Farmers Agricultural News Marathi Permission for sale and purchase of land solapur Maharashtra | Agrowon

सोलापूर जिल्ह्यात जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारास परवानगी

टीम अॅग्रोवन
शनिवार, 9 मे 2020

सोलापूर  ः शहर हद्दीतील कार्यालये वगळता ग्रामीण भागातील जमीन खरेदी-विक्री नोंदणीसाठी उपनिबंधक कार्यालये सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी काढले आहेत. त्यामुळे दक्षिण सोलापूर व उत्तर सोलापूर वगळता इतर सर्व तालुक्यातील कार्यालयातून जागा, जमीन खरेदी-विक्री करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

सोलापूर  ः शहर हद्दीतील कार्यालये वगळता ग्रामीण भागातील जमीन खरेदी-विक्री नोंदणीसाठी उपनिबंधक कार्यालये सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी काढले आहेत. त्यामुळे दक्षिण सोलापूर व उत्तर सोलापूर वगळता इतर सर्व तालुक्यातील कार्यालयातून जागा, जमीन खरेदी-विक्री करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

जिल्ह्यातील प्रामुख्याने पंढरपूर, बार्शी, करमाळा, माढा, मोहोळ, माळशिरस, सांगोला, मंगळवेढा व अक्कलकोट या तालुक्यातील खरेदी-विक्री कार्यालये सुरू होतील. असे असले तरी लॅाकडाउनमुळे लोकांना या कार्यालयापर्यंत पोचणे शक्य आहे का, ते कशाने प्रवास करणार, हा प्रश्न आहे. प्रत्येक कार्यालयात कर्मचारी व नागरिकांमध्ये सुरक्षित अंतर राहिल, याची विभागप्रमुखांकडून काळजी घ्यावी, सॅनिटायझर, मास्कचा वापर करणे बंधनकारक असल्याचे आदेशात नमूद केले आहे.

परंतु सार्वजनिक वाहतूक सेवा बंद आहे. खरेदी-विक्री करणारे बॉण्डरायटर, संबंधित कर्मचारी यांच्यासाठी आदेशात परवानगी असल्याचे नमूद नाही. खरेदी-विक्रीच्या व्यवहारासाठी नागरिकांना पोलिसांकडून परवानगी दिली जाणार का? खरेदी-विक्रीसाठी पास काढावे लागणार का? यावरही जिल्हा प्रशासनाकडून काहीच स्पष्ट करण्यात आले नाही. त्यामुळे कार्यालये सुरू केली तरी नागरिकांकडून कितपत प्रतिसाद मिळेल, याबाबत साशंकता आहे.
 


इतर ताज्या घडामोडी
सोलापूर जिल्ह्यात दमदार पाऊस सोलापूर : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून...
नगर जिह्यात पावसाने पिकांचे अतोनात...नगर  : जिल्ह्याच्या बहुतांश भागात...
सोनी गावामध्ये आहेत २८८ शेततळीसोनी (ता. मिरज,जि.सांगली) या गावात  कृषी...
कर्नाळा बँकेत ३६ ग्रामपंचायतींचे पैसे...मुंबई : ‘शेकाप’चे माजी आमदार विवेक पाटील यांच्या...
मराठवाड्याच्या विकासासाठी शासन कटीबध्द...औरंगाबाद : मराठवाड्याच्या सर्वांगिण विकासासाठी...
केंद्राच्या कांदा निर्यातबंदी विरोधात...नाशिक : केंद्र सरकारने कुणाचीही ओरड नसताना, अन्न...
औरंगाबादमधील नुकसानग्रस्त पिकांचे...औरंगाबाद : ‘‘जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान...
खानदेशातील पपई पिकाला अतिपावसाचा फटकाजळगाव : खानदेशात पपई पिकाला अतिपावसाचा फटका बसला...
नांदेडमध्ये ३८ हजार हेक्टर पिकांचे...नांदेड : अतिवृष्टी व पूरामुळे जिल्ह्यातील ३८१...
‘म्हैसाळ’मधून पावणेदोन टीएमसी पाणी उचललेसांगली  ः कृष्णा नदीला आलेल्या पूराचे पाणी...
कांदा निर्यातबंदीविरूध्द कॉंग्रेसचे...रत्नागिरी : कांदा निर्यातीबाबतचा निर्णय...
मुसळधार पावसामुळे पिके भुईसपाटपुणे ः राज्यातील अनेक भागांत कमीअधिक स्वरूपात...
पानपिंपरी पिकाला विम्याचे कवच द्याअकोला ः जिल्ह्यात पानपिंपरी या वनौषधीवर्गीय...
सीमाभाग आणि बंदरातील कांदा सोडा; अन्यथा...नाशिक : टाळेबंदी शिथिल झाल्यानंतर शेजारील...
कोल्हापुरात ‘गोकूळ’चे दूध रोखण्याचा...कोल्हापूर : मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्याच्या...
शरद पवार यांनी ऊसतोड कामगारांची कोंडी...नगर ः ऊसतोडणी कामगारांच्या तोडणी दरात वाढ करावी...
फळबाग लागवडीसाठी जमिनीची निवड महत्त्वाचीसामान्यपणे फळबागा अयशस्वी होण्यामध्ये किंवा...
बियाणासाठी घरचे सोयाबीन ठेवताना...बियाण्यासाठी निवड करण्यात आलेल्या प्लॉटमध्ये...
महिला बचत गटांच्या माध्यमातून हळद...सहकाराच्या धर्तीवर संघटित झालेल्या राजापूर...
पुणे जिल्ह्यात दोन लाखावर शेतकऱ्यांना...पुणे : जिल्हा बॅंकेकडून खरीप हंगामासाठी गेल्या...