Farmers Agricultural News Marathi review meeting for kharip season Nagpur Maharashtra | Agrowon

पीक उत्पादनाबाबत गावनिहाय कृती आराखडा सादर करा : पालकमंत्री नितीन राऊक

टीम अॅग्रोवन
शनिवार, 25 एप्रिल 2020

नागपूर  ः कापूस, सोयाबीन या पिकांसोबतच नियमित पिकांच्या उत्पादनाबाबत गावनिहाय कृती आराखडा सादर करण्याचे निर्देश पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी कृषी विभागाला दिले.

नागपूर  ः कापूस, सोयाबीन या पिकांसोबतच नियमित पिकांच्या उत्पादनाबाबत गावनिहाय कृती आराखडा सादर करण्याचे निर्देश पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी कृषी विभागाला दिले.

येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बचत भवन परिसरात नुकत्याच झालेल्या खरीप हंगामपूर्व आढवा बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले. यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख, पशुसंवर्धन व क्रीडामंत्री सुनील केदार, जिल्हा परिषद अध्यक्षा रश्‍मी बर्वे, खासदार कृपाल तुमाने, आमदार ॲड. आशिष जयस्वाल, समीर मेघे, टेकचंद सावरकर, राजू पारवे, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, मुख्य कार्यकारी अधिकरी योगेश कुंभोजकर, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी मिलींद शेंडे उपस्थित होते.

डॉ. राऊत म्हणाले, की मुंबईला रेल्वेच्या माध्यमातून फळे व भाजीपाला पाठविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्याचा लाभ नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना व्हावा याकरिता प्रयत्न झाले पाहिजे. भिवापूर मिरची ही या भागाची विशेष ओळख आहे. या मिरचीला भौगोलिक मानांकन देखील मिळाले आहे. या मिरचीचे लागवड क्षेत्र वाढवत या तिला पुन्हा गतवैभव प्राप्त करुन देण्यासाठी कृषी विभागाने पुढाकार घेतला पाहिजे. जिल्ह्यात ३१ मार्चपर्यंत १८९९ ग्राहकांना वीज जोडणी देण्यात आली. २०१९-२० मध्ये ११२२ शेतकऱ्यांनी वीज जोडणीसाठी अर्ज केले तर १२१३ शेतकऱ्यांनी अनामत रक्‍कमेचा भरणा केला, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
 
११९० कोटींचे पीक कर्जवाटपाचे उद्दिष्ट
खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना पीककर्ज उपलब्ध करुन देण्यात येत आहे. त्याकरिता ११९० कोटी रुपये वितरित करण्याचे उद्दिष्ट असल्याची माहिती या बैठकीत सहकार विभागाकडून देण्यात आली.

 


इतर ताज्या घडामोडी
सोलापूर जिल्ह्यात दमदार पाऊस सोलापूर : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून...
नगर जिह्यात पावसाने पिकांचे अतोनात...नगर  : जिल्ह्याच्या बहुतांश भागात...
सोनी गावामध्ये आहेत २८८ शेततळीसोनी (ता. मिरज,जि.सांगली) या गावात  कृषी...
कर्नाळा बँकेत ३६ ग्रामपंचायतींचे पैसे...मुंबई : ‘शेकाप’चे माजी आमदार विवेक पाटील यांच्या...
मराठवाड्याच्या विकासासाठी शासन कटीबध्द...औरंगाबाद : मराठवाड्याच्या सर्वांगिण विकासासाठी...
केंद्राच्या कांदा निर्यातबंदी विरोधात...नाशिक : केंद्र सरकारने कुणाचीही ओरड नसताना, अन्न...
औरंगाबादमधील नुकसानग्रस्त पिकांचे...औरंगाबाद : ‘‘जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान...
खानदेशातील पपई पिकाला अतिपावसाचा फटकाजळगाव : खानदेशात पपई पिकाला अतिपावसाचा फटका बसला...
नांदेडमध्ये ३८ हजार हेक्टर पिकांचे...नांदेड : अतिवृष्टी व पूरामुळे जिल्ह्यातील ३८१...
‘म्हैसाळ’मधून पावणेदोन टीएमसी पाणी उचललेसांगली  ः कृष्णा नदीला आलेल्या पूराचे पाणी...
कांदा निर्यातबंदीविरूध्द कॉंग्रेसचे...रत्नागिरी : कांदा निर्यातीबाबतचा निर्णय...
मुसळधार पावसामुळे पिके भुईसपाटपुणे ः राज्यातील अनेक भागांत कमीअधिक स्वरूपात...
पानपिंपरी पिकाला विम्याचे कवच द्याअकोला ः जिल्ह्यात पानपिंपरी या वनौषधीवर्गीय...
सीमाभाग आणि बंदरातील कांदा सोडा; अन्यथा...नाशिक : टाळेबंदी शिथिल झाल्यानंतर शेजारील...
कोल्हापुरात ‘गोकूळ’चे दूध रोखण्याचा...कोल्हापूर : मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्याच्या...
शरद पवार यांनी ऊसतोड कामगारांची कोंडी...नगर ः ऊसतोडणी कामगारांच्या तोडणी दरात वाढ करावी...
फळबाग लागवडीसाठी जमिनीची निवड महत्त्वाचीसामान्यपणे फळबागा अयशस्वी होण्यामध्ये किंवा...
बियाणासाठी घरचे सोयाबीन ठेवताना...बियाण्यासाठी निवड करण्यात आलेल्या प्लॉटमध्ये...
महिला बचत गटांच्या माध्यमातून हळद...सहकाराच्या धर्तीवर संघटित झालेल्या राजापूर...
पुणे जिल्ह्यात दोन लाखावर शेतकऱ्यांना...पुणे : जिल्हा बॅंकेकडून खरीप हंगामासाठी गेल्या...