Farmers Agricultural News Marathi sugarcane cutting workers waiting for interstate permission kolhapur Maharashtra | Agrowon

चार हजार ऊस तोडणी कामगारांना प्रतीक्षा आंतरराज्य परवान्याची

टीम अॅग्रोवन
सोमवार, 27 एप्रिल 2020

इचलकरंजी, जि. कोल्हापूर   : ऊस तोडणीसाठी आलेल्या कामगारांना आंतरराज्य प्रवास करण्यास अडथळे येत असल्याने जिल्ह्यातील सुमारे चार हजारपेक्षा अधिक कुटुंबे अद्याप कारखाना कार्यस्थळांवर थांबून आहेत. महाराष्ट्रातील कामगार त्यांच्या जिल्ह्यात परत गेले असली तरी शेजारच्या कर्नाटक, मध्यप्रदेश आणि आसाम या ठिकाणाहून आलेले अनेक कामगार त्यांच्या राज्यांच्या परवानगीच्या प्रतीक्षेत आहेत. बहुराज्य पाच कारखान्यांचे अनेक ऊसतोडणी कामगार कर्नाटकातून महाराष्ट्रात येण्यास परवानगीच्या प्रतीक्षेत आहेत.

इचलकरंजी, जि. कोल्हापूर   : ऊस तोडणीसाठी आलेल्या कामगारांना आंतरराज्य प्रवास करण्यास अडथळे येत असल्याने जिल्ह्यातील सुमारे चार हजारपेक्षा अधिक कुटुंबे अद्याप कारखाना कार्यस्थळांवर थांबून आहेत. महाराष्ट्रातील कामगार त्यांच्या जिल्ह्यात परत गेले असली तरी शेजारच्या कर्नाटक, मध्यप्रदेश आणि आसाम या ठिकाणाहून आलेले अनेक कामगार त्यांच्या राज्यांच्या परवानगीच्या प्रतीक्षेत आहेत. बहुराज्य पाच कारखान्यांचे अनेक ऊसतोडणी कामगार कर्नाटकातून महाराष्ट्रात येण्यास परवानगीच्या प्रतीक्षेत आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यातील पाच साखर कारखाने बहुराज्य परवानाधारक आहेत. या कारखान्यांचे कार्यक्षेत्र महाराष्ट्र आणि कर्नाटक आहे. या कारखान्यांमध्ये गुरुदत्त शिरोळ, पंचगंगा इचलकरंजी, जवाहर हुपरी, शाहू कागल आणि दत्त शिरोळ या कारखान्यांचा समावेश आहे. या कारखाना कार्यक्षेत्रातील अनेक कामगार महाराष्ट्रातून कर्नाटकात आणि कर्नाटकातून महाराष्ट्रात आले आहेत. त्याचबरोबर ऊस तोडणीच्या अनेक टोळ्या यावर्षी मध्य प्रदेश आणि आसाम येथूनही आल्या आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यातील प्रशासनाने शासनाच्या परवानगीनुसार जिल्ह्यातील सर्व ऊस तोडणी कामगारांना महाराष्ट्रातील त्यांच्या जिल्ह्यांमध्ये पाठवले आहे. मात्र परराज्यातील असलेले अनेक कामगार त्यांच्या राज्याच्या परवानगीच्या प्रतीक्षेत आहेत. सध्या अनेक कारखान्यांनी या ऊसतोडणी कामगारांच्या कुटुंबांना कारखाना कार्यस्थळावर आधार दिला आहे. त्यांची सर्व व्यवस्था केली असली तरी या सर्व कुटुंबांना गावाकडे जाण्याची मोठी ओढ लागली आहे. तसेच त्यांना शेतीकामांचीही धाकधूक लागली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील परराज्यातील कामगारांच्या संख्येपैकी विशेषतः कर्नाटकातील कामगारांची संख्या मोठी आहे. त्याचबरोबर सीमाभागातील कर्नाटकातील अनेक गावांत महाराष्ट्रातील ही कामगार अडकून पडले आहेत. कर्नाटक शासन कोल्हापूर जिल्ह्यात असलेल्या ऊसतोडणी कामगारांना आपल्या गावांमध्ये येण्यासाठी अद्यापही परवानगी देत नाही. त्यामुळे या कामगारांची चिंता अधिकच वाढली आहे.
 


इतर ताज्या घडामोडी
दहा हजाराची लाच स्वीकारणारा हुलजंतीचा...सोलापूर ः खरेदी केलेल्या जमीन दस्तावर दाखल...
`जतमध्ये मूग, उडीद खरेदी केंद्र सुरू...सांगली :जिल्ह्यात मूग व उडीद हमीभावाने खरेदी...
सांगलीत २८ टक्क्यांवरच ऊस लागवडसांगली :  जिल्ह्यात गेल्या आठवड्यापूर्वी...
खानदेशातील बाजारात उडदाच्या आवकेत घटजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...
नाशिकमध्ये खासदारांच्या घरासमोर  'राख...नाशिक : केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने...
नगर जिल्ह्यात कांदा बियाणे गरज,...नगर ः जिल्ह्यात दरवर्षी सुमारे एक लाख...
अकोटमध्ये अतिवृष्टीने कपाशी पाण्याखालीअकोला ः आजवर झालेल्या सततच्या पावसाने अकोट...
बुलडाण्यातील नुकसानीचे पंचनामे करून...बुलडाणा : पावसामुळे नुकसान झालेल्या क्षेत्राचे...
सातगाव पठारावर नुकसानग्रस्त बटाट्याचे...पुणे :‘‘लांबलेला मॉन्सून, सततचा कोसळणारा वादळी...
गाव पातळीवरील बैठका, सभा तात्पुरती...अकोला ः कोवीड १९ च्या वाढत्या प्रभावामुळे गाव...
नोकर भरतीची वयोमर्यादा वाढवाः...चंद्रपूर : कोरोना संकटामुळे या वर्षात नोकरीकरता...
लातूर, उस्मानाबादेत एक लाख ४१ हजार...उस्मानाबाद / लातूर : लातूर व उस्मानाबाद...
औरंगाबाद, जालन्यात पावसाचा जोर कायमऔरंगाबाद : बीड, लातूर, उस्मानाबाद, परभणी, नांदेड...
मजुरांना कष्टाचे तरी पैसे मिळावेत नगर ः राज्यातील साखर कारखान्यांची तब्बल ८० हजार...
पोषक चाऱ्यासाठी ओट लागवडजनावरांच्या हिरव्या चाऱ्यासाठी अधिक पोषणमूल्य...
राज्यात सोयाबीन २५०० ते ३९७४ रुपये नगरमध्ये ३००० ते ३७०० रुपये  नगर येथील...
कोरडवाहू क्षेत्रातील रब्बी पीक नियोजनकोरडवाहू  भागातील जमिनीतील ओलावा हा...
हरभऱ्याच्या अधिक उत्पादनासाठी फुले...महात्मा फुले कृषि विदयापिठाने कंबाईन हार्वेस्टरने...
मानवी आहारासाठी पोषणयुक्त जैवसंपृक्त वाणजैवसंपृक्त पिकांची लागवड केल्यास पौष्टिक व...
सामूहिकपणे शंखी गोगलगायींचे नियंत्रण...शंखी गोगलगायी जून ते सप्टेंबर या कालावधीत जास्त...