Farmers Agricultural News Marathi Paddy cultivation is low in akole Maharashtra | Agrowon

अकोले तालुक्यात भात लागवडीचे प्रमाण कमीच

टीम अॅग्रोवन
सोमवार, 6 जुलै 2020

नगर  : अकोले तालुक्यात अद्यापपर्यंत जोरदार पाऊस नसल्याने भातलागवडीचे प्रमाण अजूनही अल्पच आहे. तालुक्यात आतापर्यंत सरासरीच्या केवळ एक टक्के भात लागवड झाल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले. 

नगर  : अकोले तालुक्यात अद्यापपर्यंत जोरदार पाऊस नसल्याने भातलागवडीचे प्रमाण अजूनही अल्पच आहे. तालुक्यात आतापर्यंत सरासरीच्या केवळ एक टक्के भात लागवड झाल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले. गेले दोन दिवसांपासून भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाला सुरवात झाली आहे. पावसाने भातखाचरे भरून गेल्याने शेतकरी समाधान व्यक्त करीत आहेत. 

अकोले तालुक्याच्या पश्चिम भागात दरवर्षी जोरदार पाऊस पडत असतो. त्यामुळे जुलै महिन्यात भातलागवडीला अधिक वेग असतो. यंदा मात्र अन्य भागांत जोरदार पाऊस झालेला असला तरी या भागात जोरदार पाऊस नाही. त्यामुळे भात लागवडीला फारसा वेग येताना दिसत नाही. तालुक्यात भाताचे क्षेत्र १४ हजार ३६ हेक्टर आहे. मात्र आतापर्यंत केवळ ९३ हेक्टर क्षेत्रावर भातलागवड झाले आहे. पुरेसा पाऊस नसल्याने भात लागवडीला अडचणी निर्माण झाल्या. 

दरम्यान, दोन दिवसांपासून अकोले तालुक्याच्या पश्चिम भागातील भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाला सुरवात झाली आहे. आदिवासी पट्ट्यातील घाटघर, उडदावणे, पांजरे, मुतखेल, रतनवाडी, चिंचोडी, शेंडी, वाकी, पेंडशेत, बारी भागातील गावांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. यामुळे आता भातलागवडीला वेग येणार आहे.


इतर ताज्या घडामोडी
खानदेशात भिज पावासाने पिकांना लाभजळगाव  ः खानदेशात मागील दोन दिवस भिज पाऊस...
सोलापूर जिल्ह्यात मूगाची पाने पिवळी पडू...सोलापूर  ः जिल्ह्यात पावसाने वेळेवर हजेरी...
प्राथमिक शिक्षकांच्या प्रशासकीय बदल्या...कुसुंबा, जि. धुळे ः सर्वांत मोठा नोकर वर्ग म्हणून...
बार्शीतील रेशनच्या धान्य...सोलापूर  ः बार्शी तालुक्यातील रेशनचे धान्य...
शेत जमिनीच्या मोजणीसाठी चार हजार...सोलापूर ः पती-पत्नीच्या नावावर असलेल्या...
‘आयआयएचआर’चे बियाणे आता ऑनलाइन नाशिक : भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या बंगळुरू...
मराठवाड्यात पीक कर्जाचे ४०.८३ टक्केच...औरंगाबाद : मराठवाड्यात शेतकऱ्यांना खरीप पीक...
पुणे जिल्ह्यातील सहा धरणांत ८०...पुणे ः धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम...
सातारा जिल्हा बँकेतर्फे १३४ टक्के...सातारा : जिल्हा वार्षिक पत आराखाड्यात २०२०-२१...
जनावरांमध्ये `लंपी स्किन`चा संसर्ग नांदेड  ः अर्धापूर परिसरात गाय, बैल आदी...
नांदेड जिल्ह्यातील एक लाख ९२ हजार...नांदेड  ः यंदा जिल्ह्यातील २ लाख ६८ हजार...
ओसंडून वाहतोय आडोळ प्रकल्पशिरपूरजैन, जि. वाशीम ः दमदार पावसामुळे येथील आडोळ...
काटेपूर्णा प्रकल्प तुडुंब, पाणी साठ्यात...अकोला ः यंदाच्या मोसमात आत्तापर्यंत वेगवेगळ्या...
अकोला जिल्ह्यात युरिया खताचा वापर वाढलाअकोला ः जिल्ह्यामध्ये मागील वर्षाच्या तुलनेत...
राधानगरी धरणाचे दोन दरवाजे खुलेचकोल्हापूर : जिल्ह्याच्या पश्‍चिमेकडील...
नाशिक शहरात बैलपोळा साहित्याच्या...नाशिक : गेल्या वर्षांपासून शेतीमालाचे नुकसान व...
मालेगाव तालुक्यात भाजीपाल्यासह खरीप...नाशिक : मालेगाव तालुक्यातील पश्चिम भागात झालेल्या...
येलदरीच्या दोन दरवाजातून विसर्गपरभणी : बुलडणा जिल्ह्यातील खडकपूर्णा धरणातील...
सांगली जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरलासांगली ः जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला आहे....
नाशिकमध्ये ढोबळी मिरची प्रतिक्विंटल...नाशिक  : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...