नाशिक जिल्ह्यात रब्बीची एक लाख १५ हजार हेक्टरवर पेरणी

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नाशिक  : जिल्ह्यात रब्बी हंगामात एकूण १ लाख १३ हजार १९१ हेक्टर क्षेत्र निर्धारित करण्यात आले होते. मात्र, शनिवारपर्यंत (ता. १८) १ लाख १५ हजार ३०४ हेक्टर म्हणजेच १०१.८७ टक्के क्षेत्रावर पेरण्या पूर्ण झाल्या असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या सूत्रांनी दिली. 

अतिवृष्टीमुळे रब्बी हंगामातील पेरण्या उशिरा झाल्या. हंगाम दीड महिने लांबणीवर गेला आहे. जिल्ह्यात गव्हाची सर्वाधिक ६७ हजार ४४३ हेक्टरवर तर हरभऱ्याची ३५,९२८ हेक्टरवर पेरणी झाली आहे. यावर्षी पाऊस चांगला असल्यामुळे ज्वारीचा पेराही वाढला असून, जिल्ह्यात एकूण ४७२२ हेक्टरवर ज्वारीची पेरणी झाली आहे. जिल्ह्यात सर्वात जास्त गव्हाची पेरणी मालेगांव तालुक्यात झाली आहे. मका पिकाची लागवड अवर्षणग्रस्त सिन्नर तालुक्यात अधिक आहे.

तसेच, ज्वारीची पेरणीदेखील वाढली आहे. पेठसारख्या आदिवासी तालुक्यात यावर्षी आदिवासी शेतकऱ्यांनी ज्वारीचे पीक घेण्याचा प्रयोग केला असून, तालुक्यात ज्वारीचे क्षेत्र नसतानाही १० हेक्टरवर ज्वारीची पेरणी झाली आहे. हरभऱ्याचे सर्वसाधरण क्षेत्र ४१,१८४ हेक्टर असून ३५,९२८ हेक्टरवर हरभरा पेरणी झाली आहे. दिंडोरी, सिन्नर, येवला, मालेगाव या तालुक्यांमध्ये पेरणी क्षेत्र वाढले आहे. जिल्ह्यात डाळवर्गीय पिकांचे एकूण ४२,१५२ हेक्टर क्षेत्र असून,आतापर्यंत ३८,२०३ हेक्टरवर या पिकांची पेरणी झाली आहे.  तेलबिया पिकांचे क्षेत्र संपुष्टात जिल्ह्यात २७५ हेक्टर क्षेत्रावर तेलबियांची लागवड प्रस्तावित असते. मात्र, चालू वर्षी अवघ्या ५ हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली आहे. जवस, तीळ, सूर्यफूल या तेलबियांचा पेरा खूपच कमी झाला आहे.  

पेरणी स्थिती
पिके   सर्वसाधारण क्षेत्र  पेरणी क्षेत्र (हेक्टर)   टक्केवारी
ज्वारी   ५७५५ ४७२२ ८२
गहू ६१९६७ ६७४४३ १०९
मका   २५१६ ४९५१ १९६
हरभरा ४११८४ ३५९२८ ८७
इतर डाळवर्गीय पिके ९६८ २२७५ २३५

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com