Farmers Agricultural News Marathi review meeting on crop loan distribution Vardha Maharashtra | Agrowon

बॅंकांनी पीककर्ज प्रकरणे तत्काळ मार्गी लावावीत : मंत्री सुनील केदार

टीम अॅग्रोवन
रविवार, 12 जुलै 2020

वर्धा  ः जिल्ह्यात पात्र शेतकऱ्यांपैकी एकही शेतकरी पीककर्ज मिळण्यापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेतानाच बँकांनी पीककर्ज प्रकरणे तत्काळ मार्गी लावावीत, असे निर्देश पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकासमंत्री सुनील केदार यांनी दिले. 

वर्धा  ः जिल्ह्यात पात्र शेतकऱ्यांपैकी एकही शेतकरी पीककर्ज मिळण्यापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेतानाच बँकांनी पीककर्ज प्रकरणे तत्काळ मार्गी लावावीत, असे निर्देश पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकासमंत्री सुनील केदार यांनी दिले. 

येथील जिल्हा परिषद सभागृहात मंत्री केदार यांनी नुकताच विविध विषयांचा आढावा घेतला. यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी विवेक भीमनवार, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ सचिन ओंबासे, उप वनसंरक्षक सुनील शर्मा, माजी आमदार अमर काळे उपस्थित होते. या बैठकीत पीककर्ज वितरण, कर्जमाफी, पीकविमा योजना, कापूस खरेदी, पाणी पुरवठा योजना, हेटिकुंडी जमीन प्रकरण, आर्वी देऊरवाडा रस्ता, सेवाग्राम विकास अशा विविध कामांचा आढावा घेण्यात आला.

शेतकऱ्यांना पेरणीचा खर्च भागविण्यासाठी पीक कर्जाची आवश्यकता असते. हे कर्ज वेळेत मिळाले तर शेतकऱ्यांसाठी ते उपयोगी ठरते. त्यामुळे प्रलंबित ३२०० पीक कर्ज प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जिल्हा उपनिबंधकांनी वारंवार बँकांना भेट देऊन पाठपुरावा करावा, अशा सूचना श्री. केदार यांनी दिल्या.

पीक कर्जासाठी अर्ज न येणाऱ्या बँक शाखांची यादी तयार करावी. अशा गावांमध्ये तलाठी, कृषी सहायक, ग्रामसेवकांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना येणाऱ्या अडचणी सोडवत पीक कर्जासाठी अर्ज करण्यास प्रोत्साहित करावे.  बँकांनी पीककर्ज वाटपाची अद्ययावत माहिती जिल्हाधिकाऱ्यांना रोज द्यावी, असेही श्री. केदार यांनी सांगितले. बँकेत येणाऱ्या ग्राहकांसाठी बैठक व्यवस्था, पिण्याचे पाणी, शौचालय, सॅनिटायझर याची व्यवस्था करण्याबाबत देखील त्यांनी सूचना दिल्या.
 
कृषी विभागाच्या कामकाजाबाबत नाराजी
मागील बैठकीवेळी सर्व बँका आणि ग्रामपंचायतींमध्ये पीक कर्जासाठी कोणती कागदपत्रे लागतात. याबाबत माहिती फलक लावण्याचे आदेश जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना दिले होते. मात्र कृषी विभागाने एकाही गावात असे फलक लावले नाहीत. तसेच कोणत्याही बँकेला पीक कर्ज वितरणाबाबत भेट दिली नाही, यामुळे श्री.केदार यांनी कृषी विभागाच्या कामकाजाबाबत नाराजी व्यक्त केली.


इतर ताज्या घडामोडी
रत्नागिरी जिल्ह्यातील नद्यांना पूर,...रत्नागिरी : सलग दुसऱ्या दिवशीही पावसाने...
पंढरपुरात ७ ते १३ ऑगस्ट दरम्यान...सोलापूर  : कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी...
फळपीक विमा निकषात बदलाची गरज :...अमरावती : जिल्ह्यामध्ये संत्रा फळपीक मोठ्या...
सातारा जिल्ह्यात दमदार पाऊस सातारा : जिल्ह्यात मंगळवारी दमदार पाऊस झाल्याने...
कोयना धरण परिसरात मुसळधार पाऊस सातारा : कोयना धरण क्षेत्रात मंगळवारी मुसळधार...
कोल्हापूर बाजार समितीवर अखेर प्रशासक कोल्हापूर : नोकर भरती वरून वादग्रस्त ठरलेल्या...
मराठवाड्यात खरीप ज्वारीची ३७ टक्के पेरणीऔरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात...
शाश्वत शेती उत्पादनासाठी मातीतील जिवाणू...स्थानिक झाडे झुडुपांच्या मुळाच्या परिसरातील...
भुसावळमध्ये १५ हजार हेक्टरवर कपाशीभुसावळ, जि.जळगाव  : गतवर्षी अतिवृष्टीमुळे...
पुणे जिल्ह्यात जोरदार श्रावण सरी पुणे ः दोन ते तीन दिवसांपासून पुणे जिल्ह्याच्या...
नांदेड जिल्ह्यात दोन लाख शेतकरी...नांदेड : जिल्ह्यातील बॅंका जुन्या कर्जदार...
खानदेशात खतांची मागणी घटली जळगाव : खानदेशात मागील आठवड्यात खत टंचाईची तक्रार...
सोयाबीनवरील किडीप्रश्‍नी योग्य वेळी...परभणी : ‘‘सोयाबीन हे कपाशी एवढेच राज्यातील...
नियमांचे पालन करुन गणेशोत्सव साजरा करा...नाशिक : ‘‘आगामी काळातील गणेशोत्सव साजरा करताना...
कोल्हापुरात दमदार पावसामुळे नद्यांनी...कोल्हापूर ः जिल्ह्यात बुधवारी (ता. ५) पावसाचा जोर...
सोलापूर जिल्ह्यात पीककर्जातून ९८४...सोलापूर  ः जिल्ह्यासाठी यंदाच्या खरीप...
येऊलखेड शिवारात शेकडो एकरांतील पीक...बुलडाणा ः जिल्ह्यात शेगाव तालुक्यात सोयाबीनचे पीक...
युरियाच्या मुद्यावरून अकोला जिल्हा...अकोला ः जिल्ह्यात युरियाची ग्रामीण भागात तीव्र...
उसामध्ये पोक्का बोईंग, शेंडाकूज रोगाचा...सध्या पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा विभागात...
नाशिकमध्ये वांगी प्रतिक्विंटल १००० ते...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...