Farmers Agricultural News Marathi rabbi onion production may increase pune Maharashtra | Agrowon

रब्बी कांदा उत्पादन २५ लाख टनांनी वाढणार

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 7 एप्रिल 2020

पुणे : देशाच्या कांदा बाजारपेठांमध्ये यंदाच्या रब्बी हंगामात जवळपास २५ लाख टन जादा माल उपलब्ध राहण्याची शक्यता आहे. लॉकडाऊननंतर भाव टिकून राहण्याची निर्यात वाढविण्यासाठी सरकारला आतापासूनच नियोजन करावे लागेल, असे मत कांदा निर्यातदारांच्या गोटातून व्यक्त करण्यात आले आहे. 

पुणे : देशाच्या कांदा बाजारपेठांमध्ये यंदाच्या रब्बी हंगामात जवळपास २५ लाख टन जादा माल उपलब्ध राहण्याची शक्यता आहे. लॉकडाऊननंतर भाव टिकून राहण्याची निर्यात वाढविण्यासाठी सरकारला आतापासूनच नियोजन करावे लागेल, असे मत कांदा निर्यातदारांच्या गोटातून व्यक्त करण्यात आले आहे. 

देशात गेल्या रब्बी हंगामात शेतकऱ्यांना दोन लाख ६६ हजार हेक्टरवर कांद्याचा पेरा केला होता. यंदा हाच पेरा चार लाख ६१ हजार हेक्टरच्या पुढे गेल्याचा अंदाज आहे. बाजारात गेल्या हंगामात बाजारपेठांमध्ये असलेली कांद्याची अंदाजे  उपलब्धता ५३ लाख टन होती. यंदा क्षेत्र वाढले तरी उत्पादकता कमी राहील. अर्थात, तरीही  किमान ७८ लाख टनाच्या पुढे उत्पादन जाण्याची चिन्हे आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

गेल्या हंगामात कांद्याचे भाव प्रतिक्विंटल सात हजारापर्यंत गेले होते. चांगले भाव आणि पाण्याची झालेली उपलब्धता यातून शेतकऱ्यांनी यंदा क्षेत्र वाढविले आहे. 
‘‘राज्यातील कांदा बाजार व्यवस्था कोरोनामुळे पूर्णतः विस्कळीत झालेली आहे. लॉकडाऊन सुरू होण्यापूर्वी शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल १२०० ते १५०० रुपये दर मिळत होते.

आता बाजारातील लाल कांदा संपत आला असून रब्बीचा माल सुरू झाले आहे. त्याला भाव १००० ते १५०० रुपये मिळतो आहे. मागणीच्या प्रमाणात अजिबात पुरवठा नसल्यामुळे भाव थोडेफार टिकून आहेत. तथापि, बाजारपेठा सुरळीत होताच पहिल्याच टप्प्यात भाव किमान ५०० ते ८०० रुपयांनी कमी होवू शकतात,’’ असा इशारा मुंबईतील कांदा व्यापाऱ्यांनी दिला आहे. 

लासलगाव कांदा बाजारपेठेतील जाणकारांच्या मते, भारतीय कांद्याला कोलंबो, मलेशिया, आखाती देशांमध्ये मागणी राहील. मात्र, निर्यात स्थिर आणि चांगली होण्यासाठी सरकारला आतापासूनच नियोजन करावे लागेल. कांदा निर्यात बंदी हटविण्याची घोषणा यापूर्वी अन्न मंत्रालयाने केली होती.

परंतु, देशाच्या विदेश व्यापार संचालनालयाने अधिसूचना काढण्यास दोन आठवडे उशीर केला. यामुळे निर्यातदार आणि शेतकऱ्यांचेही नुकसान झाले. असा घोळ पुन्हा घातल्यास रब्बी हंगामात देखील बाजारभावाचे संकट उभे राहिले. सध्या निर्यात बंदी नसली तरी निर्यात प्रोत्साहन योजना तयार करण्यात आलेली नाही. यातून सरकारचा गाफीलपणा दिसतो आहे.
 
भावांतर आणि निर्यात अनुदानावर हवी तयारी 
एका प्रसिध्द कांदा निर्यातदार एजन्सीच्या संचालकाने सांगितले की, ‘‘गेल्या हंगामाच्या तुलनेत दुप्पट माल बाजारात येणार आहे. त्यामुळे भाव कमी होत गेल्यास भावांतर योजना राबविणे किंवा निर्यातीच्या माध्यमातून जास्तीत जास्त माल देशाबाहेर पाठविणे अशा दोन मुद्यांवर आतापासूनच नियोजन करावे लागेल. निर्यात प्रोत्साहन अनुदान दहा टक्के होते. त्याविषयी सध्या संभ्रमाची स्थिती आहे. भावांतर योजना सुरू कऱण्यासाठी प्रणाली तयार करण्यासाठी आवश्यक असलेल्या हालचाली देखील दिसत नाहीत. या दोन्ही मुद्द्यांवर आतापासूनच तयारी करावी लागेल. अन्यथा कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा अडचणी येवू शकतात.’’


इतर अॅग्रो विशेष
मराठवाड्यात काही ठिकाणी मुसळधारपुणे : राज्यातील बहुतांशी भागातील पावसाचे...
राज्यात हलक्या पावसाची शक्यतापुणे : काही दिवस राज्यात मुसळधार पाऊस...
एक हजार प्राध्यापकांनी वयाची साठी...पुणे: राज्यातील कृषी विद्यापीठांमधील...
सूक्ष्म अन्न उद्योगांना मिळणार आता दहा...पुणे: राज्यात लवकरच पंतप्रधान सूक्ष्म अन्न उद्योग...
कृषी, कामगार विधेयकांची राज्यात...पुणे : केंद्र सरकारने घाईघाईत मंजूर करुन घेतलेली...
शेतकरी आंदोलनाचे सात राज्यांत पडसादचंडीगड ः केंद्र सरकारच्या कृषी विधेयकांना विरोध...
सोयाबीन बियाणे प्लॉटना फटकाऔरंगाबाद: सध्याचे पावसाचे प्रमाण व त्यामुळे...
केळी विमा निकषांबाबत उत्सुकताजळगाव ः राज्य सरकारच्या चुकांमुळे हवामानावर...
अडीच हजार हेक्टर भातशेती सततच्या...सिंधुदुर्ग ः हळवी आणि भिजवणीची लागवड केलेली...
कृषी विधेयकांविरोधात राज्यात शेतकरी...पुणेः केंद्र सरकारने नुकतेच मंजूर केलेल्या कृषी...
सेंद्रिय व्यवस्थापनाच्या बळावर रोखली...सर्वाधिक संत्रा लागवडीखाली क्षेत्र असल्यामुळे ‘...
ऑनलाइन शिक्षणात बरेच ऑफलाइन! पाऊस आणि शाळा, महाविद्यालयं सुरू होण्याचा काळ...
आता शेतमाल खरेदीचे बोला!ऑगस्ट २०२० च्या पहिल्या आठवड्यात देशभरातील खरीप...
उद्योजकांच्या कर्जमाफीवर सर्वांचीच...भारतात शेती आणि शेतकरी याला खूप महत्त्व आहे....
खरीप धान्योत्पादन १४४ दशलक्ष टनांवर नवी दिल्ली ः कोरोना पुणे मुंबई बातमी ...
ऊसतोड कामगार मंडळाची रचना, धोरण लवकरचः...मुंबई : ऊसतोड कामगारांचे विविध प्रश्न व समस्यांवर...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात हलक्या...पुणे ः राज्यातील पावसाचा जोर कमी झाला आहे. पुढील...
‘पोकरा’मधून फळबाग, वनशेती, बांबू, तुती...औरंगाबाद: नानाजी देशमुख कृषी संजीवनी...
पावसाळ्यापूर्वीच कापूस खरेदीचे नियोजन अमरावती : गेल्या हंगामात पावसामुळे कापसाचे नुकसान...
सुधारित शेती, पूरक व्यवसायाचा ‘निवजे...निवजे (ता.कुडाळ,जि.सिंधुदुर्ग) गावकऱ्यांनी शेती...