बीज प्रमाणीकरणासाठी चार जिल्ह्यांतील ५ हजार हेक्टर क्षेत्राची नोंदणी

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

परभणी  ः यंदाच्या (२०१९-२०) रब्बी हंगामात विभागीय बीज प्रमाणीकरण अधिकारी कार्यालयांतर्गत परभणी, नांदेड, लातूर, उस्मानाबाद या चार जिल्ह्यांतील ३ हजार ८६ बीजोत्पादक शेतकऱ्यांनी ५ हजार १५६.९० हेक्टर क्षेत्राची बीज प्रमाणीकरणासाठी नोंदणी केली आहे.

महाबीज तसेच ग्रामबीजोत्पादन कार्यक्रमांतर्गत यंदाच्या रब्बी हंगामात ज्वारी, गहू, हरभरा, करडई, सूर्यफूल, जवस या पिकांचा पायाभूत तसेच प्रमाणित बियाण्यांचा बीजोत्पादन कार्यक्रम घेण्यात येत आहे. यंदा परभणी नांदेड, उस्मानाबाद या जिल्ह्यांतील ज्वारी, गहू, हरभरा, करडई या पिकांची बीज प्रमाणीकरणासाठी नोंदणी करण्यात आली आहे.

लातूर जिल्ह्यातील ज्वारी, गहू, हरभरा,सूर्यफूल, करडई, जवस या पिकांची बीज प्रमाणीकरणासाठी नोंदणी करण्यात आली आहे. बीज प्रमाणीकरणासाठी पायाभूत बीजोत्पादनांतर्गत २८१ शेतकऱ्यांनी ३५८.६० हेक्टर क्षेत्राची नोंदणी केली आहे. प्रमाणित बीजोत्पादन कार्यक्रमांतर्गत २ हजार ८६८ शेतकऱ्यांनी ४ हजार ७९८.३० हेक्टर क्षेत्राची नोंदणी केली आहे, असे विभागीय बीज प्रमाणीकरण अधिकारी डी. आर. कळसाईत यांनी सांगितले.    

जिल्हानिहाय बीज प्रमाणीकरणासाठी शेतकरी नोंदणी (क्षेत्र-हेक्टर)
जिल्हा   शेतकरी  क्षेत्र
परभणी १७१७  २८२१.१०
नांदेड  २७४  ५१९.४०
लातूर ६२९   ९३६.४०
उस्मानाबाद   ४६६ ८८९
बीज प्रमाणीकरणासाठी पीकनिहाय क्षेत्र (हेक्टर)
पीक   शेतकरी संख्या क्षेत्र
ज्वारी २४६ ४३५
गहू  २४२ ३८५.४०
हरभरा  २५२४ ४१२३.५०
करडई  ७०  २१०.२०
सूर्यफूल  १.८
जवस  १

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com