नकारात्मक विचार सोडून देत लोकांचा आत्मविश्वास वाढवू या : शरद पवार
नकारात्मक विचार सोडून देत लोकांचा आत्मविश्वास वाढवू या : शरद पवार

नकारात्मक विचार सोडून देत लोकांचा आत्मविश्वास वाढवू या : शरद पवार

मुंबई : आज आपल्यावर ‘कोरोना’चे संकट आले आहे. या संकटासंबंधी नकारात्मक विचार सोडून देऊ या. आपण त्याचा सामना करणार आहोत त्यात यशस्वी होणार आहोत ही स्थिती निर्माण करुया. लोकांचा आत्मविश्वास वाढवूया. हा आत्मविश्वास वाढवण्यासाठी जे प्रयत्न करणार आहोत ते कसे समाजासमोर येतील त्याची काळजी घेऊया. भीती निर्माण करणाऱ्या बातम्या नकोत तर दिलासा आणि आत्मविश्वास वाढवणाऱ्या बातम्या हव्यात. यातून काही उपयुक्त घडेल, अशी विनंती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी प्रसिध्दी माध्यमांना केली.

मुंबई : आज आपल्यावर ‘कोरोना’चे संकट आले आहे. या संकटासंबंधी नकारात्मक विचार सोडून देऊ या. आपण त्याचा सामना करणार आहोत त्यात यशस्वी होणार आहोत ही स्थिती निर्माण करुया. लोकांचा आत्मविश्वास वाढवूया. हा आत्मविश्वास वाढवण्यासाठी जे प्रयत्न करणार आहोत ते कसे समाजासमोर येतील त्याची काळजी घेऊया. भीती निर्माण करणाऱ्या बातम्या नकोत तर दिलासा आणि आत्मविश्वास वाढवणाऱ्या बातम्या हव्यात. यातून काही उपयुक्त घडेल, अशी विनंती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी प्रसिध्दी माध्यमांना केली.

मंगळवारी श्री. पवार यांनी सोशल माध्यमातून देश व राज्यातील जनतेशी संवाद साधला. ते म्हणाले, की काही नसताना राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडल्याचे भासवले जात आहे. पालघरला जो प्रकार घडला त्याची सखोल चौकशी करण्यात येत आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यासाठी एका अधिकाऱ्याची नेमणूक करून चौकशीचे आदेश दिले आहेत. प्रथमदर्शनी १०० पेक्षा जास्त लोकांना अटक करून तुरुंगात टाकले आहे. हा प्रकार घडल्यानंतर काही तासातच राज्य सरकार व पोलिसांनी खबरदारी घेतली. जे घडलं ते चांगलं नाही. असा प्रकार गैरसमजातून घडल्यानंतर लगेचच ‘राज्याची कायदा व सुव्यवस्था ढासळली आहे, मंत्र्यांनी राजीनामे द्यावेत’, अशी मागणी होते हे योग्य नाही. ही वेळ नाही. आज जे ‘कोरोना’चे संकट त्यावर मात करण्यासाठी एकजुटीने, एका विचाराने तोंड देण्याची गरज आहे.

जगात ‘कोरोना’ने थैमान घातले आहे. अमेरिकेसारख्या संशोधन, आरोग्यविषयक उत्तम सुविधा असलेल्या, चांगली घरे आणि दोन घरात अंतर असलेल्या देशात परिस्थिती बिकट आहे. कालपर्यंत अमेरिकेत मृत्यूमुखी पडलेल्या लोकांची संख्या ४० हजार ६८३ इतकी आहे. इटलीत २३ हजार ६००, स्पेनमध्ये २० हजार ८५२, फ्रान्समध्ये १९ हजार ७१८ लोक मृत्यूमुखी पडले आहे. या देशांचे क्षेत्रफळ महाराष्ट्राच्या जवळपास आहे. मात्र महाराष्ट्रातील मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या ही चिंताजनक आहे. महाराष्ट्राचा मृत्यूदर २२३ असून देशाच्या तुलनेत जास्त आहे. इटलीत २३ हजार ६०० तर त्याच्यापेक्षा मोठ्या महाराष्ट्रात २२३ मृत्यूदर आहे. या देशांशी तुलना नाही हा आकडा धक्कादायक आहे असेही श्री. पवार म्हणाले.

आज पोलीस दल, डॉक्टर्स, नर्सेस व त्यांचे सहकारी, शासकीय यंत्रणेतील लोकं जिवाची पर्वा न करता आपल्यासाठी काम करत आहेत. देशाची, राज्याची स्थिती सावरायची आहे. या सर्वांविषयी आत्मीयता दाखवली पाहिजे. त्यां‍चा आत्मविश्वास वाढवला पाहिजे. त्यांच्या कुटुंबीयांची काळजी न वाढेल याची खबरदारी आपण घेतली पाहिजे. या सर्व कामात या वर्गाबाबत आपल्याला सकारात्मक दृष्टिकोन घेतला पाहिजे, असे आवाहनही श्री. पवार यांनी केले.

लातूरचा भूकंप, मुंबईची दंगल, बॉम्बस्फोट असो. या सगळ्या कालखंडात प्रशासन यंत्रणेने परिस्थिती निवळण्यासाठी अक्षरशः काही ताससुध्दा लावले नाहीत. हे कर्तृत्व महाराष्ट्रातील प्रशासकीय यंत्रणा व पोलिसांनी यापूर्वी दाखवले हा इतिहास आहे. त्यामुळे या सगळ्यांच्या पाठीशी उभे राहूयात, असे आवाहनही श्री. पवार यांनी जनतेला केले.   ‘नियमांची कठोर अंमलबजावणी व्हावी’ महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, ठाणे, कल्याण-डोंबिवली या शहरात ‘कोरोना’ बाधितांची संख्या लक्षात घेतली तर हे थांबवण्यासाठी नियमांची कठोर अंमलबजावणी केली पाहिजे. ‘परिस्थितीवर मात करणार व मृत्यूचा दर शून्यावर आणणारच’ हे ठरवलं पाहिजे. देशात महाराष्ट्राची स्थिती चिंताजनक आहे. या सगळ्याला संसर्ग महत्त्वाचे कारण आहे. दोन व्यक्तींमध्ये अंतर ठेवण्याची सूचना पाळली जात नाही. परिणामी जिथे कोरोना नाही तिथेही तो दिसत आहे. त्यामुळे घराबाहेर पडू नका. या सगळ्या गोष्टींचा परिणाम अर्थव्यवस्थेवर होत आहे. यातून बाहेर पडायचा विचार करायला हवा असेही श्री. पवार यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com