Farmers Agricultural News Marathi over sixty three thousand farmer eligible for loan waiver scheme Satara Maharashtra | Agrowon

सातारा जिल्ह्यातील ६३ हजारांवर शेतकऱ्यांना होणार कर्जमाफीचा लाभ

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 25 फेब्रुवारी 2020

महाराष्ट्र बँकेच्या लिंब शाखेतून १ लाख ६८ हजार रुपयांचे पीककर्ज घेतले होते. सोमवारी या बँकेत येऊन आधार प्रमाणीकरण केले. याची पावती मला बँकेने दिली. हे प्रमाणीकरण केल्यानंतर तत्काळ कर्जमुक्ती योजनेची प्रक्रिया सुरू असलेला एसएमएस आला. या योजनेमुळे मी कर्जमुक्त होणार आहे.
- हणमंत सावंत, लिंब, जि. सातारा.

सातारा  : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या प्राथमिक प्रमाणीकरणाचा प्रारंभ सोमवारी (ता. २४) सातारा तालुक्यातील लिंब व फलटण तालुक्यातील गुणवरे येथे करण्यात आला. जिल्ह्यातील ६३ हजार ७७६ शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ होणार असून, जवळपास ४४५ कोटी रुपये एवढी थकीत कर्जाची रक्कम आहे. शेतकऱ्यांच्या याद्या शुक्रवारपर्यंत (ता. २८) उपलब्ध होणार असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक प्रकाश आष्टेकर यांनी दिली.

सातारा तालुक्यातील लिंब आणि फलटण तालुक्यातील गुणवरे येथील थकबाकीदार शेतकरी सभासदांचे आधार प्रमाणीकरण करून कर्जमाफी योजनेचा प्रारंभ सोमवारी श्री. आष्टेकर यांच्या हस्ते लिंब येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी तहसीलदार आशा होळकर, महाराष्ट्र बँकेचे अंचल प्रबंधक वसंत गागरे, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक महादेव शिरोळकर, सहायक उपनिबंधक बाळासाहेब तावरे आदी उपस्थित होते.

लिंब व गुणवरे येथील ३६२ शेतकऱ्यांची प्राथमिक यादी सोमवारी पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. या दोन्ही गावांतील शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरणाचे काम युद्धपातळीवर करण्यात आले. या योजनेंतर्गत लिंब व गुणवरे या गावांची यादी पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आली असून, या दोन्ही गावांतील ३६२  शेतकऱ्यांना कर्जमाफीबाबत एसएमएस पाठविण्यात आले आहेत. 
 


इतर ताज्या घडामोडी
राज्यात वळीव पावसाचा दणका सुरूच पुणे : राज्यातील पुणे, नगर, जालना, यवतमाळ,...
गरजूंसाठी या बळीराजाने खुली केली...नाशिक : सध्याच्या टाळेबंदीच्या काळात हातावर...
मुख्य सचिव अजोय मेहता यांना मुदतवाढमुंबई  : राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता...
अंकुशनगर परिसरात पावसाचा दणका अंकूशनगर, जि. जालना: एकिकडे कोरोनाचे सावट...
परराज्यातील कामगार, कष्टकऱ्यांची पूर्ण...मुंबई : जीवनावश्यक वस्तूंची, औषधांची कमी नाही,...
विमानसेवा बंदचा भाजीपाला निर्यातीला...पुणे : फेब्रुवारी ते मे या काळात युरोपीय...
देशातील रुग्णसंख्या ९०० च्या घरातनवी दिल्ली : महासत्ता अमेरिकेसह संपूर्ण जगात...
मुंबई बाजार समितीत आज व्यापाऱ्यांचा...मुंबई : राज्य शासनाच्या आदेशामुळे सुरू...
‘कोरोना’चा सामना करण्यासाठी ११ हजार...अकोला  ः कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे...
वऱ्हाडातील ६५ हजारांवर नागरिक गावी परतलेअकोला ः रोजगार, नोकरीच्या निमित्ताने शहरांमध्ये...
अकोल्यातील दिड हजारांवर शेतकऱ्यांची...अकोला ः कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव...
जिल्हा परिषदेचे दीड लाख कर्मचारी देणार...नगर ः कोरोना संसर्गाबाबत उपाययोजना करण्यासाठी...
नगर जिल्ह्यात तिसऱ्या दिवशी पावसाचा...नगर  ः नगर जिल्ह्यामध्ये सलग तिसऱ्या दिवशी...
शेतमाल निर्यातीसाठी वाणिज्य मंत्रालयाने...नागपूर  ः राज्यात जारी करण्यात आलेल्या...
औरंगाबाद, जालना जिल्ह्यात पाऊस औरंगाबाद/जालना: दोन्ही जिल्ह्यातील जवळपास ६७...
कलिंगड, खरबूज उत्पादक शेतकऱ्यांना फटकासोलापूर ः खास उन्हाळी हंगाम डोळ्यासमोर ठेवून...
राज्य तलाठी संघांकडून एक दिवसाचे वेतन...परभणी ः कोरोना बाधितांच्या मदतीसाठी तलाठी, मंडल...
नांदेड येथे वाहतूक प्रमाणपत्र कक्ष...नांदेड ः अत्यावश्यक सेवा, वस्तू यांचा पुरवठा...
सांगली, मिरज, कुपवाड शहरात घरपोच...सांगली ः महापालिकेतर्फे सांगली, मिरज आणि कुपवाड...
नगर जिल्ह्यात लाख मोलाची फुले होताहेत...नगर ः ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर परराज्यातील...