farmers agricultural news marathi take a precaution about artificial insemination pune maharashtra | Agrowon

गायी, म्हशींचे कृत्रिम रेतन करताना राहावे दक्ष

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 5 डिसेंबर 2019

पुणे  : गाय, म्हशीला कृत्रिम रेतन करताना पशुपालकांनी अतिशय दक्ष राहवे. रेतमात्रा वापरताना त्याचा दर्जा, जात आणि कोणत्या वळूची रेतमात्रा वापरली आहे, त्याचे प्रमाणपत्र, कृत्रिम रेतन करणाऱ्याची विश्‍वासार्हता आणि सेवेचा दर्जा याबाबत जागरूक रहावे, असे आवाहन पशुसंवर्धन आयुक्तालयाच्या वतीने करण्यात आले आहे. 

पुणे  : गाय, म्हशीला कृत्रिम रेतन करताना पशुपालकांनी अतिशय दक्ष राहवे. रेतमात्रा वापरताना त्याचा दर्जा, जात आणि कोणत्या वळूची रेतमात्रा वापरली आहे, त्याचे प्रमाणपत्र, कृत्रिम रेतन करणाऱ्याची विश्‍वासार्हता आणि सेवेचा दर्जा याबाबत जागरूक रहावे, असे आवाहन पशुसंवर्धन आयुक्तालयाच्या वतीने करण्यात आले आहे. 

याबाबत माहिती देताना पशुधन विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक डॉ. धनंजय परकाळे म्हणाले, की गाई, म्हशींचा योग्य माज पशुपालकांना ओळखता आला पाहिजे. केवळ काही प्राथमिक लक्षणांवरून पशुपालकांनी खासगी कृत्रिम रेतन करणाऱ्यांना बोलावू नये. काहीवेळा कृत्रिम रेतन करणारे व्यक्ती अप्रशिक्षित असल्याने त्यांना जनावरांचा योग्य माज ओळखता येत नाही. त्यामुळे केवळ व्यवसाय करायचा आहे, गोठ्यावर जाण्या-येण्याचे शूल्क वसूल करायचे म्हणून काहीवेळा खासगी व्यावसायिक गरज नसतानादेखील रेतन करून, पैसे घेऊन जातात.

पशुवैद्यकीय क्षेत्राचे पुरेसे ज्ञान नसल्याने अशास्त्रीय पद्धतीने गर्भाशय हाताळले जाते. त्यामुळे गाय, म्हैस वारंवार उलटण्याचे प्रकार घडतात. यामध्ये आरोग्याचा प्रश्‍न निर्माण होतो. दुसऱ्या बाजूला गाय, म्हैस गाभण न राहिल्याने पशुपालकाचा खर्च वाढतो आणि पुढील माजाची वाट पहावी लागते. असे सातत्याने झाल्यास पशुपालक याचा दोष कृत्रिम रेतन करणाऱ्या खासगी व्यक्तीला न देता जनावराला देऊन विक्री करतो.   

आजही बऱ्याच ठिकाणी रेतमात्रांची साठवणूक, हाताळणी गांभीर्याने होत नसल्याचे दिसून येत आहे. याबाबत डॉ. परकाळे म्हणाले, की रेतमात्रा ही उणे १९६ अंश सेल्सिअस तापमानाला द्रव नायट्रोजनमध्ये पूर्ण बुडालेल्या अवस्थेत संरक्षित ठेवणे गरजेचे असते. अनेक वेळा त्याचे तापमान आणि पूर्णपणे नायट्रोजनमध्ये ती बुडवलेली नसते. यामुळे शुक्राणुंची हालचाल कमी होऊन, दर्जा खालावतो. यामुळे देखील गाय, म्हैस गाभण राहण्यास अडचणी निर्माण होतात.

जनावराच्या तापमानानुसार ३७ अंश सेल्सिअसला रेतमात्रा वापरायची असते. द्रव नायट्रोजनमधून रेतमात्रा काढल्यानंतर ती ३७ अंश सेल्सिअस तापमानाच्या पाण्यात ३० सेकंद ठेऊन तापमान नियंत्रणात आणल्यानंतर रेतनासाठी वापरावी. मात्र या कार्यपद्धतीचा वापर फार कमी प्रमाणात होत असल्याने जनावरांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण होण्याचे प्रमाण मोठे आहे.

रेतमात्रा ज्या गनद्वारे वापरली जाते, ती गन निर्जंतूक केलेली नसते. तसेच त्या गनसाठी प्लॅस्टिकचे आवरणदेखील वापरले जात नाही. कृत्रिम रेतन करणाऱ्या व्यक्ती दुचाकीवरून गावोगावी फिरत असताना रेतनाच्या गनवर धूळ बसून त्यावर जंतुसंसर्ग झालेला असतो. हा जंतू संसर्ग गाई, म्हशीला झाल्याने जनावर उलटणे, गर्भाची चांगली वाढ न होणे, विकृती वाढणे असे प्रकार घडतात. त्यामुळे पशुपालकांनी कृत्रीम रेतन करताना शास्त्रीय बाबींचा आग्रह धरावा, असे डॉ. परकाळे म्हणाले. 


इतर ताज्या घडामोडी
फूल उत्पादकांना आस दसरा, दिवाळीचीपुणे : टाळेबंदीत सर्वाधिक फटका बसलेल्या फूल...
लातूर विभागात २३ लाखावर शेतकऱ्यांना...उस्मानाबाद / लातूर : लातूर येथील विभागीय कृषी...
औरंगाबादमध्ये कांदा २०० ते ३२०० रूपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
पुणे जिल्ह्यात पीककर्जाची होणार सहा...पुणे :  नियमित कर्ज फेडणाऱ्या...
मूग, उडीद खरेदीसाठी सोलापूर, बार्शी,...सोलापूर  : मूग, उडदाच्या आधारभूत किंमती...
खानदेशातील दुष्काळी भागातील प्रकल्पांत...जळगाव  ः खानदेशातील दुष्काळी भागातील निम्मे...
वाशीम जिल्ह्यात पिकांच्या नुकसानीचे...वाशीम  : ‘‘जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत...
खानदेशात सोयाबीनची कापणी, मळणी लांबणीवर...जळगाव  ः खानदेशात काळ्या कसदार जमिनीत वाफसा...
हिंगोली, परभणीत एक लाख हेक्टर पिकांवर...हिंगोली, परभणी : अतिवृष्टी, ओढे - नाले, नद्यांचे...
साखर कारखान्यांचे वजनकाटे सुधारा, ‘...कोल्हापूर : साखर कारखान्यांच्या वजन काट्याबाबत...
सांगलीत मूग, उडीद खरेदीसाठी नोंदणी सुरूसांगली : बाजार समितीच्या आवारातील विष्णूअण्णा...
कृषी विधेयकाच्या समर्थणार्थ ‘रयत’ने...नाशिक  : केंद्र सरकारने कृषी विधेयकाच्या...
राज्यात ढगाळ हवामानाची शक्यताईशान्य मॉन्सून म्हणजेच परतीच्या मॉन्सूनला सुरुवात...
खानदेशात पाऊस थांबला, वाफशाची प्रतीक्षाजळगाव : खानदेशात गुरुवारी (ता.२५) पाऊस थांबला....
सांगलीत नियोजनाअभावी थेट शेतमाल विक्री...सांगली : लॉकडाउनच्या काळात संपूर्ण बाजारपेठा बंद...
सोलापुरातील उपबाजार समित्यांचा प्रस्ताव...सोलापूर ः सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या...
कोल्हापुरात शेतकरी संघटनांकडून कृषी...कोल्हापूर : राज्यसभेत मंजूर झालेल्या कृषी...
नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे...सोलापूर ः अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या...
शेतकऱ्यांचे प्रश्‍न शासनाकडे पोचवणार :...नाशिक : ‘‘मी देखील शेतकऱ्याचाच मुलगा आहे. कांदा...
मराठवाड्यात कृषी विधेयकांची होळीऔरंगाबाद / परभणी /  नांदेड :...