स्ट्रॉबेरी संशोधन केंद्राचा दोन कोटींचा प्रकल्प

स्ट्रॉबेरी संशोधन केंद्राचा दोन कोटींचा प्रकल्प
स्ट्रॉबेरी संशोधन केंद्राचा दोन कोटींचा प्रकल्प

सातारा : महाबळेश्‍वर येथील स्ट्रॉबेरी संशोधन केंद्र सुरू करण्याच्या हालचाली गतिमान झाल्या असून, राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने साधारण दोन कोटी रुपयांचा प्रकल्प तयार केला आहे. हा प्रकल्प मंजुरीसाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठण्यात आला आहे. महाबळेश्‍वरमधील विद्यापीठाच्या गहू गेरवा संशोधन केंद्रातच हे स्ट्रॉबेरी संशोधन केंद्र सुरू होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनंतर स्ट्रॉबेरी संशोधन केंद्र सुरू करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. 

जिल्ह्यातील नगदी पिकांचे विविध वाण व जाती निर्माण करून त्यातून अधिक व निर्यातक्षम उत्पादन मिळविण्यासाठी यापूर्वी आले, बटाटा, कांदा आणि स्ट्रॉबेरी संशोधन केंद्रे व्हावीत, अशी मागणी होत होती. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर महाबळेश्‍वरच्या दौऱ्यावर आल्यावर त्यांनी येथील स्ट्रॉबेरीचे उत्पन्न आणि त्यासाठी असलेला वाव लक्षात घेऊन स्ट्रॉबेरी संशोधन केंद्र सुरू करण्याची सूचना केली होती. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला. त्यानंतर सूत्रे फिरली आणि कृषी विद्यापीठाने स्ट्रॉबेरी संशोधन केंद्राचा दोन कोटींचा प्रकल्प तयार करून मुख्यमंत्र्यांकडे पाठविला आहे. या प्रकल्प अहवालानुसार महाबळेश्‍वरातील गहू गेरवा संशोधन केंद्रात स्ट्रॉबेरी संशोधन केंद्रासाठीचे काम सुरू झाले. प्रस्तावाला लवकरच मंजुरी मिळून उर्वरित कामेही सुरू होतील. 

अशाप्रकारे असेल केंद्र...

  • अत्याधुनिक सुविधांची उपलब्धता
  • नवीन जातींची निर्मिती आणि रोपे ठेवण्यासाठीची वातानुकूलित सुविधा
  • असा होईल फायदा...

  • परदेशातून रोपे आयात करून लागवड करण्याची शेतकऱ्यांची कसरत आता थांबणार
  • नवीन जातींचा शोध लागणार, निर्यातक्षम स्ट्रॉबेरीचे उत्पादन घेणे सोपे होणार
  •   मातृ रोपांची चणचण थांबणार सातारा जिल्ह्यातील कमी पावसाच्या ठिकाणी मातृरोपे घेऊन रोपांची निर्मिती केली जाते. ही रोपे पुन्हा महाबळेश्‍वर, पाचगणी परिसरात लावली जातात; पण पाऊस जास्त असल्याने महाबळेश्‍वरात रोपे ठेवणे अडचणीचे होते. मात्र, संशोधन केंद्र सुरू झाल्यानंतर रोपे निर्मितीसाठी होणारा खर्च कमी होणार आहे. 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com