Farmers Agricultural News Marathi sugarcane plantation status Parbhani Maharashtra | Agrowon

परभणीत २० हजार ६५१ हेक्टरवर ऊस लागवड

टीम अॅग्रोवन
शनिवार, 15 फेब्रुवारी 2020

परभणी  ः यंदा (२०१९-२०) परभणी जिल्ह्यात जानेवारी अखेरपर्यंत २० हजार ६५१ हेक्टरवर ऊस लागवड झाली आहे. लागवड सुरू असल्यामुळे ऊस लागवडीखालील क्षेत्र अंतरिम आहे, असे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

परभणी  ः यंदा (२०१९-२०) परभणी जिल्ह्यात जानेवारी अखेरपर्यंत २० हजार ६५१ हेक्टरवर ऊस लागवड झाली आहे. लागवड सुरू असल्यामुळे ऊस लागवडीखालील क्षेत्र अंतरिम आहे, असे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

ऑक्टोबर महिन्यात झालेल्या पावसामुळे विहिरी, बोअर आदी सिंचन स्रोतांमधील पाणीपातळी गेल्या काही वर्षांच्या तुलनेत वाढलेली आहे. जायकवाडी, माजलगाव, येलदरी-सिद्धेश्वर या मोठ्या प्रकल्पांसह मासोळी, करपरा हे मध्यम प्रकल्प, गोदावरील नदीवरील ढालेगाव, मुद्दगल, डिग्रस आदी बंधाऱ्यामध्ये पुरेशा प्रमाणात उपयुक्त पाणीसाठा आहे. सिंचनासाठी मुबलक प्रमाणात पाणी असल्यामुळे जिल्ह्यातील अनेक तालुक्यांतील शेतकरी यंदा ऊस लागवडीकडे वळले आहेत.

विशेषतः जायकवाडी डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्रातील पाथरी, मानवत, परभणी, पूर्णा तसेच माजलगाव कालव्याच्या लाभक्षेत्रातील गंगाखेड तालुक्यात ऊस लागवड क्षेत्रात वाढ झाली आहे.
पूर्णा तालुक्यात जायकवाडी डावा कालवा तसेच सिद्धेश्वर कालवा या दोन्ही कालव्यांचे पाणी मिळते. त्यामुळे पूर्णा तालुक्यातील ऊस लागवड क्षेत्रात वाढ झाली आहे. त्यामुळे येत्या (२०२०-२१) गाळप हंगामात साखर कारखान्यांना गाळपासाठी ऊस कमी पडणार नाही.

गतवर्षी(२०१८-१९) दुष्काळी स्थितीमुळे सिंचनासाठी पाणी नसल्यामुळे ऊस लागवड क्षेत्रात मोठी घट झाली. त्यामुळे यंदाच्या हंगामात गाळपासाठी पुरेशा प्रमाणात ऊस नसल्यामुळे पाच पैकी तीन साखर कारखान्यांचे गाळप सुरू केले. अनेक तालुक्यांत ऊस लागवड सुरू आहे. त्यामुळे उसाचे अंतिम लागवड क्षेत्र अद्याप निश्चित करण्यात आलेले नाही.

तालुकानिहाय यंदाचे अंतरिम ऊस लागवड क्षेत्र (हेक्टर)
तालुका ऊस लागवड क्षेत्र
परभणी १११०
जिंतूर ८५
सेलू    २७१
मानवत १०४०
पाथरी  ८०५९
सोनपेठ  ९९९
गंगाखेड   १५४३
पालम  ९१०
पूर्णा   ६६३४

 


इतर ताज्या घडामोडी
जळगाव जिल्ह्यातील विद्यार्थी वर्गात...जळगाव : जिल्हा परिषद शाळांमधील...
पुणे विभागात चारा पिकांच्या पेरणीवर भरपुणे ः उन्हाळ्यात जनावरांना चाऱ्याची अडचण येऊ नये...
सांगली जिल्ह्यात द्यापही तूर खरेदी सुरू...सांगली : शासनाने हमीभावाने तूर खरेदी करण्यासाठी...
आटपाडीत डाळिंब उत्पादकांना विमा भरपाईची...आटपाडी, जि. सांगली : यावर्षी पावसातील सुरुवातीचा...
मक्यावरील अळीमुळे शेतकरी चिंतातुरअकोला ः जिल्ह्यात या रब्बीत लागवड झालेल्या...
अधिकाऱ्यांच्या खेळात नाचणी उत्पादक वेठीसकोल्हापूर: उन्हाळ्यात नाचणी घेऊन पन्हाळा पश्‍चिम...
चार हजार शेतकऱ्यांना र्दृष्टीदोष दूर...गोंडपिपरी, जि. चंद्रपूर : व्यवसाय करताना बेरीज-...
रेशीम उद्योगासाठी शेतकऱ्यांनी पुढे यावे...औसा, जि. लातूर :  ‘‘रेशीम उद्योगाकडे...
सकाळी सौम्य थंडी तर दुपारी उष्ण हवामानमहाराष्ट्रावर आठवड्याच्या सुरुवातीला १०१४...
औरंगाबाद जिल्ह्यात विजेअभावी सिंचनाची...औरंगाबाद : पंधरवडा रात्री तर पंधरवडा दिवसा...
जीआय टॅगिंगयुक्त हापूसला दीड लाखापर्यंत...रत्नागिरी : ‘‘निर्यातीत हापूसचा टक्के घसरत असून...
कावपिंप्रीत चार वर्षांनंतर बहरली पिकेकावपिंप्री, जि. जळगाव : यंदा कावपिंप्रीसह...
नीरा-देवघरच्या पाणीवाटपावरुन पिलीवमध्ये...सोलापूर : राज्य सरकारने नीरा- देवघर धरणातील...
खानदेशात कांदा दरातील चढउतारामुळे...जळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...
पूरक अन् प्रक्रिया उद्योगावर जर्मनीचा भरउत्तर जर्मनीतील सपाट भूप्रदेश आणि पूर्व...
जालन्यात कांदा २२०० ते २५०० रुपये...जालना : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
गुणकारी डाळिंबडाळिंब हे अत्यंत गुणकारी फळ असून भारतात सर्वत्र...
हुंडी चिठ्ठी, मायक्रो फायनान्स...अकोला  ः जिल्ह्यात हुंडी चिठ्ठी तसेच मायक्रो...
नाशिक येथे तीनदिवसीय पुष्पोत्सवाला...नाशिक  : प्रत्येकाच्या हक्काची तीन झाडं हवी...
न्हावी परिसरात मका पिकावर लष्करी अळीचा...न्हावी, जि. जळगाव ः न्हावीसह परिसरात मक्‍याची...