बाहेरून येणारे दुधाचे टँकर अडवण्याचे आदेश द्या ः राजू शेट्टी

कोल्हापूर : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर संचार बंदीमुळे दुधाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या राज्याच्या सीमा पोलिसांनी बंद केल्या आहेत. गुजरात, मध्यप्रदेश, कर्नाटक या राज्यांमधून येणारे दुधाचे टँकर अडवण्याचे आदेश पोलिसांना द्यावेत, यामुळे राज्य सरकारवरील अतिरिक्त दुध खरेदीसाठीचा आर्थिक बोजा कमी होईल, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख, माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे.
माजी खासदार राजू शेट्टी

‘कोरोना’मुळे दुधाचे मार्केट बंद झाल्याने दुध विक्रीवर गंभीर परिणाम झाला आहे. लाखो लिटर दूध शिल्लक राहत आहे. हे पाहून शासनाने दररोज दहा लाख लिटर दूध खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. शेतीमालाला राज्याची सीमा असू नये, ही ‘स्वाभिमानी’ ची नेहमीच भूमिका राहिली आहे. पण सध्याचा काळ हा खूपच वेगळा आहे. ‘कोरोना’मुळे सर्व देश लॉकडाऊन झाला आहे. अशा परिस्थितीत एका बाजूला ग्राहकांना दूध मिळत नाही तर दुसऱ्या बाजूला उत्पादकांचे दूध खपत नाही अशी स्थिती आहे. अशा परिस्थितीत ही बाहेरून दूध येत आहे. राज्य सरकार स्वतः खर्च करून दूध खरेदी करणार आहे. यापेक्षा बाहेरील येणारे दूध बंद करावे अशी आमची मागणी असल्याचे श्री. शेट्टी यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com