Farmers Agricultural News Marathi sugarcane cutting workers return to home Pune Maharashtra | Agrowon

पुणे जिल्ह्यातील ऊसतोडणी कामगार निघाले गावाकडे

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 21 एप्रिल 2020

पुणे  : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन सुरु असून सरकारने जिल्हा बंदी केल्याने ऊस तोडणी कामगारांना आपल्या गावाकडे जाता येत नव्हते. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील साखर कारखाना स्थळांवर सुमारे ४० ते ५० हजार ऊसतोडणी कामगार अडकून पडले होते. मात्र, दोन ते तीन दिवसांपूर्वी शासनाने त्यांना गावी जाण्यास मुभा देण्याचा निर्णय घेतल्याने ऊस तोडणी कामगार आता गावाकडे निघाले आहेत.

पुणे  : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन सुरु असून सरकारने जिल्हा बंदी केल्याने ऊस तोडणी कामगारांना आपल्या गावाकडे जाता येत नव्हते. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील साखर कारखाना स्थळांवर सुमारे ४० ते ५० हजार ऊसतोडणी कामगार अडकून पडले होते. मात्र, दोन ते तीन दिवसांपूर्वी शासनाने त्यांना गावी जाण्यास मुभा देण्याचा निर्णय घेतल्याने ऊस तोडणी कामगार आता गावाकडे निघाले आहेत.

जिल्ह्यात चालू वर्षी गळीत हंगामात १८ साखर कारखान्यांपैकी सुमारे १६ कारखान्यांनी गाळप सुरू केले होते. सध्या जिल्ह्यातील कारखान्यांचे गाळप टप्याटप्याने बंद होत आहे. त्यामुळे ऊस तोडणी कामगार घरी जाण्याची तयारी करत आहे. दरवर्षी ऊस तोडणीसाठी हंगाम सुरू होण्यापूर्वीच कामगारांचे करार होतात. यावर्षी जिल्ह्यात लहान मोठे असे एक लाखांहून अधिक ऊसतोडणी कामगार विविध कारखान्यांच्या कार्यस्थळावर आले होते. यावर्षी ऊस गळीत हंगाम लांबला नाही. मात्र, थोडाफार शिल्लक असलेल्या उसाच्या तोडणीचे काम करून कामगार कारखाना कार्यस्थळावरच थांबले होते.

गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर ऊसतोडणी कामगारांना गावाकडची ओढ लागली आहे. परंतु, एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाता येत नव्हते. त्यामुळे हंगाम संपत आला तरी ४० ते ५० हजार ऊस तोडणी कामगारांना त्यांच्या गावाकडे जाणे अवघड झाले होते. त्यातच जिल्हा प्रशासनाने ऊस तोडणी कामगारांची सर्व व्यवस्था संबंधित कारखान्याने करावी, अशी सूचना केली होती. त्यामुळे हे कामगार कारखाना कार्यस्थळावरच थांबून होते. कामगारांच्या परिस्थितीचा विचार करून शासनाने आदेश काढला असून वैद्यकीय तपासणी करून कामगारांना त्यांच्या मूळगावी जाण्याची परवानगी देण्यात आली आहे.


इतर ताज्या घडामोडी
काही भागात पावसाच्या उघडिपीची शक्यता महाराष्ट्रावर बुधवार (ता.२३) पर्यंत  १००४...
राज्य द्राक्ष बागायतदार संघाची ...नाशिक: महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार...
पांगरी परिसरात पिकांवर आस्मानी संकटपांगरी, जि. सोलापूर ः पांगरी (ता. बार्शी) परिसरात...
शेतमाल स्थानिक भागात विकला जाणार : भुजबळनाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यात आदिवासी समाज...
परभणी, हिंगोली जिल्ह्यात पावसाचे थैमाननांदेड : मराठवाड्यातील परभणी, हिंगोली जिल्ह्यात...
नाशिक विभागात कांदा लागवडीत ८ हजार...नाशिक : चालू वर्षी खरीप कांद्याच्या लागवडीपूर्वी...
रावेर तालुक्यात सीएमव्ही नुकसानीचे...जळगाव ः कुकुंबर मोसॅक विषाणूमुळे (सीएमव्ही)...
हिंगोली जिल्ह्यात सोयाबीनच्या पिकाला...हिंगोली : जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांपासून...
मराठवाड्यात अतिपाऊस खरीप पिकांच्या...औरंगाबाद : मराठवाड्यात गत काही दिवसांपासून...
धुळ्यात लाळ्या खुरकूत रोग प्रतिबंधक...धुळे : धुळे जिल्ह्यात ३० सप्टेंबरपर्यंत...
पावसाचा डाळींब पिकाला तडाखाआटपाडी, जि. सांगली ः अवर्षण प्रवण असलेल्या आटपाडी...
मायक्रो फायनान्सचे चक्रव्यूह...मुंबई : ग्रामीण भागातील सूक्ष्म वित्त पुरवठा...
नगर जिल्ह्यात अतिवृष्टीचा चार हजार...नगर ः यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीपासून चांगला...
कोकण कृषी विद्यापीठात बांबू कार्यशाळेचे...दापोली, जि. रत्नागिरी : जगभरात दरवर्षी १८...
अकोला जिल्ह्यातील सहा खत विक्रेत्यांचे...अकोला ः या हंगामात खत विक्रीत मोठ्या प्रमाणात...
सदोष बियाणेमुळे भेंडी बीजोत्पादक अडचणीतबुलडाणा ः लोणार तालुक्यातील शेतकऱ्यांनी या...
भातपीक कापणीत पावसाचा अडसररत्नागिरी : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने...
ठाण्यातील १४ हजार हेक्टर पिकांचा काढला...मुंबई : ठाणे जिल्हा कृषी विभागाने यंदा पंतप्रधान...
औरंगाबादमध्ये कांदा ३०० ते २३०० रूपयेऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
आरोग्यदायी विड्याचे पानकोणत्याही धार्मिक कार्यात, पूजेच्या ठिकाणी...