर्यावरणाचा समतोल राखून शाश्वत उत्पादनासाठी सेंद्रिय शेती, निविष्ठा वापर, उत्पादन, प्रमाणीकरण व विपणन व्यवस्थापन या विषयावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे.

आठवडाभराच्या मार्गदर्शनात शिक्षण व संशोधन संचालक डाॅ. हरिहर कौसडीकर, रोमीफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष डाॅ. प्रशांत नाईकवाडी, सचिन पालकर, विवेक रोहोकले, संतोष चव्हाण, तुषार उगले, विश्वासराव पाटील, संजय राऊत, स्वप्नील खर्डे, स्वाती शिंगाडे मार्गदर्शन करणार आहेत. १५० शेतकऱ्यांना यात सहभागी होता येणार आहे, असे डाॅ. सुनील गोरंटीवार, संयोजक डॉ. उल्हास सुर्वे यांनी दिली. प्रशिक्षणाचे समन्वयक म्हणून डॉ. शुभांगी घाडगे, डॉ. सेवक ढेंगे, मोहसीन तांबोळी, हेमंत जगताप हे काम बघणार आहेत.


इतर ताज्या घडामोडी
काही भागात पावसाच्या उघडिपीची शक्यता महाराष्ट्रावर बुधवार (ता.२३) पर्यंत  १००४...
राज्य द्राक्ष बागायतदार संघाची ...नाशिक: महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार...
पांगरी परिसरात पिकांवर आस्मानी संकटपांगरी, जि. सोलापूर ः पांगरी (ता. बार्शी) परिसरात...
शेतमाल स्थानिक भागात विकला जाणार : भुजबळनाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यात आदिवासी समाज...
परभणी, हिंगोली जिल्ह्यात पावसाचे थैमाननांदेड : मराठवाड्यातील परभणी, हिंगोली जिल्ह्यात...
नाशिक विभागात कांदा लागवडीत ८ हजार...नाशिक : चालू वर्षी खरीप कांद्याच्या लागवडीपूर्वी...
रावेर तालुक्यात सीएमव्ही नुकसानीचे...जळगाव ः कुकुंबर मोसॅक विषाणूमुळे (सीएमव्ही)...
हिंगोली जिल्ह्यात सोयाबीनच्या पिकाला...हिंगोली : जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांपासून...
मराठवाड्यात अतिपाऊस खरीप पिकांच्या...औरंगाबाद : मराठवाड्यात गत काही दिवसांपासून...
धुळ्यात लाळ्या खुरकूत रोग प्रतिबंधक...धुळे : धुळे जिल्ह्यात ३० सप्टेंबरपर्यंत...
पावसाचा डाळींब पिकाला तडाखाआटपाडी, जि. सांगली ः अवर्षण प्रवण असलेल्या आटपाडी...
मायक्रो फायनान्सचे चक्रव्यूह...मुंबई : ग्रामीण भागातील सूक्ष्म वित्त पुरवठा...
नगर जिल्ह्यात अतिवृष्टीचा चार हजार...नगर ः यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीपासून चांगला...
कोकण कृषी विद्यापीठात बांबू कार्यशाळेचे...दापोली, जि. रत्नागिरी : जगभरात दरवर्षी १८...
अकोला जिल्ह्यातील सहा खत विक्रेत्यांचे...अकोला ः या हंगामात खत विक्रीत मोठ्या प्रमाणात...
सदोष बियाणेमुळे भेंडी बीजोत्पादक अडचणीतबुलडाणा ः लोणार तालुक्यातील शेतकऱ्यांनी या...
भातपीक कापणीत पावसाचा अडसररत्नागिरी : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने...
ठाण्यातील १४ हजार हेक्टर पिकांचा काढला...मुंबई : ठाणे जिल्हा कृषी विभागाने यंदा पंतप्रधान...
औरंगाबादमध्ये कांदा ३०० ते २३०० रूपयेऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
आरोग्यदायी विड्याचे पानकोणत्याही धार्मिक कार्यात, पूजेच्या ठिकाणी...