सोलापूर बाजार समितीतील विस्कळीतपणा कायम

बाजार समितीच्या आवारातील गर्दी कमी करण्याचे आमचे प्रयत्न आहेत. त्यामुळेच किरकोळ विक्रेत्यांना बाहेर हलवण्यात आले आहे. भाज्यांच्या लिलावाची जागाही बदलली आहे. पोलिसांचेही सहकार्य मिळत आहे. येत्या दोन दिवसांत आणखी बदल दिसतील. -उमेश दळवी, प्रभारी सचिव, बाजार समिती, सोलापूर.
बाजार समितीत सोमवारी (ता.३०) भाजीपाला, फळभाज्यांची आवक वाढली. दुपारी बारा वाजेपर्यंतही अनेक शेतीमालाला म्हणावा तसा उठाव मिळाला नव्हता. त्यामुळे सेलहॅालमध्ये तो तसाच पडून होता.
बाजार समितीत सोमवारी (ता.३०) भाजीपाला, फळभाज्यांची आवक वाढली. दुपारी बारा वाजेपर्यंतही अनेक शेतीमालाला म्हणावा तसा उठाव मिळाला नव्हता. त्यामुळे सेलहॅालमध्ये तो तसाच पडून होता.

सोलापूर  ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाला आणि फळभाज्यांचे व्यवहार सुरु असले, तरी अद्यापही त्यातील विस्कळीतपणा कायम आहे. बाजार समितीच्या आवारातील किरकोळ विक्रेत्यांना जनावरे बाजाराच्या मैदानावर हलवण्यात आले आहे. तसेच गर्दी कमी होण्याच्या दृष्टीने भाज्यांचे लिलाव कांदा सेलहॅालमध्ये सुरु केले आहेत. पण त्यात अजूनही अपेक्षित सुसूत्रता आलेली नाही. सोमवारी (ता.३०) भाज्यांची १० ट्रक आवक झाली. पण उठाव नसल्याने दर कमीच राहिले. 

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सध्या बाजार समितीच्या व्यवहारांवर परिणाम झाला आहे. पोलिस आणि बाजार समिती प्रशासन याबाबत अजूनही गोंधळलेल्या स्थितीतच आहे. पण त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. पहाटे चार वाजेपासून बाजार समितीच्या आवारात आडते आणि शेतकऱ्यांची गर्दी वाढते. त्यात किरकोळ विक्रेतेही भर टाकत असल्याने एखाद्या यात्रेसारखे स्वरुप बाजार आवाराला येत आहे.

पण दोन दिवसांपासून पोलिसांनी आवारातील गर्दी कमी होण्यासाठी किरकोळ विक्रेत्यांना जनावरे बाजाराच्या आवारात हलवले आहे. भाज्यांचे सगळे लिलाव कांदा सेलहॅालमध्ये सुरु केले आहेत. त्यामुळे काहीसे नियंत्रण आले असले, तरी गर्दी अजूनही हटत नाही. किरकोळ विक्रेते आणि ग्राहकांच्या गर्दीमध्ये शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. पहाटे सोलापूर व परिसरातील दुचाकीवर भाजीपाला घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांना आत सोडले जात नाही, अशा तक्रारी आहेत. पण पोलिस आणि प्रशासनाचे योग्य नियोजन होत नसल्याने गोंधळाची स्थिती आहे. 

आवक वाढली, पण उठाव नाही सोमवारी भाज्या आणि फळभाज्यांची आवक बऱ्यापैकी वाढल्याचे चित्र राहिले. भाज्यांची सर्वाधिक आवक स्थानिक भागातूनच झाली. सोमवारी भाज्यांची जवळपास ३ ट्रक (३२४ क्विंटल), फळांची ४ ट्रक (२५२७ क्विंटल), कांदा-बटाट्याची ४ ट्रक (४६५ क्विंटल) तर भुसार विभागात तब्बल ५१ ट्रक (५१००० क्विंटल) आवक झाली. पण लिलावातील घोळ, खरेदीदारांची कमी झालेली संख्या यामुळे त्यांना फारसा उठाव मिळाला नाही.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com