Farmers Agricultural News Marathi Swabhmani Shetkari Sanghatna take a dicision to not paid electricity bills Satara Maharashtra | Page 2 ||| Agrowon

वीज बिले न भरण्याचा ‘स्वाभिमानी’चा निर्धार

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 18 फेब्रुवारी 2020

शेतकऱ्यांच्या हितासाठी कोणतेही लोकप्रतिनिधी भांडताना दिसत नाहीत. यापुढे महिन्यातील पहिल्या रविवारी स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतकऱ्यांच्या तक्रारींबाबत बैठक घेऊन त्या मार्गी लावण्यासाठी पुढाकार घेईल. 
- राजू शेळके, जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना

सातारा  ः जावळवाडी (ता. सातारा) येथील मुख्य चौकात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शेतीपंपांच्या वीज बिलांची होळी करत वीज बिले न भरण्याचा एकमुखी निर्धार केला. या वेळी प्रशासनाच्या भूमिकेबाबतही तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. 

रविवारी वीज बिल मुक्ती (जाचक नियम), शेतकरी कर्जमुक्ती या विषयावर चर्चा व उपाययोजना करण्यासाठी जावळवाडी येथे विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. या वेळी प्रथम हिंगणघाट येथील प्राध्यापिका तसेच विविध स्तरावरील सामाजिक काम करणाऱ्या हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

बैठकीत अध्यक्षांच्या निवडीचा प्रस्ताव, गावोगावी शेतकरी मंच स्थापन, बैठकीसंदर्भातील भूमिका, बिल भरले जाणार नसल्याचा ठराव, कर्जवसुलीबाबत संबंधित सचिव, अध्यक्षांना अर्ज देणे, वीज बिल व कर्जमुक्ती निवेदन २४ फेब्रुवारी रोजी देणे, नादुरुस्त रोहित्र साहित्यासाठी तसेच रिक्त वायरमन जागा भरण्याची मागणी करण्यासह विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.  

या वेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके, आर. डी. घाडगे, सुधाकर शितोळे, संजय जाधव तसेच वर्णे व नागठाणे गटातील शेतकरी उपस्थित होते.
 


इतर ताज्या घडामोडी
किरकोळ आजारांकडे नको दूर्लक्षमहिलांनी घराकडून शेताकडे जाताना चेहऱ्यावर पदर...
पावसाच्या आगमनानुसार पीक नियोजनकोरडवाहू शेतीमध्ये पावसाच्या पाण्याचा थेंब न थेंब...
गादीवाफ्यावर भुईमूग लागवड फायदेशीरजून महिन्याचा पहिल्या आठवडा ते शेवटचा आठवड्याच्या...
पुण्यातील पश्चिम तालुक्यांत हायअलर्ट...पुणे : अरबी समुद्रात आलेल्या निसर्ग...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात पाऊस नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील ११८...
मराठवाड्याच्या पाणी प्रश्नावर सर्वांनी...औरंगाबाद : ‘‘मराठवाड्यासाठी वॉटर ग्रीड अत्यंत...
कोरोनाच्या संकटात कृषी, पणन खाते अपयशी...नाशिक : ‘‘कोरोनाच्या अडचणीच्या काळात शेतकऱ्यांचा...
परभणी जिल्ह्यात पीककर्जासाठी पेरणीच्या...परभणी : जिल्ह्यातील अनेक गावातील तलाठी पीककर्ज...
नगर जिल्ह्यात एकशे तीन टॅंकरने...नगर : उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढू लागल्याने...
टोकन प्रक्रियेत गैरप्रकार केल्यास...परभणी : ‘‘बाजार समित्यांमार्फत टोकन देण्याच्या...
हिंगोलीत १७ हजारावर शेतकऱ्यांच्या १८...हिंगोली : चालू खरेदी हंगामात जिल्ह्यात...
पुणे जिल्ह्यात पूर्वमोसमी पावसाच्या...पुणे ः जिल्ह्यात रविवारी (ता. ३१) सायंकाळी जोरदार...
मराठवाड्यातील ३६६ मंडळांत पूर्व मोसमी...औरंगाबाद  : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातील...
सातारा जिल्ह्यात पावसाची हजेरीसातारा ः जिल्ह्यात रविवारी पूर्वमोसमी पावसाने...
‘पंदेकृवि’तर्फे उद्या खरीपपूर्व कृषी...अकोला ः डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या...
नगरमधील दहा तालुक्यांत जोरदार पाऊसनगर ः नगर जिल्ह्यात रविवारी (ता. ३१) दहा...
मराठवाड्यात बियाणे, खते खरेदीस वेग औरंगाबाद : मराठवाड्यातील सोयगाव, देगलूर, बिलोली,...
नाशिक जिल्ह्याच्या पूर्व भागात...नाशिक : जिल्ह्याच्या पूर्व भागात नांदगाव...
नाफेड केंद्रावर तूर विकण्याचा...अमरावती ः शेतकऱ्याच्या नावावर नोंदणी करुन हमीभाव...
हमीभावाने तूर-हरभरा खरेदीस मुदतवाढअमरावती ः लॉकडाउनमुळे हमीभावाने तूर व हरभरा...