Farmers Agricultural News Marathi system disturb in market committee Solapur Maharashtra | Agrowon

सोलापूर बाजार समितीतील विस्कळीतपणा कायम

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 31 मार्च 2020

बाजार समितीच्या आवारातील गर्दी कमी करण्याचे आमचे प्रयत्न आहेत. त्यामुळेच किरकोळ विक्रेत्यांना बाहेर हलवण्यात आले आहे. भाज्यांच्या लिलावाची जागाही बदलली आहे. पोलिसांचेही सहकार्य मिळत आहे. येत्या दोन दिवसांत आणखी बदल दिसतील. 
-उमेश दळवी, प्रभारी सचिव, बाजार समिती, सोलापूर.

सोलापूर  ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाला आणि फळभाज्यांचे व्यवहार सुरु असले, तरी अद्यापही त्यातील विस्कळीतपणा कायम आहे. बाजार समितीच्या आवारातील किरकोळ विक्रेत्यांना जनावरे बाजाराच्या मैदानावर हलवण्यात आले आहे. तसेच गर्दी कमी होण्याच्या दृष्टीने भाज्यांचे लिलाव कांदा सेलहॅालमध्ये सुरु केले आहेत. पण त्यात अजूनही अपेक्षित सुसूत्रता आलेली नाही. सोमवारी (ता.३०) भाज्यांची १० ट्रक आवक झाली. पण उठाव नसल्याने दर कमीच राहिले. 

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सध्या बाजार समितीच्या व्यवहारांवर परिणाम झाला आहे. पोलिस आणि बाजार समिती प्रशासन याबाबत अजूनही गोंधळलेल्या स्थितीतच आहे. पण त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. पहाटे चार वाजेपासून बाजार समितीच्या आवारात आडते आणि शेतकऱ्यांची गर्दी वाढते. त्यात किरकोळ विक्रेतेही भर टाकत असल्याने एखाद्या यात्रेसारखे स्वरुप बाजार आवाराला येत आहे.

पण दोन दिवसांपासून पोलिसांनी आवारातील गर्दी कमी होण्यासाठी किरकोळ विक्रेत्यांना जनावरे बाजाराच्या आवारात हलवले आहे. भाज्यांचे सगळे लिलाव कांदा सेलहॅालमध्ये सुरु केले आहेत. त्यामुळे काहीसे नियंत्रण आले असले, तरी गर्दी अजूनही हटत नाही. किरकोळ विक्रेते आणि ग्राहकांच्या गर्दीमध्ये शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. पहाटे सोलापूर व परिसरातील दुचाकीवर भाजीपाला घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांना आत सोडले जात नाही, अशा तक्रारी आहेत. पण पोलिस आणि प्रशासनाचे योग्य नियोजन होत नसल्याने गोंधळाची स्थिती आहे. 

आवक वाढली, पण उठाव नाही
सोमवारी भाज्या आणि फळभाज्यांची आवक बऱ्यापैकी वाढल्याचे चित्र राहिले. भाज्यांची सर्वाधिक आवक स्थानिक भागातूनच झाली. सोमवारी भाज्यांची जवळपास ३ ट्रक (३२४ क्विंटल), फळांची ४ ट्रक (२५२७ क्विंटल), कांदा-बटाट्याची ४ ट्रक (४६५ क्विंटल) तर भुसार विभागात तब्बल ५१ ट्रक (५१००० क्विंटल) आवक झाली. पण लिलावातील घोळ, खरेदीदारांची कमी झालेली संख्या यामुळे त्यांना फारसा उठाव मिळाला नाही. 
 


इतर बातम्या
राज्यात नवे २४८७ रुग्ण; सध्या ३४,४८०...मुंबई : राज्यात आज दिवसभरात २४८७ नवीन रुग्णांचे...
राज्य सरकारचे ‘पुनश्‍च हरीओम्’ :...मुंबई : कोरोनाच्या साथीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी...
शैक्षणिक वर्ष जूनपासूनच : मुख्यमंत्री...मुंबई : ‘‘शिक्षण हे जीवनावश्यक आहे ते...
अंतिम वर्षाची परीक्षा नाही :...मुंबई : सध्याच्या परिस्थितीत विद्यापीठाच्या...
टोळधाडबाधितांना मदत देणार : पंतप्रधान...नवी दिल्ली : देशातील अनेक भागांत टोळधाडीचे संकट...
पीकविम्याचे कामकाज या महिन्यातपुणे: राज्यातील शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीकविमा...
प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील यंत्रमाग...मालेगाव, जि. नाशिक : ‘‘लॉकडाऊनमुळे यंत्रमागाची...
गोंधळी शिवारात ६२ हजारांचा एचटीबीटी...यवतमाळ ः कृषी विभागाच्या पथकाने अमरावती, यवतमाळ...
लोकांना पूर धोक्‍याची जाणीव करुन द्या ः...भंडारा ः वैनगंगा नदी तसेच इतर नदीकाठावरील खोलगट...
परवानगी नसलेल्या एचटीबीटी बियाण्यांचा...अमरावती ः घरपोच बियाणे वाटपाच्या माध्यमातून...
टोळधाड प्रादुर्भावग्रस्त क्षेत्राला...भंडारा ः भंडारा जिल्ह्यातील टोळधाड...
विदर्भ राज्य आंदोलन समितीचे ७ जूनला...अकोला ः कोरोनामुळे उद्योगधंदे, व्यापार, शेती,...
नांदेड जिल्ह्यात पाच हजारावर...नांदेड : किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गंत...
शेतकऱ्यांनी डिजिटल व्यासपीठाचा वापर...पुणे ः कोरोनामुळे शेतीक्षेत्राचे चित्र बदलणार आहे...
‘सोयाबीन लागवड तंत्रज्ञान व प्रक्रिये’...परभणी : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील...
नांदेडमधील कापूस संशोधन केंद्रात...नांदेड : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
नगर अर्बन बॅंकेला चाळीस लाखांचा दंडनगर : नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅंकेला रिझर्व्ह...
‘कुकडी’चे उन्हाळी आवर्तन सहा जूनला...नगर : ‘कुकडी’च्या उन्हाळी आवर्तनासाठी पुणे येथे...
दुग्ध व्यवसायाने घराला आधारशेतीपूरक व्यवसायामध्ये दुग्ध व्यवसाय पूर्वीपासूनच...
दोन वाहनांतील कापूस घेण्याचे आदेश द्या...परभणी : भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) मानवत...