सातारा जिल्ह्यात साडेतीन हजार कृषिपंपांची वीजजोडणीची कामे पूर्ण

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

सातारा  : महावितरणच्या बारामती परिमंडलात उच्चदाब वितरण प्रणालीद्वारे (एचव्हीडीएस) कृषिपंपांना नवीन वीजजोडणी देण्याचे काम सुरू आहे. सातारा जिल्ह्यात आतापर्यंत ४१३२ कृषिपंपांना नवीन वीजजोडणी देण्यासाठी यंत्रणेची उभारणी पूर्ण झाली आहे. त्यापैकी ३५०२ कृषिपंपांची वीजजोडणीची कामे पुर्ण झाली आहेत.

एचव्हीडीएसद्वारे सोलापूर व सातारा जिल्हा, तसेच बारामती मंडलमध्ये स्वतंत्र रोहित्रांसह नवीन वीजयंत्रणा उभारून सद्यःस्थितीत १२,३७२ कृषिपंपांना नवीन वीजजोडणी देण्याचे काम पूर्ण झाले आहे. यापैकी सातारा जिल्ह्यात ३५०२, सोलापूर जिल्ह्यात ३९०९ आणि बारामती मंडलमधील ३२०८ अशा एकूण १०,६१९ कृषिपंपांची नवीन वीजजोडणीची कामे पुर्ण करण्यात आली आहे. जिल्ह्यात सातारा, वडूज, वाई, फलटण, कऱ्हाड या विभागांतर्गत मार्च २०१८ अखेर पैसे भरून प्रलंबित असणाऱ्या ८६०० कृषिपंपांना एचव्हीडीएसद्वारे नवीन वीजजोडणी देण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत ४१३२ रोहित्रांसह वीजयंत्रणा उभारण्याचे काम पूर्ण झाले आहे, तर ३५०२ कृषिपंपांची वीजजोडणीची कामे पुर्ण झाली आहेत. 

समस्यांवर मात करण्यासाठी एचव्हीडीएस प्रणालीचा वापर प्रचलित पद्धतीनुसार कृषी पंपांना ६३ केव्हीए/१०० केव्हीए क्षमतेच्या वितरण रोहित्राद्वारे लघुदाब वाहिनीद्वारे वीजपुरवठा करण्यात येतो. एका रोहित्रावरुन जवळपास १५ ते २० कृषी पंपांना वीजपुरवठा केला जातो. लघुदाब वाहिनीची लांबी अधिक असल्याने वीजचोरी होणे, कमी दाबाने वीजपुरवठा होणे, रोहित्र अतिभारित होऊन नादुरुस्त होणे, तांत्रिक हानी वाढणे, रोहित्र वारंवार बिघडणे व वीजपुरवठा खंडित होणे आदी समस्यांवर ‘एचव्हीडीएस’प्रणालीद्वारे मात करणे शक्‍य होणार आहे. त्यामुळे कृषी पंपांना सुरळीत व शाश्वत वीजपुरवठा करण्यासाठी नवीन वीजजोडण्या एचव्हीडीएस प्रणालीद्वारे देण्यात येणार आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com