Farmers Agricultural News Marathi survey of lock down effects on agriculture sector Nashik Maharashtra | Agrowon

प्रक्रिया, सामूहिक विपणन, थेट विक्रीतूनच होईल जोखीम कमी : सर्व्हेक्षण

मुकुंद पिंगळे
रविवार, 30 ऑगस्ट 2020

नाशिक ः ‘टाळेबंदीत शेतकऱ्यांना भेडसावलेल्या समस्या व ‘कोरोना’नंतरची शेतीतील संधी’ या विषयावर क्षेत्रीय पातळीवर के.के.वाघ कृषी व संलग्न महाविद्यालय व सकाळ माध्यम समूहाच्या वतीने सर्व्हेक्षण करण्यात आले.

नाशिक: ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर टाळेबंदी लागू झाल्याने प्रामुख्याने शेती क्षेत्र मोठ्या प्रमाणावर अडचणीत आले. या परिस्थितीत ‘टाळेबंदीत शेतकऱ्यांना भेडसावलेल्या समस्या व ‘कोरोना’नंतरची शेतीतील संधी’ या विषयावर क्षेत्रीय पातळीवर के.के.वाघ कृषी व संलग्न महाविद्यालय व सकाळ माध्यम समूहाच्या वतीने सर्व्हेक्षण करण्यात आले. ज्यामध्ये राज्यभरातील प्रयोगशील शेतकऱ्यांची मते जाणून घेण्यात आली. शेतमालावर प्रक्रिया, सामूहिक विपणन व थेट विक्री यातूनच जोखीम कमी होऊ शकते, असा सूर या शेतकऱ्यांमधून व्यक्त झाला.

जिरायती व बागायती अशा दोन्ही प्रकारच्या प्रयोगशील शेतकऱ्यांची मते या सर्व्हेक्षणाच्या माध्यमातून विचारात घेण्यात आली. ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर कोणत्या अडचणी जाणवल्या? त्या सोडविण्यासाठी वैयक्तिक कोणते प्रयत्न केले? ‘कोरोना’नंतर कृषी व संबंधित उद्योगामध्ये संधी कोणत्या? त्यासंबंधी सुविधा उभारणी, मनुष्यबळ, भांडवल उपलब्ध आहे का? यासह कृषी तंत्रज्ञान विस्तारासाठी कोणत्या अपेक्षा आहेत, हे या सर्व्हेक्षणातून जाणून घेण्यात आले.

कृषी, कृषी अभियांत्रिकी, उद्यानविद्या, कृषी जैवतंत्रज्ञान, कृषी व्यवसाय व्यवस्थापन व अन्न तंत्रज्ञान या विद्याशाखांमधील २०० हून अधिक विद्यार्थ्यांनी सर्व्हेक्षणात सहभाग नोंदविला. ज्यामध्ये राज्यातील १४ जिल्ह्यांतून माहिती संकलित करण्यात आली. महाविद्यालयाचे विश्वस्त समीर वाघ यांचे सहकार्य लाभले. समन्वयक डॉ.व्ही.एम.सेवलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. प्रवीण जगताप यांनी काम पाहिले.
 
या घटकांचे झाले नुकसान

 • पिके : द्राक्ष, कांदा, लिंबू, डाळिंब, संत्रा, आंबा, भाजीपाला, गहू, मका.
 • कृषीपूरक : दूध, अंडी व चिकन विक्री

 
टाळेबंदीत निर्माण झालेल्या समस्या 

 • मजूर टंचाईमुळे काढणी वेळेत न झाल्याने शेतीमालाचे नुकसान.
 • बाजारपेठा बंद असल्यामुळे शेतीमाल विक्रीत अडचणी.
 • काही व्यापाऱ्यांनी अडवणूक करून निच्चांकी दराने केला शेतीमाल खरेदी.
 • शेतीमालास अपेक्षित दर नसल्याने उत्पादन खर्च निघणे मुश्कील.
 • बियाणे दरवाढ व रासायनिक खतांचा तुटवडा.
 • शेतीमाल विक्रीपश्चात देयके प्रलंबित.
 • वित्तीय संस्था प्रतिसाद देत नसल्याने भांडवलाबाबत कोंडी. 

‘कोरोना’नंतर शेतकऱ्यांच्या मते या आहेत संधी

 • शेतीमालाची थेट किंवा ऑनलाईन विक्री.
 • आंतरराष्ट्रीय बाजारपेठांचा शोध घेऊन निर्यात.
 • शेतीला पूरक उद्योगांची जोड.
 • मागणीनुसार बहुपीक पद्धतीतून जोखीम होईल कमी. 

शेतकऱ्यांच्या अपेक्षा

 • शासकीय योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजे
 • शेतीमाल साठवणूक सुविधा, शीत साखळी व मूल्यवर्धन करण्यासाठी प्रक्रिया उद्योग उभारणी व्हावी.
 • बदलत्या काळात शेतकऱ्यांना काटेकोर कौशल्यावर आधरित प्रशिक्षण 
 • अडचणीच्या काळात व्हावी भांडवलाची उपलब्धता.
 • अचूक हवामान अंदाजासाठी हवामान केंद्रे उभारावीत.
 • व्यावसायिक संधींबाबत प्रशिक्षण दिले जावे.

इतर अॅग्रोमनी
मैत्रीची अन्नधान्य व्यापारातील भागीदारी...आडगाव (जि. नाशिक) येथील गोरक्ष लभडे आणि संदीप...
बीटी वांग्याच्या दुसऱ्या टप्प्यातील...पुणे : देशभरात चर्चेत असलेल्या बीटी वांग्याच्या...
साखर निर्यातीचे करार ५७ लाख टनांवरकोल्हापूर : देशातल्या साखर निर्यातीचे करार आता ५७...
खरिपाचा पेरा सरासरी क्षेत्राच्याही पुढेनवी दिल्लीः कोरना देशात यंदा पाऊसमान चांगले...
फुलशेतीला सजावट व्यवसायाची साथकवठेपिरान (जि. सांगली) येथील अत्यल्पभूधारक अकबर...
हापूस आंब्यासाठी नव्या बाजारपेठांची गरजपोर्तुगिजांच्या काळात मुंबईच्या बाजारपेठेत हापूस...
ब्राझीलचे साखर उत्पादन वाढण्याचा अंदाजकोल्हापूर: गेल्या वर्षी इथेनॉल उत्पादनाकडे...
प्रक्रिया, सामूहिक विपणन, थेट...नाशिक: ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर टाळेबंदी लागू...
खाद्यतेल आयातीवर निर्बंध आणा: सोपा नागपूर : देशातील नागरिकांचे आरोग्य जपण्याकरिता...
मत्स्यपालनाच्या शाश्वततेसाठी योग्य धोरण...जागतिक पातळीवर लोकसंख्या वेगाने वाढत असून,...
महागाई नियंत्रणासाठी रेपो दर 'जैसे थे' मुंबई: भारतीय रिझर्व्ह बँकेने आपले ऑगस्ट आणि...
देशभरात ‘नाफेड’कडून ८६ हजार टन कांदा...नाशिक: केंद्र सरकारच्या भाव स्थिरीकरण निधी...
कृषी सुधारणांचा वेळोवेळी आढावा घ्याः ‘...नवी दिल्लीः केंद्र सरकार ‘पीएम-किसान’...
काश्‍मिरी केशरला भौगोलिक मानांकनजम्मू: काश्‍मिरमध्ये उत्पादीत होणाऱ्या केशरला...
देशात खरिपाचा ६५ टक्के पेरा आटोपलानवी दिल्लीः देशात खरिपाखालील सरासरी क्षेत्र १...
‘स्ट्रॉबेरी‘ला बाजारपेठ विस्ताराची गरजस्ट्रॉबेरी उत्पादक पट्यात पॅकहाउस आणि शीतकरण...
भारतातून यंदा दशकातील विक्रमी साखर...कोल्हापूर: लॉकडाउनच्या संकटानंतरही साखर...
सांगली बाजारसमितीत हळद विक्रीत पाच लाख...सांगली ः सांगली बाजार समिती हळदीच्या...
शेतीमाल निर्यातीला चीन वादाचा फटका नाहीपुणे : महाराष्ट्रातून चीनला होणारी शेतीमालाची...
बिगर बासमती तांदळाच्या निर्यातवाढीसाठी...पुणे: तांदळाच्या जागतिक बाजारपेठेतील स्पर्धेत...