Farmers Agricultural News Marathi orange growers facing trouble due to transportation close Amaravati Maharashtra | Agrowon

वाहतूक बंद असल्याने संत्रा उत्पादकांचे १०० कोटींचे नुकसान

टीम अॅग्रोवन
शनिवार, 28 मार्च 2020

वरुड तालुक्‍यात साधारणपणे १०० कोटी रुपयांची ३५ हजार टन संत्री बागेत पडून आहेत. ‘कोरोना’चे संकट गहिरे आहे. तथापि, शेतकऱ्यांची स्थिती देखील खूपच गंभीर आहे. त्यामुळे तालुक्‍यातील संत्रा बागांचे उपग्रहाव्दारे सर्व्हेक्षण करुन एकरी एक लाख रुपयांची मदत शासनाने देणे गरजेचे आहे.
- रमेश जिचकार, संत्रा उत्पादक, नागझिरी, जि. अमरावती.

अमरावती  ः कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर वाहतूक व्यवस्था बंद आहे. त्याचा सर्वाधिक फटका वरुड तालुक्‍यातील संत्रा उत्पादकांना बसला आहे. यामुळे सुमारे १०० कोटींचे नुकसान होण्याचा अंदाज असल्याने या नुकसानीच्या सर्व्हेक्षणासाठी उपग्रहाचा वापर करावा, अशी मागणी संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे.
 

गेल्या तीन ते चार वर्षांपासून अस्मानी संकटांचा मुकाबला करुन शेतकऱ्यांनी संत्रा बागा जगविल्या आहेत. हंगामाच्या पूर्वार्धात भावात थोडी पडझड झाली असली तरी त्यानंतर बाजार सावरल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता. आता कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारकडून लॉकडाऊन जाहिर करण्यात आला आहे. त्याचा सर्वाधीक फटका मृग बहरात संत्रा उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना बसला आहे.

एकट्या वरुड तालुक्‍यात एक लाख टन संत्र्याचे उत्पादन अपेक्षित होते. त्यापैकी आजमितीला ६० ते ६५ टक्‍के संत्र्याची विल्हेवाट लागली आहे. हंगाम अंतिम टप्प्यात असताना ३५ हजार टन संत्री झाडावर आहेत. बाजारात तेजी असल्याने २८ ते ३० हजार रुपये प्रती टन दराने सौदे सुरु होते. व्यापारी आणि संत्रा उत्पादक दोघांचीही लगबग सुरु होती. मात्र लॉकडाऊनमुळे आता सौदे रखडले आहे. काही ग्रामस्थांनी गावांच्या सीमा बंद केल्या आहेत. मृग बहाराची संत्री आता फार काळ टिकणे शकय नाही. त्यामुळे त्याची विल्हेवाट कशी लावता येईल, या विवंचनेत शेतकरी आहेत. 
 


इतर अॅग्रो विशेष
पावसाचा जोर ओसरणार पुणे ः गेले काही दिवस मराठवाडा, मध्य महाराष्ट्र,...
मोडून पडली काढणीला आलेली केळी औरंगाबाद: काही दिवसांत जवळपास दोन वर्ष...
निर्यातबंदीनंतरही कांदा खाणार भाव पुणे: निसर्ग चक्रीवादळात कांदा रोपवाटिकांचे...
पावसाचे धुमशान सुरुच पुणे   ः राज्यातील काही भागांत...
जळगाव जिल्ह्यात केळीचे १०० कोटींवर...जळगावः केळीसाठी प्रसिद्ध असलेल्या जळगाव...
यांत्रिकीकरण योजना सुरु, पोर्टल मात्र...नगर ः शेती अवजारांसह अन्य वैयक्तिक लाभाच्या...
निम्मे कांदा कंटेनर अद्यापही बंदरावरच नाशिक: कांदा निर्यातबंदीच्या निर्णयाअगोदर मुंबई...
कृषी विभागाच्या विविध पुरस्कारांसाठी...बुलडाणा : कृषी विभागाच्यावतीने देण्यात येणाऱ्या...
कृषी विधेयकांमध्ये मोठा विरोधाभास ः शरद...मुंबई : कृषी विधेयकांवर राज्यसभेत दोन ते तीन दिवस...
तुरीचे दर प्रतिक्विंटल सहा हजारांवरनागपूर : स्थानिक प्रक्रिया उद्योजकांकडून मागणी...
सूक्ष्मदर्शक, स्वयंचलित हवामान केंद्र...तंत्रज्ञान समजून वापर केला तर शेती सुलभ होऊ शकते...
तिढा सुटावा लवकर!मागील गळीत हंगाम अंतिम टप्प्यात असताना राज्यात...
कांदा निर्यातबंदी आवडे सरकारलाकेंद्र सरकारने अचानक कांद्यावर निर्यातबंदी लादली...
खानदेशातील सिंचन प्रकल्प भरलेजळगाव : खानदेशात या महिन्यातील जोरदार पावसाने...
मराठवाड्यात कपाशी काळवंडली, सोयाबीन...औरंगाबाद : सततच्या पावसाने औरंगाबाद, जालना, बीड...
खानदेशातील कांदेबाग केळी काढणीला वेगजळगाव : खानदेशात कांदेबाग केळी काढणी सुरू झाली...
शेती विधेयकांविरोधात शुक्रवारी बंदपुणे ः केंद्र सरकारने लोकसभेत पास केलेल्या...
राहुरी कृषी विद्यापीठासाठी नव्या...पुणे: महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठाच्या...
कांदा बियाण्याची टंचाईनगरः गेल्यावर्षी पाऊस व बदलत्या वातावरणामुळे...
‘कृषी’तील ‘वतनदारी’ निवृत्तीनंतरही कायमपुणे: कृषी आयुक्तालयात वर्षानुवर्षे राखलेली ‘...